घसा इन्फेक्शन, खोकून खोकून घशाला सूज आली असेल तर हे एक काम झोपताना करा.! सकाळी घसा आणि ताप एकदम ओक्के.!

आरोग्य

मित्रांनो आता पावसाचे दिवस आहे परंतु खाली पावसाळा कमी आणि आजारपणा जास्त पाहायला मिळते. हल्ली पूर्वीसारखा पाऊस पडत नाही.पूर्वी पावसाचे विशिष्ट असे चार महिने असायचे परंतु आता तसे राहिले नाही. पाऊस कधीही पडतो. पडला तर तुमच्या दिवस सातत्याने पडतो, नाहीतर आठ दिवस वातावरणामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात.

या सर्व बदललेल्या वातावरणाचा थेट परिणाम अनेकदा मानवी शरीरावर होत असतो. मानवी शरीरामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळते आणि म्हणूनच व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरत आहे. या वायरल इन्फेक्शन मुळे सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे अशा अनेक समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात. प्रत्येक जण या समस्या उद्भवल्यावर घाबरून जातो परंतु घाबरण्याची गरज नाही.

प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ नक्की समाविष्ट करायला हवे ज्यामुळे तुम्हाला अंतर्गत सुरक्षा मिळू शकते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनू शकते. आपल्याला सर्दी, खोकला झाल्यावर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. आजचा उपाय करण्यासाठी आपण हळदीचा वापर करणार आहोत. मित्रांनो हळद ही आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहितीच आहे.

हळदीमध्ये एंटीबॅक्टरियल, अँटिसेप्टिक आणि अंटी फंगल गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीराला नवसंजीवनी प्रदान करतात. हळदीमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारू शकते परंतु आपल्यापैकी अनेक जण घरातले उपाय करण्यासाठी नकार देत असतात व थोडेफार जरी काही समस्या उद्भवल्या तर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करत असतात. हळदीमध्ये तुमचा घसा सुधारण्याची शक्ती असते.

हे वाचा:   अस्थमा, बीपी, पोटाच्या समस्यावर आहे या झाडाची मुळी रामबाण उपाय, फक्त असे करावे लागेल सेवन...!

व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर अनेकदा सर्दीमुळे घसा आतून लाल होतो. जीभ लाल झालेली असते आणि अशावेळी अन्नपदार्थ सेवन करताना त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला देखील हा त्रास सतावत असेल तर हळदीचा उपयोग अवश्य करायला हवा. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, आणि त्याचबरोबर आले देखील लागणार आहे. आले हे अँटिऑक्सिडंट गुणधर्माने उपयुक्त असते.

आल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक विषारी घटक लवकर बाहेर पडतात व आले मध्ये उष्णता जास्त असल्याने तुमच्या शरीरातील सर्दी खोकला ताप लवकरच दूर होऊन जातात आणि म्हणूनच आपल्याला आज आले देखील लागणार आहे. आले घेताना त्यावरील साल व्यवस्थित काढून टाकायची आहे आणि आल्याचे लांब आकाराचे दोन तुकडे करायचे आहे, आता आपल्याला आले वर थोडीशी हळद लावायची आहे.

आणि दुसऱ्या आल्याच्या तुकड्यावर सैंधव मीठ लागणार आहे, यालाच आपण काळे मीठ देखील म्हणतो. दुसऱ्या तुकड्याला आपण काळे मीठ लावणार आहोत. हे दोन्ही तुकडे आपल्याला एक एक केल्यानंतर सेवन करायचे आहेत, असे केल्याने तुमच्या शरीराला फरक जाणवेल तसेच तुमचा घसा जो लाल झालेला आहे घशाची इन्फेक्शन झालेले आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे.

आपल्या घसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अजून एक उपाय जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला गॅसवर एक पातेले ठेवायचे आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी टाकून चिमूटभर हळद मिक्स करायची आहे व आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचे आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला हे मिश्रण सेवन करायचे आहे.

हे वाचा:   पचनतंत्राला ठेवायचे असेल मजबूत, तर मग हे एवढे खाऊन बघा, पोटातला गॅस, ऍसिडिटी सर्व होईल गायब...!

चवीसाठी तुम्ही यात काळे मीठ किंवा मध देखील मिसळून शकता, असे नियमितपणे सात दिवस केल्याने तुमच्या घसाचे आरोग्य सुधारणार आहे. तुमचा घसा अगदी मोकळा होणार आहे. घशाच्या नसा तंदुरुस्त बनणार आहे आणि भविष्यात कधीच घशाचे विकार आजार होणार नाही आणि म्हणूनच कोणताही पैसा खर्च न करता घरच्या घरी तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला फरक पडू शकतो.

त्याचबरोबर सकाळी उठल्यावर तुम्ही हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्यावर देखील तुमचा घसा व्यवस्थित रित्या राहू शकतो. तुमच्या तोंडाचे आजार पूर्णपणे दूर होतील. दातांचे आरोग्य सुधारणार कारण की हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल व वेदनाशक गुणधर्म असतात, जे तुमच्या दातांचे आरोग्य सुधारते. हिरड्या मजबूत करते. जर तोंडामध्ये कोणताही प्रकारची जखम झाली असेल तर ती जखम भरण्याचे कार्य देखील हळद करत असते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.