रात्री उशिरा जेवणाऱ्यांसाठी खास माहिती.! जेवण नेमके कधी करणे योग्य असते.! अशी माहिती कोणताही डॉक्टर सुद्धा देणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे आयुमान दिवसें दिवस कमी होत चालले आहे. आधी माणसे नव्वद ते शंभर वर्ष जगायची आता मात्र पन्नासच्या आधीच शरीर निकामी होवू लागले आहे. मानवाचे शरीर एक खूप अवघड यंत्र आहे. प्रत्येक कार्यासाठी त्यात विशिष्ट अवयव प्रकृतीने प्रदान केले आहेत. आपले शरीर रोगांपासून दूर रहावे यासाठी आपण अनेक गोळ्या तथा औषधे घेतो.

शरीराला चांगला पोषक आहार देतो. परंतू तरी ही आज काल आपल्या शरीरात काही ना काही बिघाड हा येतोच. एक मजबूत व निरोगी शरीर मिळवणे हे प्रत्येक मानवाचे स्वप्न असते. या साठी आपण आपल्या आहारात अनेक बदल देखील केले पाहिजेत. आपले जेवणाचे ताट हे नेहमी संतुलित आहाराने भरलेले असायला हवे. या मध्ये सर्व प्रकारचे शरीराला उपयुक्त पोषक तत्वे असणे फार महत्वाचे आहे.

आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथीने, कर्बोदके व फायबर यांची रोज आवश्यकता असते. तसेच काही खनिजे व जीवनसत्वे देखील रोज शरीराला प्राप्त होणे जरूरी आहे. आपल्या रोजच्या जेवणातून हे सगळे मिळत आहे की नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आहरात पालेभाज्या, कंदमूळे व फले यांचा समावेश असावा. यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शरीराला मदत करते.

हे वाचा:   आजपासून तुम्ही एकही लसणाची पाकळी फेकून देणार नाही, लसणाच्या पाकळ्या अशा आना उपयोगात.!

जर अन्न योग्य वेळी पचले तरच त्यातील घटक आपल्या शरीराला मिळतात म्हणूनच फायबर युक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहरात आवर्जून करावा. स्निग्ध पदार्थ जसे दही, दूध, मांस-मच्छी व अंडी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. शरीरात कॅल्शियम व फोस्फेट पुरवण्याचे काम हे पदार्थ करतात त्यामूळे यांना देखील आहरात प्राधान्य द्यावे.

तुम्ही किती ही चांगला व पोषणयुक्त आहार ग्रहण केला मात्र तरी ही त्याचा आपल्या शरीराला खास काही फायदा होत नाही. अनेक लोक खूप जेवतात मात्र त्यांची तब्येत बनत नाही. या मागचे कारण म्हणजे जेवणाची चुकीची वेळ. आपल्या पैकी अनेक लोक सगळेच म्हणायला काही हरकत नाही हे सुर्यास्त नंतरच जेवण करतात. ही सवय फार चुकीची सवय आहे.

होय असे करुन आपण आपण निसर्गाचा आपल्या प्रकृतीचा नियम मोडत आहोत. आपल्या आजू बाजूला वास्तव्य करणारे पशू-पक्षी व सजीव जरी जंगलात राहत असले तरी ही हे सुर्यास्ताच्या आधी आपले भोजन खावून घेतात. मात्र आपल्या या धाव पळीच्या जीवनात आपल्याला वेळेवर अन्न खाण्यास सवड मिळत नाही. मग याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

शरीरावर नको असलेली चरबी वाढणे, केस गळतीची समस्या उद्भवने, शरीरात मोठ्या प्रमाणात पित्त तयार होणे त्याच बरोबर अनेक छोटे व मोठे पोटाचे विकार होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे अश्या अनेक समस्या आपल्या समोर येवून उभ्या राहतात आणि म्हणूनच आपले जीवन आता कमी होवू लागले आहे. सुर्यास्ताच्या आधी जेवण केल्याने तुमचे शरीर संतुलित राहते.

हे वाचा:   आवळा ज्यूस पिल्यावर शरीरात पुढच्या मिनिटात काय झाले.! शरीरावर होतात असे जबरदस्त बदल.!

पोटात गेलेले सर्व अन्न झोपण्याआधी पचते व त्यात असणारे पोषकतत्व आपल्या शरीराला लागतात. फक्त ही एकच सवय तुम्ही आपल्या आचरणात आणली तर तुम्ही देखील एक निरोगी आयुष्य जगाल. वेळेवर व चांगल्या आहारासोबतच तुम्ही रोज कसरत म्हणजे व्यायाम करा. शरीरात अनेक वि’षारी घटक तयार होतात रोज व्यायाम केल्यास हे घटक घामाच्या मार्फत बाहेर पडतात.

या सोबतच श्वसनाचे आजार देखील शरीरापासून दूर पळून जातात. वजन संतुलित राहते. म्हणूनच दिवसातून वीस मिनिटे तरी व्यायाम करणे जरूरी आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

  • Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.