घरीच उगवा इलायची.! कधीच दुकानातून इलायची आणायची गरज पडणार नाही.! महिलांसाठी खास आहे नक्की वाचा.!

आरोग्य

आज कालच्या काळामध्ये वेलची विकत घेणे म्हणजे सोने विकत घेण्या सारखे आहे. वेलचीचा भाव एवढा वाढला आहे की ते विकत घेणे हे खूप महाग गोष्ट झालेली आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की घरी वेलची चे झाड कसे उगवायचे आहे त्यासाठी काय प्रक्रिया आपल्याला करायची आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम वेलची चे झाड उगविण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची वेलची निवडायची आहे ते आपण जाणून घेऊया.

वेलचीचे दोन प्रकार असतात. एक छोटी वेलची असते तर एक मोठे आणि वाळलेली वेलची असते आणि त्यामध्ये मोठे दाणे असतात. अशावेळी आपल्याला मोठी आणि वाळलेली वेलची घ्यायची आहे आणि त्यातील पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणून सर्वप्रथम मोठ्या वेलची दाणे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि ते एका वाटीमध्ये पाण्यात भिजत घालायचे आहेत.

हे दाणे कमीत कमी सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून हे जाणे फुगतील आणि ते आपल्याला वापरायला देखील सहज शक्य होतील आणि त्यात दाण्यांपासून आपल्याला झाड मिळेल. त्यामुळे कमीत कमी बारा ते पंधरा दाणे आपल्याला भिजत घालायचे आहे. आणि तोपर्यंत आपण झाड उगविण्यासाठी ची कुंडी कशी आणि कोणती निवडायची आहे हे पाहणार आहोत.

हे वाचा:   हा उपाय पोटातला गॅस वाढू देतच नाही.! कितीही असू द्या ऍसिडिटीचा त्रास होईल ऍसिडिटी ना येईल पुन्हा पुन्हा पाद.!

वेलची चे झाड हे जास्त करून गरमी असणाऱ्या ठिकाणी वाढत असते म्हणजेच कर्नाटक सारख्या ठिकाणी वेलची आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. हे रोप जास्तीत जास्त गरम पाणीत आपल्याला ठेवायचे आहे. त्यासाठी आपल्याला एक अशी कुंडी तयार करायची आहे ज्याला त्याच्या पृष्ठभागी एक होल असेल. जर तुमच्याकडे तशी कुंडी नसेल तर आपण अशी कुंडी तयार करून घ्यायची आहे.

त्यासाठी आपल्याला प्लास्टिकचे ग्लास घेऊन त्या खाली एक छिद्र पाडून हे ग्लास देखील आपण वापरू शकतो. या ग्लासमध्ये सुखी माती थोडी वाळू आणि कोणत्याही प्रकारचे खत आपण घ्यायचे आहे. तुम्ही मग कोणतेही खत घेऊ शकता. आता हे मिक्स करून घेतलेली माती आपल्याला चार कुंडीमध्ये टाकायची आहे म्हणजेच चार ग्लासामध्ये टाकायची आहे. आता ही माती व्यवस्थित रित्या टाकल्यानंतर त्यावर थोडेसे पाणी टाकून.

माती ओली करून घ्यायची आहे जेणेकरून माती ओली असल्यामुळे आत मध्ये टाकलेले बी उगायला मदत होईल. त्यानंतर भिजून झालेली बी आपल्याला एका सुकलेल्या कपड्यावर पुसुन घ्यायची आहे हळुवारपणे पुसायचे आहे. जेणेकरून या बिया तुटू नयेत. त्यानंतर या बिया हलक्‍या हाताने माती मध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर थोडीशी सुकी माती देखील टाकायचे आहे आणि त्यावर थोडे पाणी शिंपडावे आहे.

हे वाचा:   लिंबू पिळल्यानंतर उरलेले लिंबू फेकून देत असाल तर तुम्ही करत आहात खूप मोठी चूक.! पिळलेल्या लिंबाचा अशा भन्नाट पद्धतीने केला जाऊ शकतो उपयोग.!

पाणी देताना एकदम हळुवार पाणी दिले पाहिजे. जर जोर देऊन पाणी दिले तर वेलची च्या बिया मातीमध्ये जातील आणि झोप यायला थोडेसे कठीण होईल. त्यानंतर हा ग्लास यांना आपल्याला सूर्य किरणात,उन्हात मध्ये ठेवायचे आहे जेणेकरून आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला छोटे छोटे रोप दिसायला लागेल. सात ते आठ दिवसांनंतर आपल्याला छोटे-छोटे रोग दिसायला लागेल.

या झाडाची काळजी घेतल्यास हळूहळू हे रोप मोठे होईल आणि त्याला वेलची देखील लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *