आज जो उपाय आपण जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होणार आहे, तसे पाहायला गेले तर आपल्यापैकी अनेक जण द्राक्ष, मनुके सेवन करत असतात. घरातील वेगवेगळ्या पदार्थांना चव देण्यासाठी तसेच पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी अनेकदा काळ्या मनुकाचा किंवा हिरव्या म्हणून त्याचा वापर केला जातो परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेल की आपल्यापैकी काही जण काळे मनुके हे रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवतात व सकाळी उठल्यावर सेवन करत असतात.
हे मनुके सेवन करत असताना आपण फक्त भिजवलेले मनुके सेवन करतो परंतु जे पाणी जे असते ते फेकून देतो असे करणे योग्य आहे की अयोग्य याबद्दल आजच्या या लेखांमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. काळे मनुके खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे संरक्षण प्राप्त होते, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही फक्त पाच दिवस सकाळी उपाशीपोटी मनुके भिजवलेले पाणी सेवन केले तर तुमच्या शरीराला इतके फायदे होणार आहे ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल.
या पाण्याचे वेगवेगळे फायदे आहे, त्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला फायदा म्हणजे या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात. शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत बनते यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही गंभीर प्रकारचे आजार होत नाही.
ज्या व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन देखील सतावत नाही. भिजवलेल्या मनुकेच्या पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ज्या व्यक्तींना वारंवार हाय ब्लडप्रेशर चा त्रास सतावत असतो, अशा व्यक्तीने भिजवलेले मनुके व त्याचे पाणी अवश्य सेवन करायला हवे, असे केल्याने तुमच्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील आणि ब्लड प्रेशर मुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या देखील उद्भवणार नाहीत.
हल्ली आपल्यापैकी अनेकांना शरीरामध्ये र’क्ता’ची कमतरता जाणवत असते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असते अशावेळी आपण खूप सारे औषधे सेवन करतो परंतु जर आपण रात्री भिजवलेले मनुके व त्याचे पाणी सेवन केले तर आपल्या शरीरातील र’क्ताची कमतरता भरून निघते व तुम्हाला ॲ’नि’मि’या हा आजार देखील होणार नाही. या पाण्यामध्ये कॉपरचे प्रमाण देखील जास्त असते आणि म्हणूनच कॉपर मुळे देखील आपल्या शरीरामध्ये र’क्त’पेशी यांची निर्मिती लवकर होते.
जी व्यक्ती सकाळी उपाशीपोटी मनुकेचे पाणी सेवन करते अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये र’क्तप्रवाह सुरळीत राहतो व रक्ताच्या कोणत्याच समस्या त्रास देत नाही आणि परिणामी मनुष्याचे जीवन नेहमी चांगले राहते. या मनुकेच्या पाण्यामध्ये खूप सारे पोषक तत्व उपलब्ध असतात जसे की पोटॅशियम,मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे तत्व असतात म्हणून ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर साफ होत नाही अशा व्यक्तीने देखील सकाळी उठल्यावर उपाशीपोटी मनुकेचे पाणी अवश्य सेवन करायला हवे.
मनुके आणि मनुके च्या पाणी मध्ये कॅ’न्स’र विरोधी तत्व उपलब्ध असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये कॅ’न्स’र निर्मिती करणाऱ्या ज्या काही पेशी असतात त्यांची वाढ रोखण्याचे कार्य मनुकेचे पाणी करत असते. ज्या व्यक्तींना वारंवार सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी या वाताच्या समस्या त्रास देत असतात अशा व्यक्तीने देखील दिवसभरातून एकदा तरी मनुके सेवन करायला हवे.
मनुके पाणी सेवन केल्याने आपले लिव्हरचे आरोग्य चांगले राहते आणि यामुळे आपल्याला पित्त, ऍसिडिटी, ब’द्धकोष्ठता, मू’ळव्याध यासारखे आजार देखील होत नाही. आपले पोट नेहमी स्वच्छ राहते. पोटामध्ये जमा झालेल्या गॅस लवकरच बाहेर पडतो. जर तुम्ही फक्त पाच दिवस सातत्याने मनुके पाणी सेवन केले तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा होतील, त्याचबरोबर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग, वांग पडलेल्या असतील तर ते देखील दूर होईल.
तुमचा चेहरा अगदी उजळून सुंदर दिसू लागेल. या पाण्यामुळे आपल्या शरीराला सुंदरता प्राप्त होते पण त्याचबरोबर शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते देखील बाहेर निघतात म्हणजेच या पाण्यामध्ये आपले शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ करण्याची क्षमता असते. जर तुम्हाला मनुके रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे असतील त्याआधी मनुके एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, जेणेकरून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचली असेल तर ते निघून जाईल.
त्याचबरोबर दिवसभरातून साधारणतः तीन ते चार मनुके प्रत्येकाने सेवन करायला पाहिजे व रात्री झोपताना पाच ते सहा मनुके भिजवायला पाहिजे. सकाळी उठल्यावर आपण हे मनुके व त्याचे पाणी सहजरित्या सेवन करू शकतो, अशा प्रकारे जर आपण पाच दिवस हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या शरीरातील अनेक समस्या लवकरच दूर होतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.