एक कांदा आणि दहा रुपयाची मेहंदी.! जबरदस्त केस काळे होतील.! केसांना काळे कुळकुळीत बनवा असे.!

आरोग्य

आपल्या घरामध्ये किंवा आपल्यापैकी अनेक जणांचे केस पांढरे होत असतात. काही जणांचे वय झाल्यामुळे त्यांचे केस पांढरे होतात तर काहींना अनुवंशिक असल्यामुळे त्यांचे केस पांढरे होतात, तर काहींचे टेन्शनमुळे होतात आणि या पांढऱ्या झालेल्या केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. हे केस परत काळे बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत असतो, जसे की डाय लावणे. किंवा मेहंदी लावणे जर मेहंदी चा वापर करत असू तर तो जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसच टिकून राहतो.

कधी कधी आपल्याला बाहेर कुठेतरी कोणत्यातरी फंक्शनला जायचे असते आणि आपले केस मात्र पांढरे असतात म्हणजेच कुठेतरी एखादा केस पांढरा असतो किंवा कानाजवळ आपले केस पांढरे होतात आणि आपण घाईगडबडीमध्ये काही गोष्टी तेव्हा करू शकत नाही. आपल्याला तसेच आपले पांढरे केस घेऊन बाहेर जावे लागते त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

जो उपाय केल्यामुळे आपल्याला काही क्षणांमध्येच आपले पांढरे केस काळे करायला मदत मिळेल, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागते आणि हा घरगुती उपाय बनवण्यासाठी ची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कांद्या ची साल लागणार आहे. म्हणजेच कांदा सोलून झाल्यावर ज्या कांद्याच्या पाती हवेमध्ये उडत असतात आणि ज्यामुळे आपले घर खराब होते.

त्याच कांद्याच्या पाती आपल्याला वापरायच्या आहेत. आपल्याला कांद्याच्या जाड-पातींचा वापर करायचा नाही आहे एकदम हलक्या असतात त्यांचाच वापर करायचा आहे. सर्वप्रथम कोणतीही कढई किंवा कोणताही जुना तवा आपल्याला गॅसवर ठेवून गरम करायचा आहे आणि त्यामध्ये या कांद्याच्या पाती टाकून मंद आचेवर या भाजून घ्यायच्या आहेत. जेणेकरून त्या हळूहळू कडक होतील अशा प्रकारे त्या भाजायच्या आहेत.

हे वाचा:   फक्त एकच पान तोडून आणा; पित्त कायमचे गेले म्हणून समजा, नॉर्मल सर्दी-खोकला कधीच होणार नाही, रामबाण आयुर्वेदिक पान.!

जोपर्यंत त्यांचा रंग काळा होत नाही तोपर्यंत भाजत राहायचे आहे आपल्याला त्या लवकर भाजल्या पाहिजेत म्हणून गॅस जास्त मोठा करायचा नाही आहे. मंद आचेवर त्या भाजून घ्यायच्या आहेत. कमीत कमी सात ते आठ मिनिटांमध्ये या भाजून तुम्हाला मिळतील त्यांचा रंग काळा झाल्यावर गॅस बंद करून त्या थोड्याशा थंड झाल्यावर मिक्सरला लावून त्यांची बारीक पावडर तयार करायची आहे.

आता ही पावडर आपण स्टोअर करून देखील ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा त्याचा वापर आपण करू शकतो. आता आपल्याला अचानकपणे कुठेतरी बाहेर जायचे आहे आणि आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही आहे किंवा आपले केस पांढरे झाले आहेत काना जवळ पांढरे केस दिसत आहेत किंवा कुठेतरी मध्ये एखादा केस पांढरा झाला आहे तर अशावेळी या पावडरमध्ये एक चमचा व्हॅसलीन टाकून जिथे जिथे आपले केस पांढरे झाले आहेत तिथे ही पेस्ट लावायची आहे.

हा उपाय मुख्यतः पावसाळ्यात वापरण्यासारखा आहे कारण यावर जरी पाणी पडले तरी देखील हा काळा रंग उतरून तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये करू शकता. कुठेतरी बाहेर जायच्या आधी पाच मिनिटे आधी जरी हा उपाय तुम्ही तुमच्या केसांवर केला तरी अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे मिश्रण तुमच्या केसांवर सुकून जाईल आणि पाण्यामुळे देखील त्यावर कोणताही फरक जाणवणार नाही.

हे वाचा:   या वनस्पतीचे चमत्कारी फायदे, केवळ एका दिवसात बरा होतो कसलाही त्वचा रोग.!

त्यानंतर जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकून मेहंदी लावल्यास आपले केस काळे होतील आणि जी मेहंदी आपल्या केसांवर फक्त पाच-सहा दिवसांसाठी टिकते तीच मेहंदी दहा-पंधरा दिवसांसाठी टिकून राहण्यास मदत होईल त्यामुळे जेव्हा आपण मेहंदी लावू तेव्हा एक चमचा पावडर यामध्ये टाकून पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांचा वापर आपल्या केसावर करायचा आहे.

या मेहंदीला जर रात्रभर ही पावडर टाकून भिजत ठेवल्यास त्याचा अधिक प्रमाणात फायदा आपल्याला दिसून येईल. यामुळे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.