घाण झालेली कढई किती दिवस वापरणार.? एकदा अशी धुवून काढा एकदम नवी वाटू लागेल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये ॲल्युमिनियमच्या वस्तू असतील वस्तू म्हणण्यापेक्षा आपण अनेकजण ॲल्युमिनियमची भांडी जेवणासाठी वापरत असतो. दररोज त्यामध्ये जेवण बनवणे किंवा सततच्या वापरामुळे ही ॲल्युमिनियमची भांडी खराब होतात त्यावर एक काळया रंगाची परथ जमते म्हणजेच काळा रंगाचा एक थर तयार होतो आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी देखील जात नाही.

कितीही महागाचे लिक्विड वापरले तरी देखील भांड्यांचा काळपटपणा निघून जात नाही आणि ही भांडी परत वापरताना आपल्यालाच कसे तरी वाटते किंवा ते दिसायला चांगले दिसत नाही त्यामुळे आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे फक्त एका वापरामध्ये ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरून काळपट असा रंग निघून जाईल आणि त्यासाठी आपल्याला रोजच्या वापरातील काही गोष्टी लागणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला आपले कोणतेही जुने झालेले ॲल्युमिनियमचे भांडे घ्यायचे आहे. जसे की कढई. आपण जास्त प्रमाणामध्ये कढईचा वापर करतो त्यामुळे कढई जास्त खराब होते. आपल्याला सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे. गॅसची आच जास्त ठेवायची आहे जेणेकरून जर कढईवर जास्त जाड थर निर्माण झाला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते.

त्यामुळे गॅस जास्त पेटवून त्यावर कढई किमान पाच मिनिटे गरम करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आहे. आपली कढई केवढी मोठी आहे किंवा किती छोटी आहे त्यावर आपल्याला पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे जर मोठी असेल तर अर्ध्यापेक्षा देखील अर्धे पाणी त्यात टाकायचे आहे. कढई कशी देखील असली तरी अर्ध्यापेक्षा कमी पाणी घ्यायचे आहे कारण त्यानंतर आपण त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकणार आहोत त्यामुळे त्याचा फेस निर्माण होणार आहे.

हे वाचा:   हिवाळ्यात ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, नाहीतर त्वचा आणखी फाटली जाईल, उललेल्या त्वचे साठी करा हा उपाय.!

गरम करून झाल्यानंतर पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाकायचा आहे आता बेकिंग सोडा आजकाल सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतो त्यानंतर दोन चमचे डिटर्जंट पावडर देखील टाकायची आहे आणि एक चमचा पांढरे विनेगर टाकायचे आहे. जर तुमच्या घरी विनेगर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा वापर देखील करू शकता त्यामध्ये देखील क्लिनिंग प्रॉपर्टी सेम असतात म्हणजेच समान असतात.

हे झाल्यानंतर या मिश्रणाला मोठ्या गॅसवर गरम होऊ द्यायचे आहे जसजसे हे मिश्रण गरम होईल तस तसे याचा फेस येईल आणि हा निर्माण झालेला फेस पूर्ण कढईत पसरेल आणि आपली कढई लवकरात लवकर साफ होण्यास मदत होईल. ही प्रक्रिया आपल्याला पंधरा मिनिटे करायची आहे. पंधरा मिनिट ही प्रक्रिया करत असताना गॅस कमी जास्त करत करत ही प्रक्रिया पार पाडायची आहे. पंधरा मिनिटांनंतर आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आहे आणि त्यामधील पाणी एका दुसऱ्या पात्रामध्ये काढून घ्यायचे आहे.

हे वाचा:   ७ दिवस हे पेय अशाप्रकारे बनवून प्या: म'रेपर्यंत गुढघे, कंबर, रक्ताची कमतरता होणार नाही,डोळ्यांचा चष्मा होईल दूर.. मिळेल भरपूर एनर्जी..!

आता कढईला एका तारेच्या काथ्याने जो काथा आपण भांडी घासण्यासाठी वापरतो त्या काथ्याने आणि आपण बाजूला काढून घेतलेला पाण्याच्या सहाय्याने हळूहळू घासायला सुरुवात करायची आहे. कढईला घासताना थोडासा जोर लावायचा आहे जेणेकरून त्यावर जी परत साचलेली आहे जी आपण केलेल्या उपायामुळे वर आली असेल ती घासून निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला तिकडे घासून घ्यायची आहे.

जर तुम्ही घासण्यासाठी तारेचा काठा वापरला तर एका मिनिटांमध्ये तुमची कढई नवीन असल्यासारखी साफ होईल तुम्हाला हवे असेल तर मध्ये मध्ये तुम्ही भांड्यांना वापरतो ते लिक्विड देखील वापरून कडे साफ करू शकता तुम्हाला याच्या एका वापरामध्येच कढई नवीन असल्यासारखी साफ आणि चमकदार दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.