जोपर्यंत तुम्ही ही एक गोष्ट समजून घेणार नाही तो पर्यंत कोणतीही साबण अथवा, फेस वॉश तुम्हाला फायदा देणार नाही.!

Uncategorized

मित्रांनो आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे म्हणून निसर्गाने आपल्या पैकी प्रत्येकाला वेगवेगळा चेहरा प्रदान केला आहे. संपूर्ण जगात तुमचा चेहरा हा तुमचा चेहरा आहे त्या सारखा दुसरा चेहरा शोधून देखील सापडणार नाही. तुमचा चेहरा तुमची ओळख आहे. चेहरा सुंदर, देखणा, तेजस्वी व गोरा असणे असे प्रत्येकाला वाटत असते. आपला चेहरा इतरांना आपल्याकडे आकर्षित करेल त्यांना आपल्या जवळ घेवून येईल असे प्रत्येकाचे स्वप्न असते.

मात्र तुमच्या चेहर्याची रचना व चेहर्याची पट्टी जरी चांगली असली तरी ही चेहर्यावरचे काळे डाग व निस्तेजपणा तुमची सुंदरता कमी करतात. आज काल चेहर्यावर काळे डाग, तेलकटपणा, पिंपल्स तसेच चेहरा निस्तेज व सुरकुत्या पडलेला असणे या आता सामान्य समस्या बनल्या आहेत. परिसरात वावरणारी प्रत्येक व्यक्ती या त्रासलेली आहे. चेहर्याची काळजी किती ही घेतली तरी त्याला कोणती ना कोणती बाधा ही निर्माण होतेच व तुमच्या सुंदरतेला ग्रहण लागते.

असे होण्या मागे काही कारणे आहेत होय मित्रांनो आधीच्या काळात लोकांचे चेहरे अनेक वर्षोंवर्ष टवटवीत व गोजिरे असायचे मात्र आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे चेहर्यावर अपाय व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही देखील अश्या समस्यांमध्ये अडकला असाल आणि यावर एक कायम स्वरूपी उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे.

हे वाचा:   रोहित र कोहली चम्किदा भारतको शानदार जीत

आपण आपल्या दैनंदिन कार्यांमध्ये अश्या काही चुका करतो ज्या आपल्या चेहर्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरतात. अनेक वेळा आपण चेहर्याला गरज नसणारे पोषण देत असतो म्हणजेच समस्या वेगळी व आपण उपाय वेगळा करत असतो. हे थांबवणे गरजेचे आहे आणि या लेखात आम्ही तुम्हाला या बद्दलच थोडी माहिती देवू इच्छितो. ही माहिती तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते म्हणून हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.

आता पाहूया कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणत्या प्रकारचा उपाय केला गेला पाहिजे. आपली त्वचा कशी आहे हे पाहणे इथे फार महत्वाचे आहे. काही लोकांना ऑयली स्किन म्हणजेच चेहर्यावर तेलकटपणा असण्याची समस्या असते. बाहेरचे खाण-पान तसेच स्निग्ध पदार्थ जसे दूधापासून तयार झालेले पदार्थ व मांस, मच्छी हे जास्त प्रमाणात खाल्याने चेहर्यावर तेल येवू लागते. साखरेपासून व मैद्यापासून तयार झालेले पदार्थ देखील चेहरा तेलकट बनवू शकतात.

यासाठी तुम्हाला चेहर्यावर ऑइल नियंत्रीत करणारे फेस वॉश वापरयचे आहेत. सोबतच जेवणात फळभाज्य तसेच प्रथीनेयुक्त पदार्थ वाढवणे गरजेचे आहे. अनेक लोकांना आज काल ड्राय स्किनची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शरीरात असणार्या पाण्याच्या कमीमुळे चेहरा सुकतो आणि यामुळेच बोलताना अथवा हसताना चेहर्यावर सुरकुत्या पडतात. ही समस्या आज काल लोकांमध्ये सामान्य झालेली दिसत आहे.

हे वाचा:   निर्माणाधिन खेलकुद पूर्वाधार प्राथमिकतामा

मित्रांनो अश्या समस्येच्या सामधानासाठी तुम्ही चेहर्यावर कोरफडीचा रस लावू शकता होय याने तुमचा चेहरा टवटवीत राहतो. दिवसाला कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. रात्री झोपताना व सकाळी उठल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. या गोष्टींमुळे तुमच्या ड्राय स्किनला ओलावा मिळेल. ज्या लोकांची त्वचा सेंसटीव्ह असते त्यांना कोणत्याच प्रकारचे अन्य उत्पादन चेहर्यावर लावल्यास त्याची चेहर्यावर एलर्जी उठते लाल त्वचेवर चट्टे उठू लागतात.

अश्या लोकांनी खर तर चेहर्यावर नवीन कोणते ही प्रोडक्ट वापरण्याआधी कानाच्या मागील भागास एकदा लावून पहा. जर तिथे कोणत्या प्रकारची खाज अथवा एलर्जी उठल्यास हे ऊत्पादन आपल्या चेहर्यासाठी हानिकारक आहे समजावे व रोज वापरणार्या ऊत्पादनालाच प्राधान्य द्यावे. वरील काही गोष्टींकडे लक्ष्य दिल्यास तुम्ही तुमचा चेहरा आकर्षक व सुंदर बनवू शकता.

  • Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.