घराच्या कोपऱ्यात ही एक वस्तू ठेवल्याने उंदीर घूस घरात चुकूनही पाय ठेवत नाही.! एकदा करून बघा उंदीर घूस दिसणार सुद्धा नाही.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो घरात असे अनेक प्राणी असतात जे आपल्याला भरपूर असा त्रास देऊन सतावत असतात. आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत उंदरांना औषध न देता किंवा न मारता कसं घरातून पळून लावायचं? उंदर एकदा का घरात घुसले तर खूप वैतागून सोडतात. उंदरांमुळे आपण सगळेच हैराण होऊन जातो. कपडे, फर्निचर, कागद, खाण्यापिण्याचे सामान आणि अनेक महत्त्वाच्या वस्तूची उंदर वाट लावून टाकतात. खूप नुकसान करतात.

घरात इकडून तिकडून पळणारे उंदर पाहिले की राग तर येतोच पण किळस ही येते. आणि हे आरोग्यास हानिकारक ही असते. विजेच्या तारा कुर्ताडल्या तर शॉर्ट सर्किट चा धोका असतो. उंदर घरात खूप घाण करतात. घरात दुर्गन्ध पसरतो. जास्त करून लोक उंद्र पळवण्यासाठी रॅट किलर किंवा विष वापरतात. ज्यामुळे उंदर बाहेर जाऊन नाही तर ते खाऊन घरातच मरतात. आणि त्यामुळे खूप घाण वास पसरतो.

जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उंदर घराबाहेर पळवून लावू शकता. त्यासाठी पुढे दिलेले काही घरगुती उपाय तुम्ही करून बघा. 1) पेपरमिंट : उंदीर पळवण्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये पेपरमिंटच्या वापर करू शकता. एका संशोधनात सिद्ध झाले आहे की उंदरांना पेपरमिंट चा वास अजिबात आवडत नाही. उंदीर पळवून लावण्यासाठी तुम्ही कापसाच्या बोळ्यामध्ये पेपरमिंट चा वापर प्रत्येक कोपऱ्यामध्ये करू शकता.

हे वाचा:   रोज भात खाणारे नक्की वाचा.! तुम्ही कोणते तांदूळ खाता यावरच आहे तुमचे आरोग्य अवलंबून.! प्रत्येकाने नक्की वाचा.!

याशिवाय तुम्ही पुदिना चे पान किंवा फुलं कुटून उंदीर येणाऱ्या जागेवर किंवा बिळाजवळ ठेवा. उंदराना नीट दिसत नाही पण त्यांची गन्ध शक्ती खूप स्ट्रॉंग असते त्यामुळे पेपरमिंटच्या वासाने उंदर पळून जातील. 2) लाल मिरची पावडर : खाण्यात वापरली जाणारी लाल मिरची पावडर ही उंदरा पळवण्यासाठी अत्यंत बेस्ट आहे. ज्या जागेवर ती उंदरांचे सतत येणे-जाणे असते त्या जागेवर तुम्ही लाल मिरची पावडर ठेवून द्या. यामुळे उंदीर घरातून पळून जातात.

3) तमालपत्र : स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यात असणारे तमालपत्र हे देखील उंदरांना पळवण्यासाठी काम करते. 4) उंदीर पकडण्याचा पिंजरा : या पिंजरा मध्ये काही उंदरांच्या आवडती चे खाण्याचे पदार्थ ठेवून उंदरांना आकर्षित करून तुम्ही उंदीर पकडून घराबाहेर सोडू शकता. 5) केसं : असं म्हणतात उंदरांच्या खाण्यामध्ये माणसाचे केस आल्यास उंदरांचा मृत्यू होतो. त्यामुळे उंद्र माणसाच्या केसांपासून दूर पळतात.

6) कांदा : कांद्याचा वास देखील उंदरांना पळवून लावतो. 7)उंटाच्या पायाची नख : ज्या जागेवर उंदरांचा सतत वावर असतो त्या जागेवर उंटाच्या पायाचे नखं ठेवल्याने उंदीर पळून जातात. त्या घरी उंदर परत येत नाहीत. 8)काळी मिरी : उंदर लपलेल्या जागी काळी मिरीचे दाणे पसरवा. 24 तासात च उंदर पळून जातील. 9)आजकाल बाजारात रॅट ट्रॅप मिळते. ज्यामुळे उंदीर त्याला स्पर्श केले असता त्याला चिकटून बसतात.

हे वाचा:   या वेलीने अनेक रोगांवर आपले योगदान दिले आहे.!!! जिथे दिसेल तिथून घेऊन यावी ही वेल.! आयुष्यात खूप रोगांवर उपयोगी पडते.!

अश्या प्रकारे उंदीर न मारता तुम्ही पकडू शकता. तुम्ही जर प्राणी प्रेमी असाल तर उमरान साठी मांजर पाळणे हा एक अत्यंत सरळ सोपा आणि बेस्ट उपाय आहे. मांजरामुळे उंदीर त्या घरात फिरकतही नाहीत. अशा प्रकारे निरनिराळ्या उपायामुळे तुम्ही उंदरांना दूर ठेवू शकता घराबाहेर हाकलून लावू शकतात तेही न मारता…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.