मित्रांनो आजकाल प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. सुंदर दिसणे ही फॅशनच झाली आहे. यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या क्रीमचा वापर करीत असतात. परंतु काही वेळा या क्रीमचा परिणाम सुंदर दिसण्या ऐवजी चेहरा विद्रूप दिसायला लागतो. त्यामुळे आपण निराश होऊन जातो आणि कोणतेच उपाय करण्यास आपण तयार होत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील सुंदर दिसणे ही समस्या जर दूर होत नसेल तर मात्र आपण निराश होऊन जातो.
पण मित्रांनो आपण घरगुती, आयुर्वेदिक कधी उपाय केले तर ही समस्या दूर होऊ शकते. परंतु हे घरगुती उपाय आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतात. चला तर मित्रांनो सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात. मित्रांनो घरगुती उपाय करण्यासाठी आपणाला बटाटा स्वच्छ धूवून घ्यायचा आहे. हा बटाटा तुम्हाला बारीक खिसून घ्यायचा आहे. बटाट्या मध्ये तेज पणा जास्त असतो तसेच आपले शरीर हे उन्हापासून संरक्षण देण्यासाठी फायदेशीर ठरते.
चेहर्यावर उजळपणा आणण्यासाठी आपल्या त्याचा खूपच फायदा होतो. हा किसलेला बटाटा एका कापडामध्ये घेऊन त्याचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असणारा टोमॅटो. एक टोमॅटो तुम्हाला घेऊन ते देखील बारीक करून घ्यायचा आहे आणि याचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो जेव्हा हा रस तुम्ही एका भांड्यामध्ये काढत असाल तेव्हा ते भांडे स्वच्छ असावे म्हणजे त्या भांड्याचा अगोदर कधीही वापर केला नसेल असे भांडे घ्यायचे आहे.
बटाट्याचा रस काढलेल्या रसामध्ये हा टोमॅटोचा रस तुम्हाला घालायचा आहे. मित्रांनो या मिश्रणातून तिसरा घटक आपण मिक्स करणार आहोत तो म्हणजे मुलतानी माती. मुलतानी मातीचे आयुर्वेदात खूपच फायदेशीर उपाय सांगितलेले आहेत. एका बटाट्याचा रस आणि एका टोमॅटोचा रस त्यामध्ये तुम्हाला एक ते दीड चमचा मुलतानी माती घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र तयार करायचे आहे.
या मिश्रणात तुम्हाला एक चमचा बेसन घालायचे आहे. बेसन हे आपल्या चेहऱ्यावरती असलेले काळे डाग गायब करण्यासाठी उपयुक्त ठरतात. चेहऱ्यावर एक प्रकारची चमक आणण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या मिश्रणात तुम्हाला मित्रांनो अर्धा लिंबू पीळायचा आहे. लिंबू मध्ये विटामिन ई असल्याकारणाने आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्याचे काम हे उत्तम रित्या करीत असते.
तर तुम्हाला अर्ध्या लिंबूचा रस या मिश्रणात मिक्स करायचे आहे. जर मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर मात्र तुम्ही लिंबूच्या रसाचा वापर करायचा नाही. त्या जागी तुम्हाला गुलाबजल वापरायचे आहे. दोन-तीन मिनिटे हे तयार झालेले मिश्रण तसेच ठेवायचे आहे. नंतर तुम्ही हे मिश्रण आपल्या हातापायांना लावायचे आहे. हे मिश्रण हाता-पायांना लावल्यानंतर दोन तास किंवा तीन तास तसेच ठेवायचे आहे.
चेहऱ्याला हे मिश्रण तुम्ही जेव्हा लावता तेव्हा अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा हळुवारपणे धुवायचा आहे. चेहऱ्यावर एक प्रकारची चमक तुम्हाला दिसू लागेल. ब्युटी पार्लर मध्ये आपण फेशियल केल्यानंतर आपणाला दोन-तीन दिवस चेहरा चांगला दिसायला लागेल. दोन-तीन दिवस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा डल दिसू लागेल. कारण त्यामध्ये केमिकल्स असतात.
परंतु हा घरगुती उपाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसल्याने आपला चेहरा उजळ दिसायला लागेल. हे जे तुम्ही मिश्रण केले आहे हे मिश्रण तूम्ही करून कधीच ठेवायचे नाही. ज्या वेळेस तुम्ही उपाय करणार आहात त्या वेळेसच हे मिश्रण तयार करायचे आहे. हा उपाय करण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. कोणत्याही वयात तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही हा उपाय हाता पायांसाठी, चेहऱ्यासाठी करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला देखील जर कायम आपण सुंदर दिसावे असे वाटत असेल, चेहऱ्यावर कायम उजळपणा दिसावा तसेच आपला चेहरा डल दिसू नये असे जर वाटत असेल तर हा आयुर्वेदिक ,घरगुती व विना केमिकलयुक्त उपाय नक्की करून पहा. वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.