पहिला घटक : जिरा. दुसरा घटक लिंबू. एका ग्लासात गरम पाणी ओतून घ्या. त्यात एक लिंबू बिया काढून पिळा. त्यात अर्धा चमचा जिरं घाला. चमच्याने मिश्रण नीट ढवळून घ्या. हे रात्रभर असंच झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पेय चमच्याने पुन्हा एकजीव करून घ्या. नंतर गाळून घ्या. हे पेय परत कोमटसर करून घ्या व त्यात एक चमचा मध घाला. मिश्रण एकजीव करा.
उत्तम परिणामासाठी हे पेय आठवडाभर सलग प्या. जिरं आणि लिंबू चे शरीराला होणारे फायदे..
जिऱ्या मुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. जीरा मध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. पाचक असल्यामुळे पोट साफ होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास आपली मदत होते.
लिंबाचा रस लो कॅलरी असणारा असतो याशिवाय आपल्याला पोट भरलेले वाटत राहते. ज्यामुळे जास्त अन्न आपण सेवन करत नाही. म्हणून डायट मध्ये लिंबू वापरण्याचा सल्ला दिला जातो. लिंबू आणि जिरं दोन्ही ही लिव्हर साफ करायला टोक्सिक घटक बाहेर काढायला आपली मदत करतात. यामुळे किडनी स्टोन मध्ये ही खूप फायदा होतो.
लिंबा मध्ये असणारे सायट्रिक ऍसिड मुळे लघवीतील ऍसिडिटी पासून बचाव होतो. आणि स्टोन असल्यास फुटतो. या शिवाय तुमचा चेहरा फ्रेश राहतोच व लवकर सुरकुत्या पडत नाहीत. याचे अनेक फायदे तर वर आम्ही तुम्हाला सांगितले परंतु हा उपाय खासकरून वजन कमी करणाऱ्याना वरदान आहे.
सलग आठवडाभर हे पेय पिल्यास व सोबतच डायट (चांगला सकस आहार ) घेतल्यास, सूर्यनमस्कार चालणे थोडा किरकोळ व्यायामाची जोड दिल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागेल. सोबतच वेळेवर झोपणे पुरेसे तास याची पण काळजी घ्या. हे कमी झालेले वजन परत वाढणार नाही. अगदी सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला अवश्य फायदा होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.