थकवा, कमजोरी आयुष्यातून कायमचे निघून जातील, दुपटीने ताकद वाढवेल हा उपाय.! आयुष्यात एकदा तरी करून बघावा.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण शरीरात वारंवार आलेला अशक्तपणाला कंटाळलेले असतात आणि त्रासलेले देखील असतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक मंडळी असतात ज्यांना नेहमी अशक्तपणा त्रास देतो त्याचबरोबर असे देखील काही लोक आहे जे कोणत्याही प्रकारची मेहनत जास्त प्रमाणात करत नाही तरी देखील त्यांना वारंवार अशक्तपणा जाणवत असतो. बहुतेक वेळा शरीरामध्ये र’क्ताची कमतरता निर्माण झाल्याने अशक्तपणा त्रास देतो, अशावेळी चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या होणे अशा अनेक समस्या त्रास देत असतील.

तुम्हाला देखील वारंवार अशक्तपणा सतावत असेल तर आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची निर्मिती लवकर होणार आहे त्याचबरोबर हिमोग्लोबिनचे पर्यंत प्रमाण देखील वाढणार आहे. आपण अनेक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे आपल्याला एनर्जी आली पाहिजे म्हणजेच आपण सशक्त राहिलो पाहिजे पण तेवढे करून देखील दिवसभर आपल्याला भरपूर कंटाळा येतो.

आळस येतो अशक्तपणा येतो आणि यासाठी आपण काहीच करू शकत नाही. कितीही केले तरी आपला आळस निघून जात नाही. आपल्याला सतत अशक्त असल्यासारखे वाटू लागते आणि त्यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे घेतो आणि त्या औषधाने देखील फारसा काही फरक आपल्यावर दिसून येत नाही. आज आपण असा काही एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत,ज्यामुळे आपल्याला एनर्जेटिक फील होईल सोबतच दिवसभर येणारा आळस कायमचा निघून जाईल आणि आपण लवकरच सशक्त होऊ.

आपल्याला येणारा कंटाळा कायमचा नाहीसा होईल. दिवसभर आपण फ्रेश राहू. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे त्याबद्दल. हा घरगुती उपाय म्हणजेच आपल्याला अशा काही गोष्टींचे सेवन करायचे आहे ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारा आळस कायमचा निघून जाईल त्याचबरोबर आपल्याला या गोष्टींमधून भरपूर पोषक तत्वे मिळतील ज्यामुळे आपण दिवसभर एनर्जेटिक फील करू.

हे वाचा:   कोलगेटच्या उपायाने नाकावरची सगळी घाण स्वच्छ होईल.! नाकावर असलेले ब्लॅक हेडस कायमचे घालावा.! त्वचा बनवा एकदम मऊ.!

चण्यामध्ये लोह मोठ्याप्रमाणात असते त्यामुळे काळे चणे खाल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते म्हणजेच शरीरातील र’क्ताची कमतरता दूर होते. नियमितपणे चणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो म्हणून आपल्याला दिवसातून एकदा तरी चण्याचे सेवन केले पाहिजे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर चणे रात्रीचे भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून आपण त्या चण्यांचे सकाळी सेवन करू शकतो आणि आपल्याला येणारा आळस आपल्या शरीरातील अशक्तपणा हे कायमचे निघून जाऊ शकते.

त्याचबरोबर आपल्या र’क्तामधील लाल पेशींची वाढ देखील होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे चणे खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी असते. दररोज आपल्याला सकाळी उठल्यावर भिजलेले मूठभर चणे खाल्ले पाहिजेत. हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय म्हणजे आपल्याला दररोज सकाळी भिजलेले बदाम देखील खाणे गरजेचे आहे. रोज नेमाने बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.

भिजलेले बदाम खाल्ल्याने र’क्तात अल्फाल टोकोफेरॉलची मात्रा वाढते, जी एक सामान्य ब्लड प्रेशरला व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. बदाम हे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. बदाम शरीरातील चांगले कोलेस्टरॉलची मात्रा वाढवण्यात आणि ‘खराब’ कोलेस्टरॉलच्या स्तराला कमी करण्याचे कार्य करतात. त्याचबरोबर आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बदाम खाणे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे सोबतच आपल्या शरीरामधील आळस हा बदाम खाण्याने कमी होतो.

म्हणून दररोज रात्री आपल्याला एका माणसासाठी पाच बदाम भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्याची साले काढून आपल्याला हे बदाम खायचे आहेत. बदामाचे सेवन आपल्याला साले काढून करायचे आहे. जर तसे त्यांचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात त्याचबरोबर बदाम आणि चणे यासोबत आपण भिजलेले शेंगदाणे खाल्ले तर ते देखील आपल्या शरीरासाठी त्यापेक्षाही फायदेशीर असतात.

हे वाचा:   पचन योग्य ठेवायचे असेल तर या गोष्टी वारंवार करत रहा, कधीच अपचन होणार नाही.!

त्यामुळे रात्री झोपताना एक मूठभर शेंगदाणे भिजत घालून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते याशिवाय यामुळे शारिरीक उर्जा ही चांगली राहते. रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने अँटीऑक्सिडेंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराला क’र्क’रोगाच्या पेशी विरूद्ध लढायला मदत करतात म्हणूनच दररोज मूठभर भिजलेले शेंगदाणे खाल्यास आरोग्यास फायदेशीर ठरतात.

दररोज सकाळी उठल्यानंतर या तीन गोष्टींचे सेवन जरी केले तरी ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासोबतच आपल्याला एक तुकडा गुळाचा खायचा आहे. गुळामध्ये लोह, फोलेट सारखे पोषक तत्व असतात असे मानले जाते, जे शरीरातील रेल र’क्त पेशी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. जर तुम्ही दररोज गुळाचे सेवन केले तर शरीरातील लोहाची कमतरता भरून निघेल. गुळामुळे सांधे दुखीपासूनही आराम मिळेल.

रोज सकाळी गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीमुळे होणाऱ्या इतर समस्यांपासून आराम मिळतो. या सर्व गोष्टींबरोबरच गुळ खाणे देखील आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे. या सर्व गोष्टींचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळेल. आपला आळस कायमचा निघून जाईल सोबतच अशक्तपणा देखील येणार नाही.आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही उलट याचा फायदाच होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.