किडलेल्या दातांची अशी होईल सुट्टी.! दातातला किडा झटकन बाहेर.! एका पानाने कमाल केली.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे आनंदी असाल अशी अपेक्षा आणि निरोगी राहावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.! आज आम्ही तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या निसर्गाने काही वनस्पतीना असे बनवले आहे की ज्या आपल्या अनेक आजरात ठीक करण्यात आपली मदत करतात. आज आपण तुळशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. या वनस्पतीचे अनेक थक्क करणारे फायदे आहेत जे तुम्हाला माहित देखील नसतील. संपूर्ण भारतात अगदी सहज कुठेही आढळणारी ही तुळस, याचे फायदे तुम्हाला समजल्यास डॉक्टरकडे जाऊन होणारा अनेक खर्च तुम्ही वाचवू शकाल तेही सोप्या नैसर्गिक उपायाने. जवळपास प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचे रोपं असतातच.

सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ही वनस्पती 24 तास प्राणवायू ऑक्सिजन देते. हवा शुद्ध ठेवते. बऱ्याच लोकांना वातावरणातील बदलांमुळे सर्दी पडस खोकला ताप होण्याचा त्रास असतो. यावर तुळशीचा काढा पिणे अत्यन्त फायदेशीर असते. यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. याकरिता तुम्हाला तुळशीचे काही ताजी पानं सोबत काळी मिरी आणि खढीसाखर घेऊन काढा बनवा.

हे वाचा:   उसाचा रस पिण्याआधी नक्की वाचा.! पुरुषांनी नक्की वाचा.! उसाचा रस पोटात गेल्यावर त्याचे काय होते.?

यात आलं घातल्यास उत्तमच. या काढ्याच्या सेवनाने सर्दी कफ खोकला ठीक होतो. नियमित तुळशीचा काढा पिल्याने रक्त साफ होऊन त्वचा व पोट संबंधित सर्व तक्रारी दूर होतात. तुम्हाला तोंडाचा नेहमी दुर्घँद येण्याची समस्या असेल तर यातही तुळस जादुई काम करते. तुळशीचे चार पानं स्वच्छ धुवून चावून दररोज खाल्ल्याने ही समस्या दूर होते. तुम्ही आत्मविश्वासाने चारचौघात वावरू शकता.

अनेकवेळा उलटसुलट खाल्ल्याने पोट बिघडून जुलाब सुरु होतात. असं झाले असता तुळशीचे पानं जिरं सोबत वाटून घ्या. आणि दिवस भरात तीन ते चार वेळेस याच चाटण करा. असं केल्याने जुलाब ठीक होतात. तुळशी चहाच्या पाण्यात उकळून पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबतच तुम्हाला दातदुखी असेल किंवा दातात कॅविटी झाली असेल तर यात तुळस वरदान आहे.

हे वाचा:   2 दिवसाच्या आत खाज खरुज बरा होणार.! त्वचा इन्फेक्शन असे केले जाऊ शकते दूर.! कसाही त्वचा विकार यामुळे बरा होतो.!

वर्तमान काळात दात दुखीची समस्या साधारण बाब आहे. यासाठी तुळशीची ताजी पानं तोडून साफ पाण्याने स्वच्छ धुवा. लवंग, कापूर आणि मिरी सोबत पानं वाटून घ्या. आता दात दुखत आहे कॅविटी आहे तिथे ही पेस्ट लावा. असं केल्याने अगदी त्वरितच दात दुखी थांबेल. तुळशीचा प्रयोग करणे खूप फायदेशीर असते. यामुळे कोणतेच नुकसान होत नाही. आजसाठी इतकेच! धन्यवाद!!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.