म्हणून जपानी महिलांचा चेहरा इतका मऊ आणि दुधासारखा असतो.! त्या महिला ना लावत साबण ना कुठला फेस वॉश आपल्या चेहऱ्यासाठी वापरात ही एक गोष्ट.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो आजवर तुम्ही अनेक उपाय बघितले असतील पण आज खूप भारी उपाय बघणार आहोत. त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी आणि त्वचा पांढरी शुभ्र दिसण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास जपानची तांदुळाच्या पिठाची anti aging फेस मास्क चा उपाय. मित्रांनो, खरतर सुंदर आणि तरुण दिसणं हे सर्वांचे स्वप्न असते. त्यातल्या त्यात स्त्रियांना गोर, सुंदर आणि तरुण दिसाव असं खूप वाटतं असतं.

आजकालच्या हवामानामुळे प्रदूषणामुळे त्वचा काळवंडते तसेच वयोमानानुसार त्वचा सैल पडणे सुरकुत्या येणे सहाजिकच आहे. परंतु आज आपण एक जापनीज उपाय बघणार आहोत, ज्यामुळे आता तुम्ही देखील दिसू शकाल आमच्या वयापेक्षा दहा वर्षे तरुण..! चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यामुळे तुमचा सुंदर असलेला चेहरा खराब दिसायला लागतो.

मात्र, आपल्या स्वयंपाक घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचा उपयोग करुन करुन तुम्ही चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर करु शकता…आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत.कारण चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रथमदर्शनी भाग असतो.

हे वाचा:   एक ग्लास असा घ्या, डोळ्यावर चष्मा राहणार पण नाही, डोळ्याची नजर दहापट होईल.!

जाणून घेऊयात आजचा हा आपला अनोखा उपाय.., ज्यामध्ये आपल्याला लागणार आहे घरातीलच सर्व नैसर्गिक पदार्थ. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा घट्ट होऊन सुरकुत्या आणि रेषा जातील. जपान मध्ये तांदूळ हा घटक नैसर्गिक सौंदर्य उपचारांमध्ये अनेक वर्षांपासून वापरला जातो. त्यामध्ये विटामिन बी असते जे पावरफूल अँटी ऑक्सीडेंट असते.

जे आपल्या त्वचेमधील कॉलेजेन वाढवून सुरकुत्या हटवते. तांदूळात असणाऱ्या खनीजांमुळे त्वचेतील सेल आणि टीश्यू चे संरक्षण होते आणि aging कमी होते. याशिवाय आपल्या त्वचेतील रक्ताभिसरण चांगले होऊन डाग विरहीत त्वचा चमकु लागते. तीन चमचे तांदूळ एका बाऊलमध्ये घ्या. यात अर्धा लिटर पाणी घाला.

मंद आचेवर हे मिश्रण उकळायला ठेवा. चमच्याने सलग ढवळत रहा. तांदूळ नीट शिजवून घ्या. मिक्सरमध्ये हा अर्धवट शिजलेला तांदूळ त्याच्या पाण्यासकट बारीक करून घ्या. एक पेस्ट बनवून घ्या. या उपायामध्ये दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओमेगा-3 याने भरपूर असा जवस. तांदुळाप्रमाणेच जवस तीन चमचे अर्धा लिटर पाण्यात दहा मिनिट उकळून घ्या.

हे वाचा:   शरीरात होत असतात हे गजब विकार.! पाहून पायाखालची जमीनच सरकून जाईल.! याच्या सेवनाने सर्व आजार जातील पळून.!

थोडे थंड झाल्यावर वस्त्रगाळ करून घ्या. हे जेल तुम्ही साठवून ठेवा. दोन चमचे तांदूळ पेस्ट आणि जवसाचे जेल प्रत्येकी, एक चमचा बदामाचे तेल हे सगळे नीट मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावरती तीस मिनिटे लावून ठेवा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर गार पाण्याने. यानंतर चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचे तेल लावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.