आपल्यापैकी अनेक जणांना गुडघ्यांचा त्रास अजूनही असतात. हा त्रास दूर करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्याला गुडघ्यांच्या त्रासापासून मुक्तता काही मिळत नाही. हे त्रास कमी व्हावे म्हणून आपण भरपूर प्रयत्न करतो जसे की डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेणे, औषधे घेणे, दररोज कोणते ना कोणते मलम लावणे आणि या सर्वांमध्ये आपले गुडघे तर बरे होतच नाहीत.
सोबतच आपल्याला अजून कोणतातरी आजार तयार होतो आणि आपले भरपूर पैसे देखील यावर खर्च होतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट काही मिळत नाही. म्हणून आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या गुडघ्याचे दुखणे देखील कमी होईल सोबतच जॉईंट पेन असेल तर ते देखील निघून जाईल. हाडांचे दुखणे देखील कमी होईल.
चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया कशी असणार आहे. घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये अर्ध लिंबू आपल्याला कापून टाकायचे आहे. लिंबू आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते त्याचबरोबर ते गुणकारी देखील असते.
लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडाचे दुखणे गुडघेदुखी जॉईंट पेन यासाठी तर उपयोगी असतेच अनेक जण असे बोलतात की आंबट गुडघेदुखी असलेल्या लोकांनी खाऊ नये पण लिंबू उन्हाळ्यामध्ये खाल्यास ते फायदेशीर ठरते.
त्यामुळे पाण्यामध्ये एक लिंबू पिळून त्याचे पाणी आपण दररोज प्यायल्यास आपला हाडांचे दुखणे कमी होऊ लागेल आणि हाडांचा होणारा त्रास हळूहळू बरा होईल सोबतच आपल्याला एका ग्लासमध्ये दुध घ्यायचे आहे. दूध हे आपल्या शरीरासाठी जेवढे पौष्टिक असते तेवढी असते त्या पेक्षाही जास्त प्रमाणात आपल्या हाडांसाठी चांगले असते. आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी दुधाचा मोठा वाटा असतो.
दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. त्यामुळे एक ग्लास दूध घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे आले टाकायचे आहे.आले देखील आपल्या शरीरासाठी म्हणजेच आपल्या हाडांसाठी गुणकारी असते.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात: कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी कच्चे आले फायदेशीर ठरते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी कच्चे आले मदत करते. आणि आले टाकल्यानंतर आपल्याला या दुधाचे सेवन दररोज करायचे आहे. हे दूध दिवसातून तुम्ही कधीही पिऊ शकता. त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी पिण्याची गरज नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.