आजच्या या धावत्या जगात मानवाला जगण्यासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागत आहे आणि यासाठी शरीर निरोगी व मजबूत असणे फार आवश्यक आहे. परिसरातील वाढते प्रदूषण आपल्याला आतून कमजोर बनवत आहे. या सोबतच आपण घराचा संतुलीत आहार टाळून बाहेरचे अरबट सरबट व तिखट तेलकट पदार्थ खातो याने देखील आपली पचन संस्था कमजोर होवून शरीराला आपण खाल्लेल्या अन्नाच काही फायदा मिळत नाही आणि याच कारणाने आपण वारंवार आजारी पडत असतो.
नेहमी आपल्याला काही ना काही शारिरीक समस्या जाणवत असते. जरासे देखील काम केल्यास आपल्याला थकवा जाणवू लागतो. या सर्व समस्यांवर बाजारात आता अनेक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत. मात्र सारख्या व नियमित रित्या या गोळ्या व औषधे खाल्यास यांचा आपल्या शरिरावर वाईट परिणाम दिसून येवू लागतो. तुम्ही देखील या सर्व समस्यांना तोंड देत असाल अथवा यावर एक कायमचा उपाय शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
आता सुटकेचा निश्वास घ्या. आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत ज्याच्या फक्त आठवड्याभर वापराने तुमच्या सर्व व्याधी अगदी समूळ नष्ट होतील. हा एक नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. सोबतच आयुर्वेदात देखील या उपाया बाबत नमूद केले गेले आहे. घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हा रामबाण उपाय तयार करु शकता.
चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी पहिला घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे गुळ. होय गुळाचे सेवन शरीरासाठी साखरपेक्षा जास्त फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून आपला बचाव होतो. घसा खवखवणे अथवा दुखणे यावर देखील गुळाचे सेवन उत्तम मानले जाते. पोटाच्या विकारांवर देखील गूळ एक रामबाण उपाय आहे.
अन्न पचन होण्यास काही बाधा येत असेल तर गुळाचे सेवन आवर्जून करा याने तुम्हाला नक्कीच फायदा जाणवू लागेल. गूळामध्ये आपल्या शरिरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. त्यामूळे याच्या सेवनाने बरेचशे आजार आपल्या आस पास फिरकत सुद्धा नाहीत. गुळाच्या सेवनाने हाडे देखील मजबूत होतात. याच बहुगुणी गुळाचा वापर आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी करायचा आहे. दुसरा घटक जो आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे तीळाचे दाणे.
तीळ हे आपल्या शरीराला उर्जा मोठ्या प्रमाणात देतात. याचे सेवन हिवाळ्यात आवर्जून केले गेले पाहिजे. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती या तीळांच्या सेवनाने वाढू लागते. चेहर्यावर जर तुम्हाला नैसर्गिक चमक हवी असेल अश्या वेळी देखील तीळाचे सेवन महत्वपूर्ण मानले जाते. तीसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे भिजलेले शेंगदाणे. होय हेच शेंगदाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात.
याच्या सेवानाने शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रथिने मिळतात. मित्रांनो ज्यांना वजन वाढवायचे आहे अश्या लोकांनी या शेंगदाण्याचे सेवन नक्कीच करा. या उपायासाठी शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घाला. आता गूळ, तीळाच्या बिया व भिजलेले शेंगदाणे यांना मिक्सर मध्ये बारीक करा आणि या मिश्रणाचे सेवन सकाळी रोज उपाशी पोटी करा याने तुमच्या शरीरात कमालीची उर्जा येईल. सोबत रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.