घरात पाली झुरळे खूप आहेत का.? अहो मग चिंता कसली करताय.! पाच रुपयाची वैसलिन तुमचे काम करेल.!

आरोग्य

आपल्या घरामध्ये रात्री झुरळ आणि पाल वास करत असतात पण आपण त्यांचे काहीच करू शकत नाही, अशा वेळी आपण बाजारामधून महागडे स्प्रे आणि कॉईल आणून ते वापरत असतो. पण असे पदार्थ वस्तू विकत आणल्याने हे झुरळ मरते पण मुळापासून नाहीसे होत नाहीत. आणि आणि परत परत येऊन आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे आपल्याला अनेक सारे आजार देखील होतात.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी व घरातील आजारपण कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे झुरळ आणि पाल, छोटे कीटक कायमचे निघून जातील. चला तर मग जाणून घेऊया या साठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामान लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची प्रक्रिया करायची आहे.

याचा वापर कधी करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला पेट्रोलियम जेल घ्यायचे आहे म्हणजेच वास्लिन. वासलिन मुळे देखील हे कीटक निघून जाण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्याला याची काही हानी होणार नाही. त्यामुळे एका वाटीमध्ये हे जेली घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग पावडर टाकून झाल्यानंतर एक चमचा लिंबाचा रस देखील टाकायचा आहे.

हे वाचा:   अंघोळीपूर्वी शाम्पू मध्ये ही एक गोष्ट नक्की मिळवा.! त्यानंतर जे होईल ते कमालच असेल.! केसांची वाढ दुपटीने होईल.!

आता ह्या तिन्ही घटकांना एकमेकांमध्ये एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडावेळ हे मिश्रण असेच ठेवायचे आहे, जेणेकरून हे दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये एकरूप व्हायला मदत होईल. पाच मिनिटांनंतर हे मिश्रण एका मोठ्या वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आहे. पाणी आणि तीन घटकांनी तयार केलेले मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.

मिक्स करून झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये मिश्रण टाकायचे आहे आणि हे मिश्रण आता अशा ठिकाणी स्प्रे करायचे आहे. जिथे जिथे झुरळ किंवा छोटे कीटक वास करत असतात. या मिश्रणाचा वापर रात्रीच्या वेळेस करायचा आहे, जेणेकरून सकाळपर्यंत ते कीटक मेलेले असते आणि जास्त करून हे कीटक रात्रीच्या आपल्या घरात वास करत असतात त्यामुळे ते रात्री लवकर मरू शकता.

हे वाचा:   कुरळे केस फक्त दोनच दिवसात होतील सरळ, हे पाणी केसांना लाऊन ठेवा.!

यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती आणि आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा हानिकारक परिणाम होणार नाही. सोबतच आपण अनेकदा वेगवेगळ्या फवरण्या करतं असतो. आणि त्या फवारण्या आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोबत आपण आणलेले स्प्रे आणि कॉइल मुळे आपल्याला ह्र’दय विकार होऊ शकतो.

त्यामुळे हा घरगुती उपाय वापरायचा आहे जेणेकरून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही त्यासोबतच आपले किती तरी पैसे वाचतील. आपल्याला होणारा हा अधिकचा खर्च वाचेल. आणि सोबतच आपण निरोगी राहू शकतो. म्हणून या घरगुती उपायाचा वापर दररोज जरी केला तरी देखील काही हानी होणार नाही. उलट आपल्याला फायदा होणार आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *