महिलांसाठी खुशखबर.! काळी पडलेली, मळलेली त्वचा होईल एकदम गोरीपान.! या सोप्या उपायाने कमाल केली.!

आरोग्य

आपल्या भारत देशात वर्षाचे बारा महिने आपण सण व उत्सव साजरे करतच असतो. या सर्व काळात आपला चेहरा ताजा तवाना असणे फार महत्त्वाचे आहे. परंतु आज कालच्या या धावत्या जगात प्रदूषण फारच वाढत चालले आहे आणि याच्या प्रादुर्भावाने आपला चेहरा दिवसें दिवस कळपट व निस्तेज होतोय. सोबतच आपले रोजच अति तिखट व तेलात तयार झालेले खाद्य पदार्थ यांच्या सेवनाने देखील तुमच्या चेहर्‍यावर तेल व पूरळे उठू लागतात.

बाजारात मिळणारी उत्पादने चेहर्‍याच्या तक्रारी 100% दूर करण्याची हमी देतात परंतु या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल व अनैसर्गिक घटक टाकलेले असतात. जे आपल्या त्वचेला हानिकारक असतात. मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. कारण आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी चेहर्‍याच्या समस्या दूर करण्याचे काही नैसर्गिक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

हो सोबतच हे घरगुती उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला हा उपाय नक्कीच परवडेल. घरातील काही सामग्रीचा वापर करून तुम्हाला हे उपाय तयार करायचा आहे. हा उपाय नैसर्गिक आहे व निर्धोक आहे त्यामुळे अगदी निर्धास्तपणे हे उपाय करा. आयुर्वेदात देखील या आपल्या महान वैद्यांनी या उपायां बाबत नमूद केलेले आहेत. चला आता वेळ न दवडता पाहूया नक्की कोणते आहेत हे उपाय.

हे वाचा:   कसलाही त्वचा रोग सात दिवसाच्या वर टिकणार नाही, यासाठी घरीच बनवा हे असे औषध, करा हा शेवटचा इलाज.!

चेहरा नैसर्गिक पद्धतीने चमकदार व तेजस्वी बनवण्याचे आम्ही तुम्हाला या लेखात तीन उपाय सांगणार आहोत. पहिला उपाय तयार करण्यासाठी आपल्या घरातील कोरफडीचा रस घ्या. हो आम्ही घरातील म्हणालो याचे कारण म्हणजे तुम्ही ताजा रस या उपायासाठी वापरलात तर याचा जास्त फायदा तुम्हाला होईल. कोरफड या वनस्पतीला तुम्ही सगळेच ओळखत असाल.

कोरफड ही विविध प्रकारच्या शरीर उपयुक्त घटकांनी भरलेली असते. आपल्या त्वचेला देखील सुंदर बनवण्याचे काम कोरफड करते. खाज-खरूज व नायटा यांच्या उपचारासाठी देखील कोरफडीचा रस वापरला जातो. आपल्या पाहिल्या उपायासाठी तीस ते चाळीस मि.ली. कोरफडीचा रस घ्या. मित्रांनो दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे दूध.

दूध हा एक नैसर्गिक घटक आहे व याचा देखिल आपल्या चेहर्‍याच्या त्वचेला खूप फायदेशीर आहे. कोरफडीचा रस व दूध या दोन्ही घटकांना एकत्र करा व आपल्या चेहर्‍यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा आता चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमच्या चेहर्‍यावर नैसर्गिक तेज येईल. आता पाहूया दुसरा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी कोरफडीचा रस तर घ्या व सोबतच पंधरा ते वीस ग्राम हळदीची पावडर घ्या.

हे वाचा:   घरीच उगवा इलायची.! कधीच दुकानातून इलायची आणायची गरज पडणार नाही.! महिलांसाठी खास आहे नक्की वाचा.!

हळद एक नैसर्गिक वेदना शामक घटक आहे. आपल्या चेहर्‍याला चमकदार बनवण्यासाठी अगदी पूर्वी पासूनच हळद लावली जाते. आता या दोन्ही घटकांना एका भांड्यात एकत्र करा व याचे छान मिश्रण तयार करून घ्या. आता हे मिश्रणात दहा ते पंधरा मिनिटे आपल्या चेहर्‍याच्या त्वचेला लावली व नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. या उपायाने देखील चेहर्‍यावरच्या सर्व तक्रारी दूर होतील. आता पाहूया शेवटचा उपाय.

हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला कोरफडीचा रस आवश्यक असेल व त्यासोबतच आता वीस ग्राम दही घ्या. दही आपल्या चेहर्‍यावरच्या तक्रारी कानी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या दोन्ही घटकांना एकत्र करून फेस पॅक तयार करा. दहा ते पंधरा मिनिटे चेहर्‍याला लावा व चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहर्‍यावर असणार्‍या सर्व समस्या अगदी समूळ नष्ट होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.