घरापुढे केळीची झाडे शुभ की अशुभ.? केळीचे झाड वास्तू शास्त्राच्या अनुसार कोणत्या दिशेस लावले गेले पाहिजे.?

अध्यात्म

झाडे आणि वनस्पती आपल्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहेत. झाडे माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतात या सोबत झाडे आपल्याला प्राणवायू ऑक्सिजन देखील देतात ज्याच्या शिवाय आपण क्षणभर ही जगू शकत नाही. मित्रांनो आपल्या घरच्या अवती भोवती अनेक झाडे झुडपे वृक्ष आणि वेली असतात. नारळ आणि केळ ही दोन झाडे तर आपल्याला गावच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी पाहण्यास मिळतातच.

केळीचे झाड हे वास्तू शास्त्राच्या दृष्टीने घराच्या आस पास असणे शुभ मानले जाते. सोबत या झाडाला देवाचे आणि शुभ मानले गेले आहे. पूजेचे जेवण देखील केळीच्या पानावर केल्यास मोठे पुण्य आपल्याला लाभते आणि पूजा संपूर्ण होते. मात्र वास्तू शास्त्राच्या अनुसार केळीचे झाड घराच्या भोवती लावण्यासाठी एक योग्य दिशा आणि जागा असते. होय चला आमच्या या लेखात आपण या बाबतच थोडी माहिती घेणार आहोत.

प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी आपण केळीच्या पानांचा वापर करतो. अनेक देवी देवतांना आपण केळीचे फळ नैवेद्य म्हणून अर्पण करतो या अर्थी केळीचे झाड हे अत्यंत शुभ आहे. खर तर तुळशीच्या नंतर केळीचे झाड हे अतिशय शुभ मानण्यात येते. मात्र कोणते ही झाड जर चुकीच्या दिशेला असेल तर वास्तुच्या सभोवताली अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि म्हणूनच झाडाची योग्य दिशा माहीत असणे हे फार गरजेचे असते.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

मित्रहो जर तुम्ही शहराच्या ठिकाणी फ्लॅट मध्ये राहत असाल तर केळीचे रोपटे कुंडी मध्ये अथवा घरातील रिकामी जागी चुकून ही लावू नका. अन्यथा घरात मोठ्या प्रमाणात आपसात वाद विवाद आणि भांडण तंटे उत्पन्न होवू लागतात. याच बरोबर घरातील शांती देखील भंग होवून जाते. अश्या घराची प्रगती तर होते, पैसा तर येतो परंतू सुख अजिबात लाभत नाही.

अनेक जण घराच्या छतावर केळीचे रोपटे लावण्याचा प्रयत्न करतात. अश्या वेळी कुंडी मध्ये घरातील छताच्या मागची जागा आहे तिथे केळीचे रोपटे तुम्ही लावू शकता. मात्र छताच्या पुढच्या बाजूस आपण चुकून ही ही रोपटे लावू नका. अन्यथा वास्तू दोष नक्की उद्भवतो. घरात पैशाची मोठ्या प्रमाणावर हानी होवू लागते आणि अनेक प्रकारची संकटे देखील येवू लागतात.

मित्रांनो तुम्ही तुमच्या घरच्या अंगणात तुम्ही केळीचे रोपटे लावण्याचा विचार करत असाल, तर हा विचार नक्कीच टाळावा. अंगणात जर तुम्ही केळीचे रोपटे लावल तेव्हा त्याच्या बेटाने अनेक झाडे तिथे तयार होतील आणि यानेच वास्तू दोष निर्माण होवून घरात असणार्‍या जोडप्यांमध्ये मतभेद होवू लागतील व हे एवढे टोकाला जातील की अगदी घटस्फोटा पर्यंत विषय जातील. सोबतच अश्या घरातील लोकांवर मृ’त्यू सारखे संकट देखील येवू शकते. म्हणून अंगणात देखील कधीच केळीचे रोप लावू नये.

मित्रांनो आपल्याला धर्मात एकूण अठरा पुराणे आहे आणि या पुराणात केळीच्या झाडाच्या बाबतीत खूप माहिती विस्तारात दिली गेली आहे. केळीच्या वृक्षा मध्ये देव गुरू गृहस्पतींचा वास आहे. केळीचे रोपटे अनेकदा तुळशीच्या रोपट्या जवळ लावले जाते. अशी मान्यता आहे की तुळस ही माता देवी श्री लक्ष्मी यांचे प्रतीक आहे आणि केळीच्या झाडात स्वतः भगवान श्री हरी विष्णु वास करतात. म्हणून लक्ष्मी आणि नारायण यांना आपण एकत्र स्थापित करतो आणि त्यांची पूजा केली जाते तेव्हा घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू लागते त्याच बरोबर घरात धन वैभव येवू लागत.

हे वाचा:   सावधान...! याकाळात चुकूनही पाणी पिऊ नका अन्यथा होतील भयंकर आजार.!

जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुलसी माते सोबत हे झाड लावू शकता. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या अंगणात या केळीच्या झाडाची लागवड करायची असेल तर त्या साठी आपल्या घरची ईशान्य ही जी दिशा आहे या दिशेला तुम्ही केळीचे झाड अगदी बिनधास्त होवून लावा. ईशान्य कोपरा कोणता तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्या मधील भाग म्हणजे ईशान्य दिशा. ईशान म्हणजेच देवी देवतांची दिशा देखील समजली जाते. म्हणूनच या दिशेला लावलेले केळीचे रोपटे आपल्या घराची प्रगती घडवून आणते. घरातील समस्यांची प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होवू लागते. सोबतच घरात असणारे वाद विवाद देखील याने बंद होतील आणि घरात शांती आणि सुख नांदेल.