हातापायाची आग होणे, सूज येणे, असे का होते.? माहिती आहे का.? यासाठी काय करावे.?

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे प्रकारचे दोष उद्भवत असतात. या दोषांमध्ये कफ, पित्त, वात हे तीन दोष प्रामुख्याने मानवी शरीरात सतावत असतात. हाता पायांना मुंग्या येणे, चालताना उठताना बसताना त्रास होणे, हातापायांच्या तळव्यांना सूज येणे, वेदना होणे या सगळ्या वाताच्या समस्या आहे. वाताच्या समस्येमुळे अनेक जण हैराण झालेले असतात. आपल्यापैकी अनेक जण जमिनीवर तासंतास बसतात आणि हल्ली जमीन लादी या मार्बलच्या असतात आणि थंड असतात यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.

एकदा शरीरामध्ये थंडावा निर्माण झाले की आपल्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होत नाही व हातापायांना मुंग्या येऊ लागतात. हातापायांना वेदना जाणवतात. चालताना उठताना बसताना त्रास होतो, या समस्या उद्भवल्यावर आपण डॉक्टरांकडे जाऊन सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी यासारख्या समस्यांवर औषध उपचार करत असतो परंतु खूप सारे औषधोपचार करून देखील आपल्याला हवा तितका फरक जाणवत नाही.

जर तुम्हाला देखील वाताच्या समस्या त्रास देत असतील हातापायांना आलेले सूज लवकर कमी होत नसेल तर आजच्या या लेखांमध्ये सांगितला उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करतात चुटकी भरातच तुमच्या हाता पायांना व तळव्यांना आलेली सूज लवकरच बरी होईल. आपल्या हाता पायांच्या तळव्यांना आलेली सूज आग वेदना व जळजळ दूर करण्यासाठी आपण आज तांदुळाचा वापर करणार आहोत.

हे वाचा:   पांढरे केस तोडल्यास संपूर्ण डोके पांढरे होते का.? दिसेल तेव्हा डोक्याचे सफेद केस तोडणारे एकदा नक्की वाचा.!

तांदूळ हे आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात. तांदुळाच्या मदतीने आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवत असतो आणि म्हणूनच आपल्याला आज तांदूळ लागणार आहे. तांदुळाचा उपयोग करून आपण अनेक त्वचेचे विकार देखील दूर करू शकतो. तांदूळ मध्ये आपल्या शरीरातील उष्णता शोषण घेण्यासाठी आवश्यक असणारे अनेक औषधे गुणधर्म असतात आणि म्हणूनच आज आपण तांदूळ घेणार आहोत.

हा तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करून काही वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या साह्याने बारीक पेस्ट तयार करायची आहे. जर तुम्हाला तांदळाची पेस्ट बनवायची नसेल तर बाजारामध्ये तांदुळाचे आयते पीठ देखील उपलब्ध असते. या पिठाद्वारे तुम्ही तांदळाची पेस्ट बनवू शकता, त्यानंतर आपल्याला कोरफड लागणार आहे. कोरफड सुद्धा सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते. कोरफड मध्ये अनेक औषधे गुणधर्म असतात.

हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेले अतिरिक्त उष्णता कमी करण्याचे कार्य कोरफड करत असते आणि म्हणूनच आपल्याला कोरफडचा गर येथे लागणार आहे. जर तुमच्याकडे कोरफड असेल तर उत्तमच… जर नसेल तर बाजारामध्ये देखील कोरफड गर उपलब्ध असतो. आता आपल्याला हे दोन्ही पदार्थ समप्रमाणामध्ये घेऊन आपल्या त्वचेवर लावायचे आहे.

हे वाचा:   शाम्पू लावून लावून थकला पण कोंडा गेला नाही? हा उपाय करा कोंडा वाहून जाईल.!

सुरुवातीला आपण जी तांदळाची पेस्ट बनवलेली आहे, ती पेस्ट आपल्याला आपल्या हातांना किंवा पायांच्या तळव्यांना लावायची आहे. अर्धा ते एक तास ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्या हातपाय धुवायचे आहे मग आपण जी कोरफड ची पेस्ट घेतलेली आहे ती आपल्याला लावायचे आहे ती सुद्धा अर्धा तासानंतर व्यवस्थित रित्या धुवायची असे केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. शरीरातील उष्णता कमी होऊन जाईल.

हाता पायांना आलेली सूज कमी होईल व कालांतराने वेदना देखील निघून जाईल अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च न करता काही रुपयांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणून जास्त औषध सेवन न करता नैसर्गिक पद्धतीने आपल्या हाता पायांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.