सर्वांना वाटत असते की आपले केस हे सुंदर दिसावे. यासाठी बाजारामध्ये मिळत असलेल्या वस्तूंचा वापर केसांसाठी केला जातो. परंतु काही वेळा याचे भयंकर असे परिणाम आपल्याला दिसून येत असतात. परंतु आपण याकडे सहसा लक्ष देत नाही. अनेकांना केसांवर मेंदी लावणे आवडते. काही लोक केसांच्या कंडिशनिंगसाठी वापरतात, तर काही लोक केसांना रंग देण्यासाठी डोक्यावर मेंदी लावतात.
बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य उत्पादनांपेक्षा मेहंदी अधिक सुरक्षित आहे, कारण त्यात हानिकारक रसायने नसतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हानिकारक असतो. हे आपल्याला ठावुकच आहे. काही लोक केसांवर मेहंदी कित्येक तास ठेवतात. त्यांना असे वाटते की यातून अधिक लाभ मिळतील. पण उलट घडते, जास्त मेंदी लावल्याने केसांचे नुकसान होते.
केसांवर किती वेळ मेहंदी लावायची हे आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. अन्यथा यामुळे काही नुकसान देखील होऊ शकते. आजच्या या लेखात आपण याबाबत ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही देखील केसांना मेहंदी लावून 4-5 तास सोडाल तर आजच ही सवय बदला. कारण, यामुळे तुमचे केस फक्त कोरडे होऊ शकत नाहीत, तर त्यांचा पोतही खराब होऊ शकतो.
तज्ञांच्या मते, केसांना रंग देण्यासाठी दीड तासांपेक्षा जास्त काळ मेंदी सोडू नका आणि कंडिशनिंगसाठी केस फक्त 45 मिनिटांनी धुवावेत. म्हणजे इतक्या वेळचं मेहंदी ही केसांना लावून ठेवावी. केसांना मेहंदी लावल्यानंतर केस शॅम्पूने चांगले धुवा. यानंतर, केस सुकवताना, जेव्हा ते हलके ओले राहील, तेव्हा तुम्ही कोणतेही तेल लावू शकता. मेहंदी केस सुकवू शकते. त्यामुळे मेंदी विरघळताना त्यात कोणतेही आवडते तेल मिसळता येते.
याशिवाय मेहंदीमध्ये दही घालून केसांची कंडिशनिंगही करता येते. बाजारातून मेहंदी पावडर खरेदी करताना लक्ष ठेवा. कारण आजकाल त्यातही रसायने मिसळली जात आहेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.