पाय आणि पोटरी दुखते का.? किती दिवस सहन करायचे.? आता करा हा उपाय आयुष्यात कधी पाय दुखणार नाही.!

आरोग्य

अनेकदा आपल्या घरामधील म्हातारे लोक आपल्या अशा काही आजारांना घेऊन त्रस्त असतात जसे की गुडघेदुखी, पायांमध्ये येणारे क्रंप,नसांमध्ये झालेले ब्लॉकेज आणि या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आपण अनेक प्रयत्न करत असतो, जसे की मोठ मोठ्या डॉक्टरांचे सल्ले घेणे, औषध उपचार करणे किंवा दररोज इंजेक्शन देखील घेणे यामुळे आपले पाय किंवा आपले गुडघे बरे होणे ही तर दूरची गोष्ट आहे पण त्यामुळे आपल्या शरीरावर वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

प्रत्येक वेळी नाही तर काही वेळेस त्याचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळत असतात. हा त्रास भरपूर दिवस राहिला तर याचे रूपांतर एका मोठ्या आजारामध्ये होऊ शकते, त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. आजचा उपाय केल्याने तसेच या उपायाचा वापर केल्यामुळे आपली गुडघेदुखी, नसांमध्ये होणारा त्रास आणि पायांमध्ये येणारे वात देखील कायमचा निघून जाईल.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा उपाय बनविण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचा आहे तो म्हणजे कापूर. आपल्याला तो कापूर घ्यायचा आहे जो आपण घरातील पूजा करण्यासाठी वापरतो. आयुर्वेदामध्ये देखील कापराचे महत्व भरपूर आहे. वर्षानुवर्ष कापराचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो.

कापूर हा अँटिबायोटिक असतो त्याचप्रमाणे त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात मुख्यतः त्वचेसाठी कापूर हा अमृता समान मानला जातो. म्हणूनच आपल्याला इथे तीन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यांची बारीक पूड तयार करायची आहे. कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो.

हे वाचा:   केसांना काळे करणे सोडून द्यावे लागेल.! कारण आता घरचे काही साहित्य वापरून होतील काळेभोर केस.! एकदा नक्की वाचा आभार मानावे लागेल.!

तुम्ही त्वचेवरील भाजलेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावू शकता. व्हॅसलीनमध्येही कापराचा अंशतः वापर केलेला असल्यामुळे ते वापरण्यासही काहीच हरकत नाही. म्हणून आपल्याला इथे कापराचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ते म्हणजे लिंबू. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते त्याचबरोबर आपल्या शरीरांमध्ये स्नायू मजबूत बनविण्यासाठी लिंबाचा वापर हा फायदेशीर ठरतो. इथे आपल्याला एका लिंबाचा वापर करायचा आहे. एका मोठ्या पात्रामध्ये कमीत कमी एक ते दोन लिटर पाणी घ्यायचे आहे. हे पाणी गरम असले पाहिजे.

या पाण्याचे प्रमाण एवढे गरम ठेवायचे आहे जेवढे आपण आपल्या पायांना सहन करू शकू आणि या पाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेली कापराची पूड देखील टाकायची आहे आणि एक कापून घेतलेले लिंबू त्यामध्ये पिळून ते लिंबू देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपले दोन्हीही पाय यामध्ये बुडवून कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी बसायचे आहे.

हे वाचा:   भेंडी ठरली केसांसाठी सर्वात रामबाण औषधी.! भेंडी केसांना अशी लावल्यास केस दुपटीने वाढू लागतात तसेच केसातला कोंडा होतो गायब.!

ही प्रक्रिया झोपण्यापूर्वी करायची आहे,जेणेकरून आपल्या स्नायूंना आराम मिळेल आणि आपल्या शरीरासंबंधीत किंवा आपल्या गुडघ्यांसंबंधीत असणारे सर्व आजार यामुळे बरे होतील. दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काळया मनुका रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत. काळ्या मनुकात एन्थोकाइनिन्स पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा लिनोलेनिक एसिड, पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषकघटक असतात.

काळ्या मनुकामुळे र’क्त प्रवाह वाढतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच काळ्या मनुका ह्या हृदय, डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदशीर असतात. आपल्या नसा देखील मोकळ्या होण्यासाठी मदत होते.या भिजलेल्या मनुका आपल्याला दररोज सकाळी खायच्या आहेत. भिजत ठेवलेले पाणी देखील आपण पिऊ शकतो पण मनुका भिजत घालण्यापूर्वी आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहेत.

जेणेकरून आपल्याला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही.जर मनुके वर धूळ माती साचली असेल तर ती देखील निघून जाणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.