आपल्या भारत देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात हे सर्वांना माहीतच आहे. आपला भारत हा आयुर्वेद शास्त्र आणि वनौषधींसाठी प्रसिद्ध व संपन्न असणारा देश आहे. भारतात विविध राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या वनौषधी वनस्पती आढळतात. बऱ्याच वनऔषधीची माहिती आपल्याला नसते. त्यातील कित्येक वनस्पतींच्या प्रजाती आता दुर्मिळ झाल्या आहेत. औषधी वनस्पतींच्या मोठ्या प्रमाणात कत्तली होत असल्याने त्या नष्ट होत आहेत.
त्यामुळे अनेक वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना केवळ इंटरनेट व पुस्तकांच्या माध्यमातून मिळते आणि हा दुर्मिळ ठेवा आपण गमवत आहोत. अशाच एका दुर्मिळ वनस्पती ची आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे वाघनखी. या वनस्पतीचे पान मऊ आहेत. ही थंड प्रकृतीची विंचवाचे विष शांत करणारी आहे.
याच्या मुळी दगडावर घासून विंचू चावलेल्या ठिकाणी लावतात. ही वनस्पती छोटया स्वरुपाच झाड आहे. हिच्या पानाला इतर उपद्रवी कीटक चिटकून मरतात. अशा प्रकारे नैसर्गिक किड नियंत्रण आपोआप होते. पुर्वी चामड्याच्या बुटात ह्याचे फळ कर कर आवाज येण्यासाठी टाकत होते. काही जाणकारांचे असे म्हणणे आहे की बुटात फळ फिट केल्यामुळे विंचु बुटात बसत नाही.
अशी ही बहुगुणी वनस्पती आहे. लक्षात घ्या हे हातजोडी नाही. आजकाल हे कोल्हापुरी पायतानात करकर आवाज येण्यासाठी वापरत असल्याचे दिसते. टायफाईड झाल्यास यातील गोडंबी काडून पानाच्या विड्यातून देतात, यामध्ये इतरही वनस्पती जसे गुंज पाला, कात टाकून विडा तयार केला जातो टायफाईड हमखास बरा होतो. वाघनखी ही वेलवर्गीय कंदमूळ वनस्पती आहे.
याची आगी सारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले मातीत अजून रंग भरतात. पूर्वीच्या काळी खेड्यामध्ये ढेकूण झाल्यावर अंथरूनाच्या सभोवताली याची पानं गोलाकार लावत, यामुळे पानांवरील लवमुळे ढेकूण रुतून बसतात असे जुने जाणकार सांगतात. ताकद येण्यासाठी याची मूळ वापरली जातात. ती स्वच्छ धुवून वाळवून पावडर बनवा.
सकाळ संध्याकाळ दोन दोन ग्रॅम दुधा सोबत घेतल्याने ताकद वाढते. याला गावठी भाषेमध्ये काळी कुत्री असे म्हणतात. याचे फळ खूप कडक आणि मजबूत असते. डोक्यात चाई लागून केस गेलेल्या ठिकाणी वाघनखीचे तेलात जमालगोटा चे बी उगाळून लावल्यास हमखास त्या जागेवर केस येतात. कितीही जुनी खाज फंगल इन्फेक्शन साठी वाघनखीच्या तेलात सल्फर म्हणजेच गंधक घालून खाजेवर लावल्यास हमखास फायदा होतो.
अनेक जनावरं या वनस्पतींची पाने चारा म्हणून चवीने खातात. जखम भरून येण्यासाठी या वनस्पतीची पानांचा रस काढा बनवून लावला जातो. काढ्यात वाघनखीची पानं, कडुनिंबाचे पान आणि तुरटी असावी. हे पाण्यात शिजवतात. या वनस्पतीच्या बिया मोहरीच्या तेलामध्ये शिजवून ते तेल साठवून ठेवा. शरीरावर कोणत्याही भागात दुखणं उद्भवल्यास हे तेल फायदेशीर ठरते.
या वनस्पती चे पाने स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट बनवून कडूनिंबाच्या तेला सोबत शिजवा. हे तेल कोणत्याही प्रकारचे त्वचेचे रोग असतील त्यावर वापरा. तुम्हाला खूप फायदा होईल. विंचु चावल्यास या वनस्पतीच्या पानांचा लेप लावतात, यानी विंचवाचे विष उतरवण्यास मदत होते. हातापायांची आग होत असल्यास, या वनस्पतीचे पानं मेहंदीच्या पानासोबत वाटून पेस्ट बनवून हात पायावर लेप करावा. तुम्हाला फरक पडेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.