सलग पंधरा दिवस सकाळी बेल पान खाल्ले.! शरीरात झाले असे काही चमत्कार.! वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका.!

आरोग्य

निसर्गाने मानवाला भरभरून दिलेले आहे परंतु मानवाला निसर्गाचा हवा तितका उपयोग करता येत नाही. आपल्या आजूबाजूला नैसर्गिक अनेक औषधी वनस्पती आढळतात परंतु मनुष्याला या औषधी वनस्पती बद्दल फारशी माहिती नसते, म्हणूनच या मनुष्य जातीकडून या औषधी वनस्पतीचा वापर केला जात नाही. हल्ली अनेक औषधी वनस्पतीचा वापर न झाल्यामुळे या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

तसेच अनेक जण गवत किंवा टाकाऊ वनस्पती समजून आपल्या आजूबाजूला उगवणाऱ्या अनेक वनस्पतीचा नायनाट करतात आणि म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्र हे अनेकांपर्यंत पोहोचत नाही. आम्ही तुम्हाला अशाच एका औषधी वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ही औषधी वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते. या वनस्पतीचे अध्यात्मिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे परंतु या वनस्पतीचा अनेकांचा होणारा फायदा माहिती नाही.

हाच फायदा आजच्या लेखा त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल… आजच्या या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे बेल. बेलाचे झाड आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल, बेलाचे पान तर सगळ्यांना माहितीच असेल. बेल पानाचे अध्यात्मिक दृष्टिकोनातून अनेक धर्मग्रंथ शास्त्रांमध्ये महत्त्व सांगण्यात आलेले आहेत.

बेलाचे पान हे शिवशंकर यांना प्रिय आहे. जर शिवशंकर यांना प्रसन्न करायचे असेल तर बेलपत्र अवश्य वाहिले जाते आणि म्हणूनच शंकराच्या पिंडीवर आपल्याला बेलपत्र हमखास दिसून येते. बेलाला तीन पान असतात जरी असे असले तरी आपल्या शरीरातील हजारापेक्षा जास्त आजार दूर करण्याची शक्ती बेलाच्या पानांमध्ये असते म्हणूनच आज आपण बेलाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   चमचाभर सेवनाने सगळा त्रास गायब झाला.! आयुष्यातून कायमची हाडे दुखी निघून जाणार.! कंबरदुखीचा रामबाण इलाज आहे हा उपाय.!

ज्या व्यक्तींना वारंवार ब्लड प्रेशर सतावत असतो, हाय ब्लड प्रेशर लोक ब्लड प्रेशरची समस्या उद्भवत असते अशा लोकांसाठी बेलाचे पान रामबाण औषध ठरते. बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशर लवकरच बरा होऊन जातो. आपल्यापैकी अनेकांना सध्याच्या जीवनामध्ये खूप सारे अडचणी ताणतणाव यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच कळत नकळत ब्लड प्रेशर ची समस्या निर्माण होते.

जर आपण बेलाचा उपयोग केला तर ब्लड प्रेशर समस्या निर्माण होणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेलाचे पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टाकून एक ते दीड ग्लासभर पाणी घ्यायचे आहे व हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला द्यायचे आहे मिश्रण उकळून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा आहे व हे मिश्रण आपल्याला दिवसभरातून एकदा सेवन करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये येईल.

जर तुम्हाला हा उपाय करायला जास्त वेळ नसेल तर अशावेळी तुम्ही रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्यात एक ते दोन बेलपत्र घेऊन सकाळी उपाशीपोटी हे पाणी सेवन करू शकता यामुळे तांब्याचे औषधी गुणधर्म आणि बेलाचे औषधी गुणधर्म एकत्र येतील आणि तुमच्या शरीरातील सारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतील, यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहील.

जर तुम्हाला कोणताही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशावेळी खाज, खरूज, नायटा दूर करण्यासाठी बेलाचे पान महत्त्वाची भूमिका बजावत असते. यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन बेलपत्र टाकायचे आहे आणि या पाण्याद्वारे आंघोळ करायची आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील सर्व समस्या दूर होऊन जाते आणि तुम्हाला लवकरच बदल जाणवू लागेल.

हे वाचा:   गॅसची शेगडी आता एकदम नवी करून टाका.! ही सोपी आणि अनोखी पद्धत वापरली तर दोन मिनिटात चमकू लागेल शेगडी.!

बहुतेक वेळा पावसाळ्याच्या दिवसात खाज, खरूज,नायटा यासारखे समस्या त्रास देतात म्हणून शरीरावर खाज दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय आवश्य करा. तुम्ही बेलाचे पान उन्हामध्ये सुकवून त्यांची पावडर देखील बनवू शकता. ही पावडर गरम पाण्यामध्ये एक चमचा टाकून रोज सकाळी उपाशीपोटी सेवन केल्याने आपली पचन संस्था देखील व्यवस्थित रित्या कार्यकर्ते आपल्या शरीरातील सर्व अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात.

म्हणूनच बेलाचे पान आपल्याला आवश्यक औषधांमध्ये समाविष्ट करायला पाहिजे. जर तुम्ही नेहमी बेलाचे पान वापरले तर तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवू लागेल. ज्या लोकांना डोकेदुखी वारंवार सतावते अशा व्यक्तीने बेलाचे फळ नेहमी सेवन करायला पाहिजे यामुळे अर्धशिशी मायग्रेन व डोकेदुखीची समस्या देखील लवकरच दूर होणार आहे.

आता तुम्हाला कल्पना आलीच असेल की बेलाचे पानच नाही तर बेलाचे फळ देखील आपल्यासाठी लाभदायक ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.