केस गळती, केसांचे तुटणे आणि केसांची गेलेली चमक पुन्हा परतेल, चमक परत आणण्यासाठी फक्त एकदा हा घरगुती उपाय अवश्य करा!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण केस वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात त्याचबरोबर केस वाढताना देखील आपले केस तुटू लागतात त्याचप्रमाणे केस गळती देखील झपाट्याने वाढू लागते अश्या अनेक समस्या प्रत्येकाला त्रास देतात. अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक प्रकारचे शाम्पू किंवा बाहेर पार्लरमध्ये जाऊन मोठमोठ्या ट्रीटमेंट करणे या सर्व गोष्टी करत असतो पण त्यामुळे देखील आपल्या केसांवर फारसा असा काही फरक दिसून येत नाही.

त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत घरबसल्या घरगुती गोष्टीमुळे आपण आपल्या केसांची काळजी कशी ठेवू शकतो याबद्दल त्याचबरोबर केसांची गेलेली चमक परत कशी आणू शकतो. केस गळती आणि केसांचे तुकडे कशाप्रकारे थांबू शकतो हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे.

हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया काय असणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचे आहे ते म्हणजे एलोवेरा म्हणजेच कोरफड.  आता इथे फक्त आपल्याला एलोवेरा जेलचा वापर करायचा नाही तर आपल्याला एलोवेरांच्या फांद्यांचा म्हणजेच कोरफडीच्या पूर्ण फांदीचा वापर करायचा आहे.कोरफड हे आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड मुळे केसांचे गळणे कमी होते.

आपले केस वाढण्यासाठी मदत होते. कोंडा कमी करण्यास कारणीभूत कोरफड ठरते. तुमच्या डोक्यातील खाज दूर होते. असे अनेक फायदे आपल्याला कोरफडीपासून होत असतात त्यामुळे कोरफड आपल्या केसांमध्ये लावणे म्हणजे हे संजीवनी औषध मानले जाते त्यामुळे आपल्याला केसांना अनेक औषधी गुणधर्म देखील कोरफड मुळे मिळतात.

हे वाचा:   चमकदार दात हवे असतील तर रात्रीच्या वेळी करा हे १ काम; दात मोत्यासारखे चमकतील.!

आपल्या केसांना कोरफडचे अनेक फायदे देखील होतात आणि भरपूर पोषक तत्वे देखील मिळतात. त्यामुळे जर मोठी कोरफड फांदी असेल तर एक किंवा छोटी असेल तर दोन कोरफडीच्या फांद्या काढून घ्यायचे आहेत. कोरफडीचा वापर करण्याआधी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा आपण कोरफड फांदी कापून वापरतो तेव्हा त्यामधील पिवळा रंगाचे द्रव्य वापरू नये.

कारण हे द्रव्य आपल्या शरीरासाठी आपल्या केसांसाठी किंवा आपल्या त्वचेसाठी विषारी ठरू शकते त्यामुळे कोरफड कापून झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी कोरफड मुळा कडून उभी करून ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावर येणारे पिवळ्या रंगाचे द्रव्य आपल्याला कापून टाकायचे आहे जेणेकरून कोरफड वापरण्यासाठी औषधी तयार होईल त्यानंतर कोरफडीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत.

आता दुसरी गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ते म्हणजे काळे आणि पांढरे तीळ. तिळाचे तेल केसांकरीता फायदेशीर आहे असे रिसर्चनुसार सिद्ध देखील झाले आहे म्हणूनच हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये तिळाच्या तेलाचा वापर केला जात आहे. हेअर केअर प्रोडक्ट्ससोबतच स्किन केअर उत्पादनांमध्ये देखील तिळाच्या तेलाचा समावेश केलेला आढळतो. आपण आपल्या केसांची निगा राखण्यासाठी काळातील आणि पांढरे तीळ अशा दोन्ही तिळांचा वापर करू शकतो.

हे वाचा:   छातीचे हाड खूप दुखणे का? वारंवार छातीत कफ तयार होतो का..? हा रामबाण उपाय सगळ्यांची सुट्टी करेल.!

त्यामुळे कोरफडीचे करून घेतलेले तुकड्यांमध्ये एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा पांढरे तीळ टाकून त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला आपल्या केसांवर व्यवस्थित रित्या लावून घ्यायची आहे. या पेस्टचा वापर आंघोळीपूर्वी एक तास करायचे आहे, जेणेकरून यामधील असलेले पोषक तत्वे आपल्या केसांना मिळतील आणि केस मजबूत होण्यास मदत होतील.

शाम्पू मुळे केवळ आपल्या केसांना स्वच्छ करण्यास मदत होते पण त्यामधून पूर्णपणे आपल्याला पोषक तत्वे मिळत नाहीत त्यामुळे हा घरगुती उपाय केल्याने आपल्या केसांमध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढेल केस मजबूत होतील सोबतच मुलायम आणि सिल्की देखील होते. केस गळती बंद होईल आणि केस झपाट्याने वाढू लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.