गुडघे दुखी ,कंबर दुखी, हात पाय दुखणे हे सर्व दुखणे आजच्या आपल्या घरगुती उपाय नंतर कमी व्हायला मदत होईल. एवढेच नाही तर हा उपाय जर तुम्ही सतत वापरला तर हे दुखणे कायमचे निघून जाईल. आता हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे ते आपण जाणून घेणार आहेत. सर्वप्रथम इथे आपल्याला एक आले घ्यायचे आहे.
आले मध्ये विटामिन सी, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम ही पोषकतत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. शरीरात बॅक्टेरिया आणि वायरस पासून लढण्याची ताकद निर्माण होते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढण्यासही मदत आणि वजन देखील कमी होण्यास मदत होते. आज चा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे आले किसून घ्यायचे आहे. आले वरील आपल्याला साल काढायची नाहीये.
कमीत कमी एक चमचाभर आले आपल्याला किसून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ओली हळद. ही हळत आपल्याला भाजी मंडळी मध्ये सहजपणे मिळून जाईल. या हळदीचा वापर देखील आपल्याला किसून करायचा आहे. हळद देखील आपने दुखणे कमी करण्याचे काम करते.
ही हळद अत्यंत पौष्टिक असते. हळद अशी आपल्या चेहर्यासाठी उपयुक्त असते तशीच ती आपल्या शरीरासाठी देखील उपयुक्त असते. आपल्याला लहानपणापासून जर काही खरचटले, काही जखम झाली तर सर्वप्रथम आपल्या घरातील माणसे त्या जखमेवर हळद लावत असत. कारण वळती अँटी बॅक्टरियल आहे. त्यामुळे त्यावर असलेले फंगल इन्फेक्शन देखील निघून जाते.
म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितल्या पासून आपण हळदीचा वापर करतो. आता इथे आपल्याला एक चमचे आले घेतले असेल तर दोन चमचे हळद घ्यायची आहे. या हळदीचे प्रमाण आले पेक्षा दुप्पट असले पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे. गॅस वर ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये पाव वाटी तिळाचे तेल टाकायचे आहे.
त्यानंतर या दोन्ही तेलांमध्ये किसून घेतलेले आले आणि किसून घेतलेली हळद टाकून घ्यायची आहे. आता मंद आचेवर या मिश्रणाला शिजवू द्यायचे आहे. जोपर्यंत आले आणि हळदीचे गुणधर्म तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे शिजवू द्यायचे आहे. हळदीमध्ये देखील प्रोटीन, विटामिन्स ए, एंटीऑक्सीडेंट, अंतीबॅक्टरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे शरीराच्या अंतर्बाह्य समस्या पूर्णपणे बऱ्या होतात.
आता हे मिश्रण शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करून या मिश्रणाला थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर हे तेल आपल्याला एका बॉटलमध्ये गाळून साठवून ठेवायचे आहे. एका वेळी आपण जास्त तेलही बनवून ठेवू शकतो. सौम्य दुखणे असो किंवा भयंकर दुखणे असो कोणत्याही प्रकारच्या दुखण्यासाठी हे तेल कायमच उत्तम कामगिरी बजावते. आपल्या शरीरावर कुठेही आपल्याला दुखत असेल तर हे तेल घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मालिश करायचे आहे.
कोणत्याही दुखण्यावर आपण मालिश करताना आपल्याला गोलाकार पद्धतीने मालिश करणे गरजेचे आहे. हा उपाय जर तुम्ही सलग तीन दिवस जरी केला तरी तुमचे दुखणे बंद होईल. या उपायांमुळे तुम्हाला कोणताही प्रकार ची हानी होणार नाही. उलट या उपायाचा तुम्हाला फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.