फक्त सकाळी एकदा करा हा उपाय, पोट होणार झटपट साफ, अपचन चा त्रास आयुष्यरासाठी विसरवा लागेल.!

आरोग्य

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सर्वांच्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयीमुळे अनेक पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिक बाब आहे. अलीकडे बऱ्याच जणांना बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीच्या समस्येशी झुंज द्यावी लागत आहे. तस बघायला गेलं तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या मूळव्याध सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे सुरुवातीलाच काही घरगुती उपचार करून आपल्याला भविष्यात होणाऱ्या मोठा आजारांपासून बचाव करता येतो. बद्धकोष्ठता, अपचन, करपट ढेकरा येणे, मलावरोध, अ‍ॅसिडीटी, शौचासनीट न होणे, पोटदुखी यांसारखे अनेक प्रकार आहेत. वाढते वय, अशिक्षितपणा, कमी शारीरिक हालचाल, स्थूलता, काही प्रकारच्या औषधांच्या सेवनाने बद्धकोष्ठता वाढीस लागते.

त्यामध्ये पॅरासिटामोल, अस्पिरिन, कॅल्शियम आणि लोह वाढवणारी औषधे, ॲल्युमिनियम असणारी ऐसिडिटीची औषधे, काही पेन-किलर्स यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बेकरीतील मैद्याचे पदार्थ, हॉटेल मधील देखील मैदयाचे पदार्थ हे एक मोठे कारण दिसून येते. यामुळे कामामध्ये मन न लागणे, सतत पोट भरलेले वाटणे असे त्रास होतात व नैराश्य येणे ही पुढची लक्षणे होत.

हे वाचा:   या फुलाला साधारण समजू नका.! दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचतील.! हे आजार मुळापासून उखडून टाकेल हे फुल.!

महिलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. पोटात वारंवार गॅस होऊ लागला, अचानक केस गळती मोठ्या प्रमाणावर वाढली, त्वचेवर पिंपल्सचे प्रमाण वाढू लागले, नख कमजोर दिसू लागले की समजावे आपले पोट पाचनक्रियेत बिघाड झाला आहे. फार वेळ न घालवता आता पाहू यात घरगुती उपाय आणि काही टिप्स यामुळे तुमचे पोट साफ राहील आणि इतर भविष्यात कोणतेही आजार होण्यापासून तुम्ही तुमचा बचाव कराल.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ओवा, बडीशेप, जिरे, काळ मीठ हे सर्व घटक आपली पाचन शक्ती सुधा रण्यात मोलाची मदत करतात. दोन चमचे ओवा आणि दोन चमचे जिरे मंद आचेवर पाच मिनिटं भाजून घ्यावी. थंड झाल्यावर हे मिक्सर मध्ये घाला. यामध्ये दोन चमचे बडीशेप आणि दोन चिमूटभर काळ मीठ घालून पावडर बनवा. रक्तदाबाची ची समस्या असेल तर या उपायात मीठ वापरू नका.

हे वाचा:   किडणीला वाचवा.! किडनीला चिकटलेले विषारी पदार्थ काढून टाका.! आजपासून या भाज्या सेवन करणे सुरू करा आणि आपले आरोग्य बनवा अधिक सुंदर.!

आपलं चूर्ण तयार. हे हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात हे चूर्ण दोन लहान चमचे घालून ते पाणी प्यावे. थंड पाण्यात घेऊ नये. जास्त प्रमाणात त्रास असल्यास रात्री जेवणानंतर एक तासाने हा उपाय करावा. टिप्स : १ आहारात रोज एक चमचा साजूक तूप असावे. २. सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे.

३. आप-आपल्या वयोमानानुसार कमी-अधिक प्रमाणात ४५ मिनिटं रोज चालणे आणि व्यायाम आवश्यक होय. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *