स्वयंपाक घर नेहमी या दिशेला बनवावे, कधीच पैश्याची कमी होणार नाही.!

अध्यात्म

मित्रांनो असे म्हटले जाते की एखाद्याचे मन जिंकायचे असेल तर त्याला चांगले चांगले खायला द्यावं. म्हणजेच एखाद्याच्या मानत जायचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. जेवणातील घटकांमुळे आपल्याला शक्ती मिळते. घरातील गृहिणीचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरात जातो. पण किचन मधील छोट्या आणि बारीक चुकांमुळे आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसून येतो.

फक्त आपणच व आपल्या घरातील सर्व सदस्य नाही तर आपल्या घरात आलेला प्रत्येक जण आपल्या स्वयंपाक घरात तयार झालेले जेवण जेवतो आणि त्या द्वारे त्याला शक्ती आणि ऊर्जा मिळते. परंतू जिथून ऊर्जा मिळत असते असे जेवण स्वयंपाक घरात तयार होते आणि याच्या ठिकाणी जर काही दोष असेल तर याचे परिणाम आपल्या पूर्ण घराला भोगावे लागतात. तर कोणत्या आहेत या छोट्या छोट्या चुका त्या आता आपण जाणून घेऊया.

आपण सकाळी उठलो की चहा किंवा पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवतो अथवा गॅस चालू करतो. पण त्या पूर्वी आपणच गॅस किंवा चूल कधी साफ करतो का नाही ना..? आपण काय म्हणतो रात्री गॅस स्वच्छ केलेला आहे मग सकाळी का करायचा, परंतू रात्र भर गॅस तसाच राहिल्याने त्यावर काही सूक्ष्म जीव तयार होतात व वाढत राहतात. त्यांना नष्ट करणे गरजेचे असते. या सोबत त्यावर नकारात्मक शक्ती रात्र भर तयार झालेली असते ती देखील संपवणे फार गरजेचे आहे. म्हणून सकाळी गॅस स्वच्छ केल्या शिवाय कधीच चालू करू नये. सकाळी उठून छान स्नान करून मगच किचन मध्ये प्रवेश करावा. स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे त्यामुळे इथे स्वच्छता आणि पावित्र्यता असणे फार आवश्यक आहे.

हे वाचा:   स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक मुळीच करू नका; यामुळे घरात गरिबी येते.. पैसा टिकत नसेल तर आजपासूनच सावध व्हा.!

आपल्या किचन मध्ये संध्याकाळी एक शुद्ध तुपाचा दिवा नक्कीच लावावा. यामुळे वातावरण शुद्ध होऊन यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात आणि आपल्याला या द्वारे सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरात असणारी आपलीच चूल आणि गॅस हे नेहमी आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा जिथे मिलन करतात तिथे गॅस अथवा चुलीचे मुख असावे. आग्नेय दिशा म्हणजे अग्नीची दिशा आहे म्हणून चुलीचा मुख भाग हा आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. याने घरातील स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते.

उत्तरेकडे गॅस कधीच ठेवू नये. या सोबत दक्षिणेकडे देखील चुलीचे तोंड करणे अशुभ मानले जाते. मित्रांनो किचनमध्ये फ्रीज ठेवताना आपण कोणता ही विचार करत नाहीत. जिथे जागा मिळेल तिथे फ्रीज नेवून ठेवतो. परंतू उत्तर दिशा व पश्चिम दिशा या दिशांना कधीच फ्रीज ठेवू नये. इतर कोणत्या ही दिशेस फ्रीज तुम्ही ठेवू शकता. किचन मधील जड वस्तू जसे गॅस सिलिंडर व मिक्सर या नेहमी दक्षिण दिशेला असाव्यात.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

आपल्या पिण्याचे पाणी ठेवत असणार्‍या गोष्टी जसे माठ, हंडा, कळशी किंवा टाकी या स्वयंपाक घरात नेहमी पश्चिम दिशेला ठेवाव्या. यामुळे घरातील सर्व भांडण तंटे मिटून जातील आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल. किचनमध्ये कधीच स्टोअर रूम असू नये याने घरात येणार्‍या उत्पन्नावर वाईट परिणाम दिसून येतो. मेहनत करून देखील हातात पैसे टिकत नाहीत. सोबतच नोकरी व्यवसायात देखील अपेक्षित लाभ मिळत नाहीत.

मित्रांनो किचन मध्ये देवघर ही कधीच असू नये. यामुळे घरातील सदस्यांत गैरसमज निर्माण होवून भांडण तंटे होण्याची शक्‍यता असते. घरातील मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच किचन असू नये. यामुळे घरात असणार्‍या कर्त्या पुरुषाच्या उत्पन्नात अनेक प्रकारच्या बाधा निर्माण होवू लागतात आणि त्याच्या कामात अडचणी येत राहतात. बैठकीच्या खोली जवळ देखील स्वयंपाक घर असू नये.

यामुळे नातेवाईकात शत्रुत्व निर्माण होते. स्वयंपाक घरामध्ये बेसिन हे पश्चिम किंवा दक्षिण दिशेलाअसलेले सर्वात चांगले मानले जाते. स्वयंपाक घरात कट्टा बनवताना काळ्या रंगाच्या दगडाचा वापर करू नये त्या एवजी मरुन रंगाच्या दगडाचा वापर करावा. या सर्व घटकांचे पालन करून जर आपण आपल्या घरचे स्वयंपाक घर तयार केले तर सर्व क्षेत्रात आपल्याला यश मिळेल सोबतच पैसा व सुख शांती घरात नांदू लागेल.