आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कफ, सर्दी या गोष्टींना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला वायरल इन्फेक्शन होत असते. सर्दी, खोकला आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात कफ कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. अनेक प्रकारची वेगवेगळी औषधे खाणे वेगवेगळे सिरप सेवन करणे. या सर्व गोष्टी केल्या तरी आपला कफ काही कमी होत नाही म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपला कफ कायमचा नाहीसा होईल.
तसेच परत कधीच आपल्याला हा त्रास होणार नाही.चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हा उपाय बनविण्यासाठी लागणार आहेत ती म्हणजे तुळशीची पाने. आपण तुळशीच्या पानांचा वापर यासाठी करणार आहोत कारण आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांना भरपूर महत्त्व दिले गेलेले आहे.
औषधी गुणधर्मांनी भरलेली अशी तुळशीची पाने आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या तुळशी चे फायदे आपल्या शरीराला भरपूर असतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते.
म्हणूनच आपल्याला इथे तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे. आपल्याला आल्याचा देखील वापर करायचा आहे. आले देखील शरीराला अत्यंत गुणकारी असते सोबतच आपला कफ आणि कफामुळे होणारे सर्व आजार दूर करण्यासाठी आपल्याला आल्याचा भरपूर उपयोग होणार आहे. कच्च्या आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.
यामुळे आरोग्याला फायदा होतो. कच्च्या आल्यामध्ये व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन डी, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक आजार दूर होतात. कच्चे आले खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये साठलेला कफ कायमचा निघून जाण्यासाठी आले फायदेशीर असते. सोबतच आपल्याला अजून एका औषधी गोष्टीचा इथे वापर करायचा आहे ती गोष्ट म्हणजे दालचिनीचे पान.
हे पान अनेक औषधी गोष्टींपैकी एक आहे. या पानाचा आपल्या आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग केला जातो मुख्यतः जेव्हा सर्दी, खोकला असेल तेव्हा अनेक काढ्यांमध्ये देखील दालचिनीचे पान टाकले जाते म्हणून आपल्याला इथे दालचिनीच्या पानाचा वापर करायचा आहे. एक काळी मिरी देखील यामध्ये वापरायची आहे. आता हा उपाय बनविण्यासाठी गॅसवर एका पात्रामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चार ते पाच तुळशीची पाने, एक तुकडा आले, एक ते दीड इंचाचा एक तुकडा असला पाहिजे, एक काळी मिरी आणि एक दालचिनीचे पान.
हे सर्व घटक पाण्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित रित्या पाणी उकळवून घ्यायचे आहे. हे पाणी तोपर्यंत उकळवायचे आहे जोपर्यंत दीड ग्लास पाणी अर्धे होत नाही म्हणजेच निम्मे होत नाही जेव्हा हे पाणी निम्मे होईल तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी गाळून हा काढा आपल्याला प्यायचा आहे. दररोज सकाळी हा काढा आपल्याला प्यायचा आहे. जर सकाळी वेळ मिळत नसेल तर या काढाचे सेवन संध्याकाळी देखील आपण करू शकतो.
आपण हा काढा सकाळी घेतला तर आपल्या शरीरासाठी उत्तम राहील म्हणून शक्यतो सकाळीच याचे सेवन करायचे आहे. या काढ्याच्या एका वापरानेच आपला बराचसा कफ कमी झालेला आपल्याला दिसून येईल. शिवाय या काढ्यासाठी वापरले गेलेल्या सर्व गोष्टी या घरगुती आणि औषधी गुणधर्मांनी भरलेल्या असल्यामुळे आपल्या शरीराला यामुळे कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम होणार नाही व आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.