नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच आपल्या स्वयंपाक घरात मेथीदाणे पाहिले असतील. आज आपण पाहणार आहोत मेथी दाणे सेवनाचे आश्चर्यकारक फायदे. गुडघेदुखी,सांधेदुखी, इत्यादी प्रकारच्या कुठल्याही अंगदुखी, त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, तसेच केसांच्या तक्रारी, पुरुषांमध्ये वीर्याची कमी असणे आणि महिलांचा सर्व मा’सिक पा’ळीच्या तक्रारी यांचे सोल्युशन म्हणजे मेथी दाणे.
फक्त त्याचे सेवन कशा सोबत आणि कधी करावे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मधुमेह रोग्यासाठी मेथीदाण्याचे सेवन म्हणजे अमृतच. मधुमेहासाठी : ‘पाऊण’ चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी उठल्यावर मेथीदाणे बाजूला करून ते पाणी काहीही न खाता पिता प्यावे. मेथी दाणे चावू नयेत. अनियंत्रित साखर असल्यासच पाव चमचा मेथी दाण्यांना मोड आणून चावून खावे.
पुरुषांतील वी’र्य समस्या: अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून त्याला मोड (अंकुर )आणावेत. मोड येण्यासाठी सुमारे दोन दिवस लागतात. १ग्रॅम अश्वगंधा चूर्ण,१ ग्रॅम शतावरी पावडर सोबत मोड आलेली मेथी दाणे सकाळी अनुशापोटी व्यायाम केल्यानंतर कोमट पाण्यासोबत याचे सेवन करावे. (पाणी तांब्याच्या भांड्यातील घ्यावे.)
भयंकर प्रमाणात हात-पाय, गुडघे, कंबर, पाठ,सांधे दुखी: वयोमानानुसार अशा प्रकारचे दुखणे येणे स्वाभाविकच आहे परंतु तरुण वयातच अशा प्रकारचे दुखणे येणे ही एक मोठी समस्या आहे. अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यामध्ये रात्रभर भिजवून, सकाळी उठल्यावर ते मेथी दाणे त्याच पाण्यासोबत चावून खावेत. आपण घरी जे गिरणीतून पीठ दळून आणतो त्यामध्ये मूठभर मेथीदाणे टाकल्यास हाड दुखीच्या समस्या कमी होतात. यासोबत तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी, खूप आंबट खाणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
पोटाच्या तक्रारी: शरीरातील मेटाबोलिजम चे प्रमाण कमी होणे यामुळे पोटाच्या अनेक तक्रारी उद्भवतात. एक दिवसा आड अंकुरित केलेले मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यास मेटाबोलिजम वाढतो. पोट साफ राहते. वजन नियंत्रणात राहते. केसांच्या/त्वचेच्या तक्रारी: प्रत्येकालाच आपल्या सौंदर्याचे खूप महत्त्व असते. काही कारणामुळे त्वचा निस्तेज होणे ही एक कॉमन बाब आहे.
एक चमचा रोज अंकुरित केलेले मेथीदाणे सेवन केल्यास तुमच्या त्वचेवर कमालीचा ग्लो येईल. चेहरा सतेज होईल. मुरुमांच्या समस्या जातील. फेस पॅक मध्ये सुद्धा तुम्ही या मेथीदाण्याची पेस्ट करून वापरू शकता. ताज्या कोरफडीचा गर आणि अंकुरित झालेले मेथीदाणे मिक्सरवर एकत्र करून केसात लावल्यास सर्व प्रकारच्या केसांचा तक्रारींपासून तुमची सुटका होईल. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके सुंदर शायनी असे तुमचे केस दिसतील.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार 143 प्रकारचे भयंकर वातरोगावर मेथीदाणे वरदान आहेत. मेथी दाणे अशा प्रकारच्या जटील समस्या मुळांपासून उखडून टाकतात. रक्त शुद्धीकरणासाठी मेथीचे दाण्यापेक्षा उत्तम उपाय असूच शकत नाही. हाडांच्या बळकटीसाठी एक चमचा भिजवलेले मेथी दाणे चिमूटभर चुना सोबत खावे.
पाव चमचा रात्रभर पाण्यात भिजवलेले मेथी दाणे व एक चमचा शतावरी पावडर यांचे महिलांनी सकाळी दररोज सेवन केल्यास मासिक पाळीच्या सर्व तक्रारींवरती बहुगुणी ठरते. मासिक पाळीची अनियमितता, भयंकर पोट अंग दुखणं, अंगावरून रक्त जाणे, श्वेतपदर अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर खूप जबरदस्त हा उपाय आहे.
त्यासोबतच महिलांनी नियमित सूर्य नमस्कार केल्यास मा’सिक पा’ळीच्या कुठल्याही तक्रारी तुम्हाला होणार नाहीत. अशा आहे मेथी दाण्याबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हालाही वरीलपैकी कुठल्याही समस्या असल्यास तुम्ही त्यावर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत ही माहिती शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.