ब्युटी पार्लर मध्ये जाऊन पैसे खर्च करणे आता करावे लागेल बंद कारण, टोमॅटो आणि हळदीने चेहऱ्यावर आणली आहे अशी चमक.! लाखोंचे प्रोडक्ट यापुढे आहेत फिके.!

आरोग्य

सुंदर चेहरा सगळ्यांनाच हवासा वाटतो. सुंदर व देखणा चेहरा आपल्या मध्ये एक वेगळा आत्मविश्वास जागवतो. तुम्हाला चार चौघात खुल्या मनाने बोलण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो. परंतू आज कालच्या या प्रदूषणाच्या परिसरात आपल्या चेहर्याचे तेज कुठे तरी गायब होत चालले आहे. सोबतच चेहर्यावर डाग आणि मुरुमे येणे हे आजकल स्वाभाविक आहे. पण यामुळे आपला चेहरा कुरुप दिसू लागतो.

आपली तरुण पिढी तर या समस्येने खूपच त्रस्त झाली आहे. विविध प्रकारचे उपाय करुन देखील चेहर्यावर काही तेज परत येत नाही. बाजारात अनेक अशी उत्पादने सापडतात जे तुम्हाला चेहरा गोरा व तेजस्वी बनवण्याची 100% हमी देतात. परंतू तुम्ही जे पदार्थ त्वचेवर लावता ते विविध प्रकारच्या कृत्रिम घटकांनी तयार केले गेलेले असतात. आपली शरीर हे नैसर्गिक असते त्यामूळे अश्या अनैसर्गिक गोष्टी तुमच्या शरीराला अपाय पोहचवण्याचे काम करतात.

आधीच्या माणसांच्या त्वचा अगदी वय वर्षे साठ जरी झाली तरी चमकदार व गोंडस असायची परंतू आताच्या चुकीच्या खान-पान व तिखट तेलकट पदार्थ आहारात रोज खाल्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो आणि त्वचा निस्तेज होत जाते. परंतू आज आम्ही तुम्हाला या गोष्टी नैसर्गिक पद्धीतीने बरा करण्याचा एक सोपा साधा उपाय सांगणार आहोत. हो आता सर्व चिंता सोडा व सुटकेचा श्वास घ्या.

हे वाचा:   हे एवढे मिश्रण रात्री झोपताना खा, कंबर दुखी, अंग दुखी, सांधेदुखी महिन्यात गेली म्हणून समजा...!

आम्ही आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो फक्त चार दिवस करा चेहर्यावर नैसर्गिक ग्लो येईल. सोबतच हा उपाय आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तूंना वापरून तयार करायचा आहे. त्यामूळे याने तुमच्या चेहर्याच्या त्वचेला फक्त फायदा होईल कोणताच अपाय अथवा दुष्परिणाम दिसण्यात येणार नाही. आयुर्वेदातील हा एक उत्तम व गुणकारी असा रामबाण उपाय आहे. चला आता विलंब न करता पाहूया या उपाय व याला लागणारी सामग्री.

तर मित्रांनो या उपायासाठी सर्वात प्रथम आपल्यला लागणार आहे हळद. हळद ही आपल्यला सहजतेने घरामध्ये उपलब्ध होते. हळद ही एक नैसर्गिक दर्द शमाक आहे. हळद आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी देखील उत्तम घटक आहे. चेहर्याचा काळपटपणा व निस्तेज पणा दूर करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. हळद घेताना कधीही घरच्या हळद पावडरचा यामध्ये वापर करायचा आहे म्हणजेच यापासून आपल्यला पूर्णपणे फायदा होतो.

जर आपण बाहेरची हळद पावडर वापरली आणि त्यामध्ये भेसळ असेल तर आपल्यला हवा तसा फायदा होत नाही. म्हणून यासाठी घरच्या हळद पावडरचा वापर करा. दुसरा घटक जो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे टोमाॅटो. हा घटक आपल्या शरीरासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. टोमाॅटोचे सेवन आपल्या शरीरातून थकवा कायमचा दूर करते.

हे वाचा:   ही एकमेव वनस्पती हिऱ्या पेक्षा आहे मौल्यवान, जिथे सापडेल तिथून घरी आणा, फायदे वाचून नक्कीच हैराण व्हाल.!

शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवते व रक्त शुध्द करण्यासाठी देखील मदत करते. आपल्या चेहर्याच्या आरोग्यासाठी देखील टोमाॅटो खूप उपयुक्त मानला जातो. या नंतर तीसरा व शेवटचा घटक मीठ. मीठाच आयोडिन असते व चेहर्यावरच्या जमा मळाला काढण्यासाठी हे फार फायदेशीर आहे या साठीच एक ते दोन चमचे मीठ देखील या उपायासाठी घ्या. आता चार मोठे चमचे हळद पावडर घ्या.

या नंतर एका टोमाॅटोला बारीक करुन मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्या. आता या दोन्ही घटकांना एका पात्रात एकत्र करा व चांगले मिसळून घ्या व नंतर मीठ टाका. रात्री झोपण्याआधी हे मिश्रण चेहर्याला लावा सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. अगदी काही दिवसातच तुमचा चेहरा तेजस्वी व चमकदार दिसू लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.