आता टक्कल पडलेल्या डोक्यावर पण येऊ लागतील नवीन केस.! केस उगवण्याची आतापर्यंतची सर्वात साधी सोपी टेक्निक.! अनेक लोकांना माहिती नसेल.!

आरोग्य

या जगात कोणी ही मानव परिपक्व अथवा परिपूर्ण नसतो प्रत्येकात कोणता ना कोणता दोष हा असतोच. काही लोक हुशार असतात मात्र सुंदर नसतात काही सुंदर असतात मात्र हुशार नसतात. आपल्या भारत देशात ऋषि मुनी आणि महान वैद्य आपल्या अतोनात अनेक वर्षांच्या तपस्येचे फल स्वरुप एक महान ग्रंथ लिहला आणि याला आपण आयुर्वेद या नावाने ओळखतो. या मध्ये तुम्हाला शारीरिक असणार्या प्रत्येक समस्येचे समाधान अगदी हमखास मिळेल.

आपल्या परिसरात एक सामान्य समस्या उद्भवत आहे ती म्हणजे केस गळतीची. अनेक जण या त्रासाने त्रस्त आहे आणि यावर एक कायमचा उपाय शोधत आहे. डोक्यावर केस नसल्यास अनेक वेळा आपल्याला चार चौघात अपमानाचा सामना करावा लागतो. म्हणूनच
आज आपण या लेखामध्ये केस गळतीमुळे होणार्या समस्येबद्दल तसेच यासाठी आपण घरच्या घरीच याचा उपचार कसा करु शकतो या बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.

बाजारात आज काल अनेक अशी उत्पादने मिळतात जी केस गळती थांबवण्याचा दावा करतात व ग्राहकांना याची 100% हमी देतात. परंतू
बाजारात मिळणारी उत्पादने ही रासायनिक केमिकल तसेच विविध प्रक्रिया करुन बनवली गेलेली असतात. याचा तुमच्या केसांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. चला आता चिंता सोडून सुटकेचा श्वास घ्या.

हे वाचा:   डोळ्यातून पाणी येते का? मग आजच सावधान व्हा.! थोड्याशा हलगर्जीपणामुळे होऊ शकता आंधळे.!

आज आम्ही तुमच्यासाठी खास असे काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत जे फक्त चार दिवसच करा आणि फरक पहा. नैसर्गिक उपाय करणे अत्यंत निर्धोक आहे. तुमचे केस घनदाट तर होतीलच मात्र याने तुमच्या केसांना नैसर्गिक काळा रंग मिळेल. केसांमध्ये असलेला कोंडा आणि मळ देखील दूर पळून जाईल. हे उपाय घरगुती उपाय आहेत या साठी तुम्हाला कोणता ही मोठा खर्च करण्याची गरज नाही.

अगदी स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हे उपाय तयार करु शकता. तसेच हे उपाय आयुर्वेदात नमूद करुन ठेवलेले आहेत त्यामूळे याचा तुमच्या केसांना फक्त फायदा होईल याचा कोणता ही अपाय केसांवर दिसून येणार नाही. पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन घटकांची आवश्यकता आहे. सर्व प्रथम कोरफडीचा रस घ्या. होय घराशेजारील कोरफडीचा ताजा रस या उपायासाठी अगदी उत्तम ठरेल.

कोरफडीत अनेक मानवी शरीर उपयुक्त घटक सापडतात जे तुमच्या केसांना नवीन आयुष्य प्रदान करतात. दुसरा घटक म्हणजे दही. होय दही एक प्रोबायोटिक आहे केसांना मोठ्या प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि दही मोठ्या प्रमाणात प्रोटीन स्त्रोत आहे. तीसरा व शेवटच घटक म्हणजे केळे. केळ्यामध्ये देखील अनेक प्रकारची जीवनसत्वे व खजिने असतात. केसांची वाढीसाठी व मजबूतीसाठी केळे मदत करते.

हे वाचा:   अंडी खाणारे जरा हे पण वाचा.! काही ठिकाणी अंडी अशी बनवली जातात.! अंडी गावरान चांगली की हायब्रीड.!

आता दही, केळे आणि कोरफडीचा रस यांना एका पात्रात एकत्र करुन घ्या. या घटकांना मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. याची पेस्ट तयार झाली की रोज झोपताना आपल्या केसांच्या मूळांमध्ये नीट लावा व सकाळी केस धुवून टाका. काही दिवसातच तुम्ही पहाल केस अगदी मजबूत व काळेभोर होतील. सोबतच नवीन केस उगण्यास देखील सुरवात होईल.

दुसरा नैसर्गिक उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन घटकांची आवश्यकता आहे. सर्व प्रथम मध घ्या. मध हा एक संपूर्ण नैसर्गिक पदार्थ आहे आपल्या केसांच्या आरोग्यसाठी एक उत्तम रामबाण औषधी आहे. दुसरा घटक म्हणजे दही. दही केसांना प्रोटीन प्रदान करण्याचे काम करते. या दोन्ही घटकांना एकत्र करुन आठवड्यातून दोन वेळा केसांना लावून केस धुवून टाकल्यास केसांच्या सर्व व्याधींचा समूळ नाश होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.