शाम्पू लावताच ना.! मग, त्यात हा एक पदार्थ मिक्स करून केसांना लावा भरभर वाढतील केस, चमक तर इतकी की सर्वजण केसांच्या प्रेमातच पडतील.!

आरोग्य

सर्वांनाच असे वाटत असते की आपले केस सर्वात जास्त लांब असले पाहिजेत. लांब सडक असल्या सोबतच ते केस काळेभोर देखील असले पाहिजेत, चमकदार असले पाहिजेत आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या शाम्पूचा वापर करणे त्याचबरोबर पार्लरमध्ये जाऊन त्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेणे अशा प्रकारे आपण आपले केस लांब सडक होण्यासाठी प्रयत्न करत असतो.

पण कधी कधी या सर्व गोष्टींमुळे आपले केस वाढत नाहीत. आपण अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करतो. या सर्व वस्तूंचा वापर केल्याने आपले केस तुटू लागतात. केसांची गळती सुरू होते म्हणून आज आम्ही तुमच्या साठी एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर केल्यामुळे आपल्या केसांची गळती होणार नाही उलट केस वाढू लागतील. केसांवर एक चमक येईल आणि आपले केस चांगले शाईन करायला लागतील.

चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचे आहे ते म्हणजे तांदूळ. तांदूळाच्या पाण्याचा उपयोग केल्यास तुमच्या रूक्ष आणि कोरड्या केसांची समस्या दूर होऊ शकते. या पाण्याचा वापर केल्याने केसांचं टेक्श्चर चांगलं होतं. या पाण्यातील इनोसिटोल तत्त्वांमुळे केसांचा फ्रिजीनेस निघून जातो आणि केस चमकदार व मजबूत होतात.

त्यामुळे एका पाच मध्ये एक ते दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हे तांदूळ तीन ते चार तासासाठी तसेच त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसरा बाजूला आपल्याला एका वाटीमध्ये शाम्पू घ्यायचा आहे. कोणताही शाम्पू जो आपण दररोज आपल्या केसांसाठी वापरत असो हा शाम्पू घेतल्यानंतर आपण चार तास भिजत ठेवलेले पाणी घ्यायचे आहे.

हे वाचा:   फक्त या पदार्थाचा वास घ्या..! हिवाळ्यात सर्दी आणि थंडीमुळे बंद झालेले कान, नाक आता दहा मिनिटात खुले होतील.!

तांदूळ बाजूला काढून त्यातील पाणी आपल्याला या शाम्पू मध्ये टाकायचे आहे आणि शाम्पू व पाणी एकत्रितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे. जेव्हा देखील आपण शाम्पूचा वापर करत असतो तेव्हा तो डायल्युट करून वापरायचा असतो म्हणजेच शाम्पू मध्ये थोडेसे पाणी टाकून मिक्स करून नंतर त्या शाम्पूचा वापर करायचा असतो त्या पाण्याऐवजी आपल्याला तांदळाचे पाणी वापरायचा आहे.

जेणेकरून आपल्या केसांना पोषक तत्वे देखील मिळतील व त्याचबरोबर आपल्या केसांना शाईन येण्यास मदत होईल. आता आपल्याला पुढील पदार्थ वापरायचे आहे ते म्हणजे कांदा. आता कांदा आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल. कांद्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. केस तुटणे आणि निस्तेज झाल्यामुळे केसांचे सौंदर्य कमी होऊ लागते.

केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी आपण कांदा आणि कोरफडीचा वापर करू शकतो यामुळे केसांची वाढ सुधारू शकते आणि इतरही फायदे आहेत. फक्त कांद्याचा केसांवर वापरच नाही तर कांदा खाल्ल्यामुळे देखील हेअर ग्रोथ होण्यास मदत होते यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्याने आपल्या केसांना हवी ती पोषक तत्त्वे मिळतात म्हणूनच इथे आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   घामोळ्या शरीरभर आल्या असतील तर उन्हाळ्यात करायचे हे एक साधे सोपे काम.! एकपण घामोळी उरणार नाही.!

त्यामुळे कांदा किसून त्यातील रस काढायचा आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे कांद्याचा रस टाकायचा आहे. आता या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि केस धुताना म्हणजेच हेअर वॉश करतेवेळी आपल्या केसांवर हे मिश्रण टाकून केसातील त्वचेला व्यवस्थित रित्या मालिश करत आपल्याला आपले केस धुवायचे आहेत पण धुण्यापूर्वी ह्या मिश्रणाने मालिश केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण असेच केसांवर राहू द्यायचे आहे.

जेणेकरून या मिश्रणातील पोषक तत्वे आपल्या केसांच्या मुळापर्यंत जातील आपले केस झपाट्याने वाढायला देखील मदत होईल व केसांवरील शाईन परत येईल. फक्त एक महिना हा उपाय केल्याने आपल्या केसावर विविध चमक येईल केस चमकू लागतील व केसांची वाढ होईल त्याचबरोबर जर केस तुटणे किंवा केस गळती होत असेल तर ती देखील थांबेल. यामध्ये वापरल्या गेलेल्या सर्व गोष्टी ह्या औषधी गुणधर्मांनी भरपूर असल्यामुळे व आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे याचा आपल्या केसांवर कोणत्याही प्रकारचा वाईट व हानीकारक परिणाम होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.