खोबरे आणि फुटाणे सलग दहा दिवस खाल्ले आणि काय झाले बघा.! डॉक्टर सुद्धा आहे हैराण.!

आरोग्य

माणसाला एका ठराविक वयानंतर थकवा हा येतोच,पण अनेकदा हा थकवा येण्यामागे वेगळी कारणे असतात. जसे की एक ठराविक वय होण्याआधीच थकवा येणे ही लक्षणे आजारपणाची असु शकतात त्यामुळे आपल्याला तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. आज कालच्या बदलत्या जगामध्ये आपली खाद्य संस्कृती देखील बदलत चालली आहे पण किती खायचे आणि कोणत्या प्रमाणात खायचे हे देखील लक्षात घेणे गरजेचे असते.

कधी कधी आपण खूप जास्त प्रमाणात बाहेरच्या गोष्टी खात असतो आणि त्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. काही गोष्टी आपल्या शरीराला सूट करत नाही त्यामुळे आपण आजारी पडतो. बाहेरच्या तेलकट,तुपकट गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये पित्ताची पातळी वाढते त्याचबरोबर जर पोषक तत्वे शरीराला मिळाले नाहीत तर कॅल्शियम चे प्रमाण शरीरातून कमी व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते तेव्हा आपल्याला थकवा आळस येतो व हाडांचे दुखणे देखील चालू होते.

जर या समस्या असतील तर आजचा आपला घरगुती उपाय हा तुमच्यासाठीच महत्वाचा ठरणार आहे, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामधील पोषक तत्वांचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वापरायचे आहे ते म्हणजे गुळ. गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. गुळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होतात.

गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे. गुळामध्ये आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी जतन करून ठेवण्याची सवयसुद्धा गुळाने मोडण्यास मदत करते व आपले वजन कमी होते. साधारण सर्दी-खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गूळ मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. म्हणून इथे आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   या तीन सवयी सोडल्या तर चेहरा होईल दुधासारखा पांढरा, तुम्हालाही असतील या वाईट सवयी तर आजच्या आज सोडून द्या.!

गुळासोबत दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे चणे. आता चणे किती औषधी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित असेल. चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन व कॅल्शियम असते व हे चणे औषधी गुणधर्मांचे भंडार आहेत. रात्रभर भिजत टाकून सकाळी मधाबरोबर खाल्ल्यास ते एक उत्तम टॉनिक आहेत. भिजत घातलेल्या चण्याचे पाणीही अत्यंत पौष्टिक असते. मोड आलेल्या हरभ-यात बी कॉम्प्लेक्स व इतर जीवनसत्वे विपुल असतात.

त्यामुळे चण्यांचे सेवन दररोज देखील केले तरी देखील आपल्या शरीरातील निम्मे रोग कायमचे बरे होतील निम्मे आजार कायमचे निघून जातील. जर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती नसेल तर आपण आजारांना बळी पडतच राहू म्हणूनच आपल्याला सणांचे सेवन करायचे आहे. भाजलेल्या चण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी आरोग्यासाठी चांगली मानली जातात. चणे खाल्ल्याने पचनक्रिया बळकट होण्यास मदत होते.

एवढेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते. जर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तर आपल्या शरीरात रोगांना वाव मिळणार नाही. तुम्हाला कोणतेही गंभीर आजार आपल्याला कधीच होणार नाहीत म्हणूनच दररोज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी दिवसातून कधीही आपल्याला वेळ मिळेल तेव्हा एक छोटा गुळाचा तुकडा व चणे आपल्याला खायचे आहेत.

हे वाचा:   जर एखाद्या व्यक्तीने कच्चा पालक खाल्ला तर काय होते.! पालकला आयुर्वेद का म्हणते अमृत.? हे आजार कायमचे नष्ट करते.!

गरमीमध्ये तर हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो शिवाय आपण कोणत्याही ऋतूमध्ये या उपायाचे सेवन करू शकतो कारण चणे हे औषधी आहेत व गूळ देखील औषधी आहे.या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो व आपल्या शरीरामधील थकवा कायमचा निघून जातो त्याचबरोबर कॅल्शियमची पाकळी देखील वाढते. त्यानंतर हाडांच्या दुखण्यावर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे सेवन करायचे आहे.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरे तेलाचा उपयोग होतो. खोबऱ्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे संधिवाताच्या समस्या टाळण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणूनच येथे आपल्याला सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी छोटे छोटे तुकडे सुके खोबरे थंड पाण्यात भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करायचे आहे, असे केल्यास कंबर दुखी, गुडघेदुखी व हाडांचे दुखणे शिवाय संधिवात सारखी समस्या देखील कायमची दूर होईल.

जर भिजत ठेवायला वेळ नसेल तर सुके खोबरे असेच दररोज सकाळी जाऊन खाल्ले तरी ते देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.