गळणाऱ्या केसांना वेळीच थांबवा.! आता एकही केस कंगव्यात सापडणार नाही.! आयुष्यातून केसगळती हा प्रकार निघूनच जाईल.!

आरोग्य

शरीरात होणाऱ्या बदलामुळे देखील आपल्या केसांची गळती होत असते. केसांची गळती झाली की आपले केस हळूहळू अत्यंत विरळ होत जातात. केस गळती टेन्शन मुळे देखील होऊ लागते, त्याचबरोबर आपल्याला टेन्शन असेल की आपले केस हळूहळू ग्रे म्हणजेच करड्या रंगाचे देखील होऊ लागतात. आपण या केसांसाठी वेगवेगळ्या तेलाचा वापर करतो. वेगवेगळे शाम्पू देखील वापरतो पण त्यामुळे हवा तसा फरक दिसून येत नाही.

आपल्या केसांची लांबी काही वाढत नाही. केसांची लांबी वाढविण्यासाठी आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, या उपायाच्या फक्त तीन ते चार वापराने आपल्याला आपल्या केसांमध्ये झालेला बदल दिसून येईल, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे वापरायचे आहे ते म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीच्या तेलात ऐंटीऑक्सीडेंट्स, ऐंटीफंगल, ऐंटी बैक्टीरियल, विटमिन-ए, विटमिन-डी, विटमिन-ई, विटमिन-के, कॅल्शियम, आयरन, मैग्निशियम असे घटक आढळतात. हे सर्व घटक केसांसाठी खूप फायदेशीर असून केसांच्या समस्या दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच जाणकार सुद्धा मोहरीच्या तेलाचा वापर करतात.

आपल्या पूर्वजांपासून मोहरीचे तेल वापरण्यात आले आहे कारण या तेलामध्ये अनेक गुणधर्म असतात,जे आपल्या औषधी या गुणधर्मामुळे आपल्या केसांची लांबी वाढण्यास मदत करतात म्हणूनच आपल्याला आज येथे मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. एक वाटी मोहरीचे तेल आपल्याला एका पात्रामध्ये ठेवून ते गॅसवर ठेवायचे आहे.

या उपाया मध्ये दुसरी गोष्ट आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे मेथी दाणे. मेथीदाण्यांचे आपल्या केसांसाठी किती फायदे आहेत हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीत असेल. केसांना घनदाट, निरोगी आणि मजबूत करण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो. मेथी मध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आपले केस घनदाट तर बनतात त्याच बरोबर केस गळती देखील थांबते.

हे वाचा:   एक खोबरे असे वापरा, जुन्यातील जुनी सायनस, मायग्रेन, कफ, डोकेदुखी, डोळ्यांची कमजोरी सर्व होईल दूर...!

म्हणूनच मेथीची भाजी देखील खाल्ली तरी देखील ते आपल्या शरीरासाठी चांगले असते व मेथीचा असा वापर देखील आपण करू शकतो त्यासाठी दोन चमचे मेथी आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे, त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे लवंग. लवंग आपण इथे यासाठी वापरत आहोत जेणेकरून आपली केसातील त्वचा ही निरोगी रहावी.

कधी कधी या त्वचेवर डँड्रफ निर्माण होतो म्हणजेच आपल्या केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. कोंडा झाला की केस गळती वाढते आणि केस गळती वाढले की आपल्या केसांचे वाढणे देखील थांबते म्हणूनच आपण यासाठी लवंग चा वापर करत आहोत त्याच्यामुळे दोन ते तीन लवंग आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत. आता महत्त्वाची गोष्ट यामध्ये वापरायची आहे तो म्हणजे कांदा.

इथे आपल्याला दोन कांद्यांचा वापर करायचा आहे. केस तुटणे आणि निस्तेज झाल्यामुळे केसांचे सौंदर्य कमी होऊ लागते. कांद्याचा उपयोग केसांसाठी भरपूर आहे. कांद्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला केसांना मजबूत बनविण्यासाठी मदत करतात. आपले केस मजबूत करतात. मुळापासून केस स्ट्रॉंग बनवतात आणि केस गळती होत नाही शिवाय आपले केस काळेभोर होतात.

म्हणूनच आपल्याला येथे कांद्याचा वापर करायचा आहे त्यामुळे दोन कांदे मधोमध कापून आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे. कांदा तेलामध्ये टाकण्यापूर्वी त्याची साले काढायची नाही आहे. अनेकदा आपण कांद्याची साल देखील काढतो पण इथे आपल्याला सालचा देखील वापर करायचा आहे. आता हे सर्व गोष्टी मोहरीच्या तेलामध्ये एकरूप होईपर्यंत उकळवायचे आहेत.

हे वाचा:   पावसाळ्यात होणारी सर्दी होईल अशाप्रकारे झटपट मोकळी, असा उपाय कदाचित तुम्ही कधीच एकला नसेल.!

मंद आचेवर हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये टाकलेला सर्व गोष्टींचे औषधी गुणधर्म या तेलामध्ये येतील व हे तेल आपल्यासाठी अत्यंत गुणकारी ठरेल. दहा मिनिटे मंद आचेवर हे तेल उकळवून घेतल्यानंतर याचा वापर आपल्याला आपल्या केसांवर करायचा आहे. आठवड्यातून तीन दिवस आपल्याला हे तेल लावायचे आहे.

तेल लावण्यापूर्वी आपल्याला केस ओले ठेवायचे नाही आहेत सोबतच हलक्या हाताने मसाज करून हे तेल आपल्याला मुळापर्यंत लावायचे आहे. एका आठवड्यामध्ये केस गळती थांबेल व केस हळूहळू वाढायला चालू होतील. एका आठवड्यामध्ये आपल्याला बेबी हेअर दिसू लागतील म्हणजेच छोटे छोटे केस आपल्याला दिसू लागतील, नवीन ग्रोथ होईल.

त्याचप्रमाणे यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे औषधी गुणधर्मांनी भरपूर असल्यामुळे याचा आपल्या केसांवर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही शिवाय या गोष्टी रोजच्या वापरातील असल्यामुळे आपल्याला यामुळे कोणताही प्रकारची हानी देखील होणार नाही उलट फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.