फक्त एका रुपयात मनी प्लांट होईल हिरवेगार, वाढ खुंटलेल्या मनी प्लांट मध्ये टाका ही एक वस्तू.!

आरोग्य

खूप लोकांचे म्हणणे असते की आमच्या मनी प्लांट ची पानं मोठी होत नाहीत. पानं मोठी होणं तर दूर मनी प्लांट ची वाढच होत नाही. जर तुमची पण अशीच तक्रार असेल की तुमचे मनी प्लांट चे रोपं वाढत नाहीये किंवा पानांचा आकार मोठा होत नाहीये. तर ही माहिती तुमच्यासाठीच! आज आपण मनी प्लांट मोठं करण्याची पद्धत आणि एक कमाल खताबद्दल माहिती घेणार आहोत.

मनी प्लांट च्या वेलाची कटिंग करून घ्या. पानाच्या तळाशी तंतुमुळं असतात असा एकच पान तंतू सोबत कट करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही फक्त एक पानापासून मनी प्लांट चे रोपं/वेल लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही अनेक पानं ज्यांना तंतुमुळं आहेत ती लावू शकता. आता प्रश्न असा आहे की तुम्ही हे कोणत्या ऋतूत लावावे. तसं तर तुम्ही थंडी सोडून कधीही सहज लावून वाढवू शकता.

परंतु परफेक्ट काळ हा पावसाळा होय. पावसाळ्यात कटिंग पद्धतीने मनी प्लांट पाण्यात किंवा जमिनीत सहज वाढतो. आता बघूया कटिंग ला कसं आणि कोणत्या मिडीयम मध्ये लावावे? तुम्ही पाण्यात किंवा जमिनीत तर हे लावूच शकता. पण सगळ्यात बेहतरीन पद्धत आहे नदीतील माती. नदीतील मातीमुळे पानांना लवकर मुळं फुटतात आणि कटिंग लवकर ग्रो होते. प्लास्टिक चा ग्लास घ्या.

त्याच्या बेसला एक छोटेसे छिद्र करून घ्या. असं केल्याने जास्तीचे पाणी साचून बुरशी लागत नाही. पाणी वाहून जाते. नदी पात्रातील स्वच्छ माती घ्या. त्या मातीने आपला प्लास्टिक चा ग्लास भरून घ्या. आणि त्याच्या मधोमध आपण केलेले पानाचे कटिंग हलक्या हाताने रोवा. हे जिथे ऊन लागणार नाही अशा जागी ठेवावे. मनी प्लांट चं रोप फक्त अशाच जागी वाढते जिथे सूर्यप्रकाश जातो पण ऊन पोहोचत नाही.

हे वाचा:   ही सहा झाडे तुमच्या घराजवळ असतील तर ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही.!

याला अंधाऱ्या खोलीत ठेवू नका. पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. त्याला पाणी देऊन सावलीत ठेवा. नदीरेतीत पाणी साचत नाही त्यामुळे एक ट्रे मध्ये हे ग्लास ठेवून त्यात ही थोडेसे पाणी मोईसचर साठी ठेवावे. ज्यामुळे आपली कटिंग चांगली होईल. २० दिवसांनी सलग पाणी देत राहिल्यावर अजून काही पानं फुटलेली तुम्हाला दिसून येतील.

आणि मुळाची वाढ झापाट्यानं झालेली बघायला मिळेल. तुम्ही ग्लासातून रेती आणि रोपं वेगळी करून घ्या. नंतर आपण हे मोठ्या कुंडीत लावू या. कटिंग करून तयार केलेलं रोपं ट्रान्सप्लांट करण्यासाठी मोठ्या आकाराची कुंडी घ्यावी.. साधारण १२ इंच.. मऊसर माती ज्यात पाणी साचून राहणार नाही अशी माती घ्या. कुंडीत रोपं लावण्यासाठी ६०% नदीरेत ३०% गांडूळ खत १०% नेहमीची माती एकत्र करून घ्या. आणि कुंडीत भरून घ्या.

त्यात ही तयार केलेली रोपं लावा. मनी प्लांट ची तेजीने वाढ होण्यासाठी आणि पानं मोठी होण्यासाठी काय करावे? त्यासाठी तुम्हाला बांबू काठी चा वापर करावा लागेल ज्यात पाण्याचा ओलावा आणि आदर्ता टिकून राहते. हे बाजारात सहज उपलब्ध असतात. अशी बांबू काठी त्या कुंडीच्या मधोमध रोवून घ्या. नंतर या कुंडीत तुम्ही तयार केलेली ३ मनी प्लांट ची रोपं एकाच कुंडीत लावू शकता.

हे वाचा:   दिव्यात फक्त एक चमचा आयुर्वेदिक चूर्ण टाका, माशा, मच्छर, कीटक निघून जातील.. शरीरातील ७२००० नसा होतील मोकळ्या..!

पाणी देत रहा.असं केल्यानंतर तुम्हाला ही कुंडी अशा जागी ठेवायची आहे जिथे फक्त सकाळचा सूर्यप्रकाश येईल पण दुपारचे ऊन येणार नाही. तीन दिवसांनी आपल्याला खत घालायचे आहे. १५ दिवसातच तुम्हाला चमकदार हिरवेगार पानं वाढलेला वेल दिसेल. पाणी देताना पानं आणि बांबू काठी ही ओली करत जावी. ४० दिवसातच वेलाची जोमाने वाढ होईल.

खत कोणते वापरावे? युरिया..! १० रुपये किलो किमतीच्या युरियाची कमाल तुम्ही अनुभवालच..हवाबंद बरणीत तुम्ही हे खत साठवून कायम वापरू शकता. हे खत वापरल्यामुळे वेलांची वाढ तर होतेच पानांना चमक येऊन हिरवीगार डेरेदार असा बहर येतो. २लिटर पाण्यात अर्धा चमचा युरिया मिक्स करून स्प्रे बाटलीने पानावर आणि मुळाशी दर १५ दिवसांनी फवारावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *