पालकांसाठी विशेष सूचना.! पावसाळ्यात मुलांची काळजी घ्या; रात्री ताप आल्यास पटकन करा हे एक काम.! लहान मुलांसाठी एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

पावसाळा ऋतू लागला की सर्व कडे हिरवेगार दिसू लागते अनेक लोकांना हा ऋतू खूप आवडतो परंतु अनेकांना हा ऋतू त्रासदायक देखील ठरत असतो. पावसामुळे सर्वत्र चिडचिड होत असते त्यामुळे अनेकांना बाहेर पडता येत नाही. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले जाते या पाण्यामुळे मच्छर होतात व आरोग्यास विविध समस्या निर्माण करत असतात. पावसाळा हा ऋतू अनेकदा नवनवीन आजार निर्माण करणारा ऋतू ठरला जातो.

कारण या ऋतूमध्ये सलग पाऊस सुरू असल्यामुळे सूर्यप्रकाश राहत नाही, जागोजागी रस्त्यावरती पाणी साचले जाते, स्वच्छ जागेवर डबकी तयार होतात. त्यामध्ये चिलटे माशा याचा प्रादुर्भाव खूपच जास्त प्रमाणात वाढला जातो आणि अनेक आजारांची लागण लहान मुले नागरिक तसेच मध्यमवयातील लोकांना होत असते. पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्यात याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी तुंबले तर ते फेकून द्यायला हवे, जुने कॅन, फुटलेली भांडी, मडकी जुने टायर, शहाळी यामध्ये अनेकदा पाणी साचून यात जंत निर्माण होतात आणि हे जंत नंतर मच्छर बनून आपल्याला त्रास देत असतात. नुकताच जन्मलेली लहान मुले ही खेळताना कुठलीही वस्तू तोंडात टाकत असतात यामुळे वायरल इन्फेक्शन होण्याची संभाव्यता वर्तवली जाते. लहान मुलांमध्ये ताप येणे, सर्दी होणं, खोकला येणं हे कॉमन आजार बघण्यास मिळतात.

हे वाचा:   ऐकायला विचित्र.! पण शेंगदाण्याचे हे तेल तुमचे आयुष्य दुप्पट करू शकते.! लहान मुलांना नक्की करून द्या हे दूध.!

हे सर्व आजार वायरल इन्फेक्शन मुळे होत असतात. अशावेळी पालकांनी एक पालक म्हणून जबाबदारी स्वीकारावी की लहान मुलांना बाहेरील पदार्थ हा खाऊ घालू नये बदलत्या वातावरणामध्ये लहान मुलांना खास करून याचा त्रास दिसून येत असतो त्यामुळे घरीच ताजे शिजवलेले अन्न लहान मुलांना खाण्यास द्यावे त्याचबरोबर जे घरामध्ये वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल देखील अशीच काळजी घ्यावी

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते म्हणजे घरातील वडीलधारी व्यक्ती आणि लहान मुले यांची विशेष अशी काळजी अशावेळी घेणे खूप गरजेचे असते कारण या आजारांचा सामना करतेवेळी या वयातील लोकांना याचा त्रास जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. अशावेळी लहान मुलांना जुलाब मलेरिया उलट्या गॅस्ट्रो टायफाईड कॉलरा डेंग्यू इत्यादी आजार होऊ शकतात.

अशावेळी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे जसे की लहान मुलांना गाळून आणि उकडून मगच पाणी पिण्यास द्यावे कारण वरीलपैकी जवळपास सर्वच आजार हे पाण्यामुळे होत असतात दूषित पाण्याचा वापर केल्यास हे आजार उद्भवू शकतात त्यामुळे पाणी पिताना लहान मुलांना पाणी गाळून आणि उकळून द्यावे. अन्नाद्वारे जास्त प्रमाणात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न हे ताजे गरम व शिजवलेले असावे.

हे वाचा:   डोळ्याची कुठलीही समस्या असू द्या, हे एक पान तोडून आणा; झटक्यात सर्व बरे होईल, सहजपणे डोळ्यांना आराम मिळेल.!

पाऊस सुरू झाला की लहान मुलांना पावसात भिजण्याचा मोह आवरत नाही परंतु पालकांनी याकडे लक्ष द्यायला हवे लहान मुलांना पावसामध्ये भिजू देऊ नये त्याचबरोबर त्यांच्या अंगावर ओले कपडे नाहीत ना याची काळजी घ्यावी अंगावर ओले कपडे असेल तर यामुळे देखील काही आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये कुठे गर्दी असेल किंवा गर्दीचे ठिकाणे असतील अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.

अशा प्रकारचा कुठलाही आजार समोर आला तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. पावसाळ्यामध्ये ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.