चांदीचा कुठलाही दागिना असू द्या.! गरम पाण्यात टाका ही एक वस्तू आणि काळे पडलेले चाळ किंवा दागिना.! मिनिटात होईल एकदम नव्या सारखा.!

आरोग्य

भारतीय महिलांना तसेच स्त्री वर्गाला दाग-दागिने व भूषण-अलंकार यांचे खूप जास्त आकर्षण असते आणि हे अगदी पुरातन काळापासूनच चालत आले आहे. मध्ययुगीन काळी याच अलंकारांसाठी लढाया होत असत. काही लोकांकडे शेकडो वर्षांचे पिढ्यांन-पिढ्या वारसा हक्का समवेत चालत आलेले दाग-दागिने अजून आहेत. आभूषणे आपल्या शरीराची शोभा वाढवतात.

आपल्या भारतात राजा महाराजांच्या साज शृंगारात अनेक प्रकारचे दागिने असायचे. बाजू बंध, मुकुट, कंबर पट्टा, साखळ्या व इत्यादी प्रकारची आभूषणे अगदी प्राचीन काळापासून चालत आली आहेत.आज काल ज्यांच्या कडे जास्त दागिने ते जास्त श्रीमंत असे मानले जाते. तुमच्याकडे देखील अनेक दागिने असतीलच. मात्र अनेक वेळा जास्त वापरुन अथवा पाण्याच्या संपर्कात जास्त आल्यास या दागिन्यांची चमक निघून जाते. ते काळे दिसू लागतात.

आपल्याकडे मुख्यतः दोन प्रकारच्या धातूंपासून तयार झालेले दागिने असतात. एक म्हणजे सोने व दुसरे म्हणजे चांदी. हे दोन्ही युनिवरसल मेटल आहेत यांच्या वर पाणी, आग हवा यांचा काही फरक पडत नाही. परंतू वर्षानुवर्ष वापरात असल्या कारणाने यांच्यावर काळ्या रंगाचा एक थर तयार होतो. हा अत्यंत कठीण असतो व साध्या- सामान्य पाण्याच्या मदतीने याला आपण घालवू शकत नाही. अश्या वेळी आपण सोनाराकडे जातो.

हे वाचा:   अंड्याची भाजी बनवताना त्यात हा एक पदार्थ टाकने म्हणजे मूर्खपणाच.! जवळपास 90 टक्के महिला हा पदार्थ भाजीत टाकतातच.! यामुळे चवेची वाट लागते.!

सोनार या दागिन्यांना चमकवण्याचे पैसे तुमच्याकडून घेतो या सोबतच अनेक विविध प्रकारच्या केमिकल प्रक्रिया करून हे तुमच्या दागिन्यां मधून थोडा भाग काढू देखील शकतात. असे होणे टाळण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक दागिने चमकदार करण्याचा एक घरगुती उपाय घेवून आलो आहोत. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ही मोठा खर्च करण्याची गरजच नाही. त्यामुळे अगदी सामान्यांच्या देखील खिशाला हा उपाय परवडेल.

मित्रांनो घरातील काही सामग्री वापरून तुम्ही तुमचे दागिने चमकवू शकता. हो चला आता विलंब नमस्कार करता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम एका पत्रात पाणी घ्या. आता गॅस अथवा शेगडीवर हे पाणी गरम होण्यासाठी ठेवा. या नंतर यात कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी पावडर व हळद पावडर टाका. पाण्याला चांगली उकळी आल्यास आता या पाण्यात तुमच्याकडे असणारे दागिने व अलंकार टाका.

गॅसला आता मंद आचेवर ठेवा व पाच ते दहा मिनिटांनी ही तुमची आभूषणे हलवा. अर्धा तास झाल्यास आता गॅस बंद करा व पाणी थंड होण्यासाठी वाट पहा. या नंतर तुमचे दागिने पाण्यातून काढा व एका सुती कापडाने पुसून घ्या. आता साध्या पाण्याने तुमचे दागिने धुवून घ्या. आपल्या प्रत्येकाच्या घरी दंत मंजन असतेच. आपण दात घालण्यासाठी ब्रश व दंत मंजनाचा वापर करतो. होय आता ब्रश व दंत मंजनाच्या मदतीने तुमचे हे दागिने घासा.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर एवढे एक काम करा, दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील...!

या प्रक्रियेच्या प्रभावाने तुमचे काळे पडलेले दागिने पुन्हा चमकदार दिसू लागतील. दागिने नेहमी चमकदार दिसावे म्हणून तुम्ही जेव्हा हे परिधान करत नसाल तेव्हा एका मऊदार कागदात ठेवा. याने तुमचे दागिने खराब होणार नाहीत आणि जेव्हा देखील तुम्ही हे परिधान कराल तेव्हा हे नवीन वाटतील. आजच्या या वाढत्या महागाईत पैसे खूप महत्त्वाचे आहेत . म्हणून आता काही मिनिटांत तुम्ही देखील घरच्या घरी तुमचे दागिने साफ करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.