उसाचा रस शरीरात गेल्यावर शरीरात काय होते.? माहिती आहे का.? गारेगार उसाचा रस पीत असाल तर एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उसाचा रस आपल्या शरीरासाठी अजून फायदेशीर ठरतो. उसापासून साखर बनविली जाते. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरासाठी ती फायदेशीर नसते. पण ऊस आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. म्हणूनच आपल्याला उसाचा रस पिताना तो ताजाच प्यायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना स्वतःचे वजन कमी करायचं असेल त्यांनी उसाचा रस कमी प्रमाणातच प्यायला पाहिजे.

पण बाकीचे या रसाचे सेवन करू शकतात. लहान मुलांना देखील ऊसाच्या रसाचे सेवन करणे महत्त्वाचे असते. कारण उसामध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम. त्याच बरोबर कॅल्शिअम देखील असते. ज्यांची हाडे कमजोर आहेत, अशक्त आहेत त्यांना तर या उसाच्या रसाने खूप फायदा होईल. ऊसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात. शरीरामध्ये ताकद आणण्याचे काम उसाचा रस करतो.

त्याचबरोबर हाडांचे दुखणे, कंबर दुखी असे आजार देखील रस प्यायल्याने हळूहळू नाहीसे होऊ लागतात. का’वी’ळ या आजारासाठी उसाचा रस हा अत्यंत प्रभावशाली ठरतो. पण त्यासाठी हा रस ताजा पिणे खूप गरजेचे आहे. हा रस प्यायल्यामुळे अन्न पचायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये एक ताजेपणा आढळतो. हा रस आपण बाहेर पिताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून हा रस पीत आहोत ते ठिकाण स्वच्छ असणे गरजेचे आहे.

तिथे रसासाठी वापरलेला उस स्वच्छ धुतलेला आहे की नाही हे पाहणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तुम्ही उसाचा रस घरी देखील बनवू शकता. तुम्ही उसाला चावून देखील खाऊ शकता त्यामुळे आपल्या हिरड्या, आपले दात मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे उसाला चावून खाणे देखील तेवढेच फायदेशीर असते. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उसाचा रसाचे सेवन केले जाते. त्यामुळे जर तुम्हाला घरी उसाचा रस बनवायचा असेल तर तुम्ही घरी देखील हा रस बनवू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऊस स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

हे वाचा:   गळणाऱ्या केसांवर आठवड्यातून फक्त तीनदा लावावे लागते हे द्रावण.! केस गळतीसाठी सर्वात बेस्ट टेक्निक आहे ही.!

त्यानंतर त्या वरील साले काढून घ्यायचे आहेत. आणि उसाचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हा ऊस कापण्यासाठी तुम्हाला थोडा धारदार चाकू घेण्याची गरज भासेल. आणि त्यानंतर हे छोटे छोटे तुकडे मिक्सरला लावून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून तुम्ही याचा रस बनवून घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये हा रस प्यायल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला दिवसभर ताजे राहण्यासाठी मदत होते.

जेवढ्या प्रमाणात आपल्याला साखर धोक्याची असते तेव्हाच जास्त उपयोगी उसाचा रस असतो. जरी साखर उसाच्या रसापासून बनवत असेल तरी ती बनविण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्या पद्धतीमध्ये उसाचे असलेले सर्व गुणधर्म नष्ट होतात. त्यामधील सर्व औषधी गुणधर्म निघून जातात सर्व पोषक तत्वे मरून जातात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी साखर उपयुक्त नसते. अशाप्रकारे हा रस तुम्ही दररोज देखील सेवन करू शकता.

हे वाचा:   पोटातली घाण तीन मिनिटात बाहेर निघेल.! एक लिंबू घेऊन करायचे फक्त हे एक सोपे काम.!

हा रस प्यायल्याने आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उसाच्या रसामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर निघून जातात व आपले शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होते. आपल्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होतो. र’क्त ची हालचाल व्यवस्थित होते त्याच बरोबर र’क्तामध्ये असलेला दूषितपणा निघून जातो.

ज्या व्यक्तींना का’वि’ळ झालेली असते अशा व्यक्तींना उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो कारण की उसाचा रस सेवन केल्याने आपली लि’व्हर योग्य पद्धतीने कार्य करू लागते त्याचबरोबर लि’व्हर संदर्भातील असलेल्या समस्या लवकरच नष्ट होऊन जातात. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी व शरीराला शक्ती प्रदान करण्यासाठी उसाचा रस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

जर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली असेल तर अशा वेळी उसाचा रस अवश्य सेवन करावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *