आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. आपण जे अन्न रोज खातो त्याने आपल्याला ऊर्जा, शक्ती तसेच काम करण्याची ताकद मिळते. आपल्या शरीराला रोज मोठ्या प्रमाणात कर्बोदके, प्रथिने तसेच अनेक जीवनसत्व यांची गरज असते. काही लोकांना हा प्रश्न पडतो की रोज ताज्या भाज्या, फळे तसेच पोषक पदार्थ ग्रहण करुन देखील तुम्हाला योग्य पोषण मिळत नाही असे का होते? याच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर घेवून आज आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत.
आमच्या या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला या मागचे कारण व खाण्याची नक्की वेळ आणि स्तिथी साधारण काय असावी या बाबत माहिती देणार आहोत. बोलणार आहोत पाच असे पदार्थां बद्दल ज्यांना तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाता. ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. लसूण हे कांद्याच्या प्रजाति मधील एक कंदमूळ आहे आणि प्रत्येक भारतीय या लसणी सोबत परिचित असतोच.
आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये लसूण मुबलक प्रमाणात मिळते. लसूण जेवणाला एक जायका म्हणजेच वेगळा तडका देण्याचे काम करते. भारतीय महिला फोडणी देताना लसणीचा वापर करतात. लसूण अत्यंत आयुर्वेदीक औषधी आहे. याच्या सेवनाने अनेक विकर बरे होवू लागतात. खोकला तसेच सर्दी यांसारखे आजार देखील आपल्या शरीरातून दूर निघून जातात. मात्र लसूण रोज खाल्यास आपल्या शरीराला हानि होते.
लसूण अत्यंत गरम असल्याने शरीरात गरमी वाढते तसेच रोज लसूण खाल्याने तुमच्या शरीरातील नर्वस भागांवर याचा वाईट परिणाम होतो. म्हणून लसूण रोज खावू नये. दुसरा घटक म्हणजे रताळे. रताळे देखील एक कंदमूळ आहे. या रताळ्या मध्ये अनेक जीवनसत्व असतात. सोबतच आयरन आणि जिंक देखील या मध्ये मोठ्या प्रमाणात सापडले जातात. वजन कमी असेल तर रताळ्याचे सेवन करा. वजन वेगाने वाढू लागेल.
वजन कमी करण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो. मात्र दोन्ही वेळा यांना बनवण्याची कृती वेग वेगळी असते. वजन वाढवण्यासाठी रताळी पाण्यात उकळून खाणे योग्य आहे. पाण्यात भिजल्याने यात कर्बोदके मोठ्या प्रमाणात वाढतात व वजन वाढण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी यांची बारीक फोडी करुन भाजी करुन खावी याने तुमचे वाढलेले वजन कमी होईल.
तुळसीच्या पानांना धार्मिक व आयुर्वेदीक या दोन्ही भागात उच्च स्थान दिले गेले आहे. तुळसी ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. खोकला तथा सर्दी त्वरित बरी करण्यासाठी तुळसीच्या काड्याचा वापर केला जातो. मात्र तुळसीला दूधाच्या चहासोबत कधीच घेवू नये याने तुमचे पचन तंत्रात बिघाड येवू शकतो. या सोबतच कोणत्या ही पदार्थां सोबत तुळसीची पाने शिजवून खावू नयेत. कच्ची तुळसीची पाने देखील खाणे अत्यंत अयोग्य आहे.
तुळसीच्या पानात बारा नावाचा एक घटक असतो जो तुमच्या दातांमध्ये अडकल्यास तुमच्या दातांना खराब करु शकतो. म्हणून शक्यतो तुळसीचे फायदे मिळवण्यासाठी तुळसीची पाने पाण्यासोबत घ्या. या नंतर घटक म्हणजे मोड आलेली कडधान्ये. कडधान्यात अनेक जिवंत जीवनसत्व असतात. रोज यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीरात कधीच कर्बोदके, प्रथीने तसेच कोणत्याच प्रकारच्या मिनेरलची कमी जाणवणार नाही.
मात्र ही मोड आलेली कडधान्ये शक्यतो कच्चीच खावीत. यांना कधीच शिवजून अथवा भाजून खावू नये या मागचे कारण म्हणजे तुम्ही जेव्हा याला शिजवता हे मोड जिवंत असल्यामुळे यातील सर्व घटक त्याच क्षणी म’रण पावतात. सोबतच यांना कधीच जेवणात खावू नये. जेवण घेण्या आधी दोन ते तीन तास आधी सलाड प्रमाणे ग्रहण करा. याने तुम्हाला यात असणारे सर्व गुणधर्म मिळतील.
शेवटचा घटक आहे पराठा. उत्तर भारतीय लोकांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पराठा. मात्र हा पराठा बनवताना अनेक लोक कच्च्या भाज्या गव्हाच्या पिठासोबत मिश्रित करण्याची चूक करतात. कच्च्या भाज्या कधीच शिजलेल्या चपातीत टाकू नये. यामुळे तुम्हाला गॅस तसेच अॅसिडिटी होवू शकते. म्हणूनच बटाटे अथवा मुळे पराठ्यात टाकण्या आधी तेलावर थोडेसे मंद आचेवर शिजवून घ्यावे.
याने तुम्हाला पराठ्यातील सर्व घटक मिळतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.