स्वतः चे पिवळे दात आता दुसऱ्यांना दाखवणे बंद करा.! मोत्या सारखे दात चमकवायचे असतील तर हा आहे सोपा उपाय.!

आरोग्य

दररोज दात व्यवस्थित न घासल्यामुळे दातांची व्यवस्थितरित्या काळजी न घेतल्यामुळे आपल्याला दातांचे अनेक आजार होत असतात. जसे की दातांना कीड लागणे किंवा दात पिवळे पडणे, हिरड्यांना सूज येणे अशा प्रकारचे अनेक आजार आपल्याला होत असतात. या आजारांना आपल्याला अनेकदा सामोरे जावे लागत असते.

जर दररोज दात घासले नाही तर आपल्या दातांचे आजार हे दिवसेंदिवस वाढत जातील. दुखण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाईल म्हणूनच आपल्याला दररोज दात घासणे गरजेचे आहे. पण कधी कधी ह्या गोष्टी न केल्याने आपल्याला मोठ्या आजारांना देखील सामोरे जावे लागते जेव्हा असे होते तेव्हा अनेकदा आपण डॉक्टर कडे जातो. अन् महागडी ट्रीटमेंट करतो.

अशा मोठ्या आजारांना आपल्याला सामोरे जायचे नसेल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठी आहे. जर तुमचेही दात पिवळे झाले असतील तर ते फक्त एका वापराने कसे शुभ्र होतील यासाठीचा आजचा घरगुती उपाय आहे, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे.

दात स्वच्छ ठेवायचे म्हटले की ते दररोज सकाळ संध्याकाळ कोणत्याही टूथपेस्टने स्वच्छ करणे गरजेचे असते, म्हणून सर्वप्रथम आपल्याला इथे आपला उपाय बनविण्यासाठी पहिली गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे टूथपेस्ट. तुम्हीही कोणत्याही उच्च ब्रँडची घेऊ शकता पण ती पांढऱ्या रंगाची असली पाहिजे. टूथपेस्ट आपले दात स्वच्छ ठेवण्यास मदत करते म्हणून इथे एक चमचा टूथपेस्ट घ्यायची आहे.

हे वाचा:   जेवल्यावर फक्त दोन चमचे.! ना औषध ना गोळी.! हातापायाची आग होणे होईल कायमचे बंद.!

दुसरी गोष्ट आपल्याला वापरायची आहे तो म्हणजे बेकिंग सोडा. जर एक चमचा टूथपेस्ट आपण वापरत असू तर चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. बेकिंग सोडा आपल्या दातांवरील पिवळ्या रंगाची परत काढून टाकण्यासाठी मदत करतो म्हणून बेकिंग सोड्याचा वापर आपल्याला करायचा आहे. पण जास्त प्रमाणात याचा वापर करू नये म्हणून आपल्याला इथे चिमूटभर वापरायचा आहे.

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने. आता कडुलिंबाची पाने आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते आपल्याला सर्वांनाच माहीत असेल. आपले दात मजबूत ठेवण्यासाठी, दातातील कीड कायमची मारण्यासाठी अनेक औषधाने भरलेली व गुणधर्मांनी समृद्ध असलेली अशी कडुलिंबाची पाने आपल्याला वापरायची आहे त्यामुळे यामध्ये दोन ते तीन पाने बारीक करून त्याची पेस्ट यामध्ये टाकायचे आहे.

सोबतच अर्धे लिंबू देखील यामध्ये टाकायचे आहे. अर्ध्या लिंबाचा रस एवढ्या मिश्रणासाठी पुरेसा असेल. लिंबाचा वापर यासाठी करत आहोत कारण लिंबा मध्ये क्लिनिंग प्रॉपर्टी असते त्यामुळे आपले दात लवकरात लवकर शुभ्र होण्यास मदत होते. आता या चारही गोष्टींना एकत्रितपणे मिक्स करायचे आहे व त्यानंतर या पेस्टचा वापर आपल्याला दातांवर करायचा आहे.

हे वाचा:   जळालेले भांडे आता पाच मिनिटात होतील चांदी सारखे स्वच्छ, करावा लागेल फक्त एवढी एक ट्रिक्स.!

जसे की दररोज सकाळी उठून आपण ब्रश करतो म्हणजे आपले आपण दात घासतो त्याच प्रकारे या पेस्टचा वापर करून आपले दात व्यवस्थित रित्या घासायचे आहे.सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस या मिश्रणाचा वापर आपण करू शकतो याची ठराविक अशी वेळ नाही. या पेस्टचा वापर दररोज देखील आपण करू शकतो या पेस्टच्या फक्त एका वापरानेच आपले दात स्वच्छ शुभ्र झालेले दिसून येतील शिवाय दातांमध्ये कीड असेल तर ती देखील मरून जाईल.

हिरड्या सुजणे हा प्रकार देखील कायमचा बंद होईल, अशाप्रकारे आपले दात निरोगी व स्वच्छ राहतील आणि एवढेच नाही तर तुमचे दात मोत्यासारखे चमकतील देखील या पेस्ट मध्ये वापरल्या गेलेल्या सर्व गोष्टी दररोज वापरातील असल्यामुळे व औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्यामुळे आपल्या दातांवर याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.