रोज सकाळी उठून दोन इलायची खाणाऱ्या लोकांचे शरीर असे असते.! हे पाच रोग अशा लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.!

आरोग्य

मित्रांनो विलायची म्हणजेच इलायची. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये इलायचीचा प्रामुख्याने वापर करत असतात. इलायची वापरल्याने अन्नपदार्थांना चव प्राप्त होते, म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला इलायचीचे असणारे अनेक फायदे सांगणार आहोत. इलायची हे आपल्या शरीरासाठी नव संजीवनी मानली गेलेली आहे.

इलायची अन्नपदार्थांना चव तर देते पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी रामबाण औषध देखील मानले गेलेले आहे. आरोग्य शास्त्रांमध्ये तसेच आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये इलायची सेवनाचे अनेक फायदे सांगितले गेलेले आहेत. याच अनेक फायद्याबद्दल अनेकांना माहिती नसते म्हणून आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला इलायची सेवनाने आपल्या शरीराला काय काय नेमके लाभ होतात हे सांगणार आहोत.

इलायची मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह यासारखे खनिज तत्व तर असतात पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व देखील उपलब्ध असतात. या सर्व तत्त्वांमुळे तुमच्या शरीर आतून आणि बाहेरून तंदुरुस्त बनते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य पद्धतीने कार्य करते. आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होत असतात अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती जर मजबूत असेल तर भविष्यात कोणतेही आजार होत नाही परंतु हल्ली परिस्थिती बदललेली आहे.

आपल्यापैकी अनेक जण नाजूक झालेले आहेत. वातावरणामध्ये झालेल्या बदला मूळ शरीरावर देखील बदल दिसून येतो म्हणून अनेकांना सर्दी खोकला, छातीमध्ये कफ असे अनेक समस्या सतावतात, अशावेळी अनेक जण चहामध्ये इलायची टाकून चहा सेवन करतात. इलायची मध्ये उष्णता गुणधर्म निर्माण करणारे अनेक औषधी तत्व असतात, ज्यामुळे आपल्या छातीतील कफ नैसर्गिक रित्या बाहेर पडतो व सर्दी देखील लवकर गायब होते.

हे वाचा:   फक्त दोन थेंब, हातापायाला येणाऱ्या मुंग्या होतील गायब, हे 15 आजार होतील झटपट गायब.!

ज्या व्यक्तींना वारंवार मूर्ख दुर्गंधी सतावत असते, तोंडाचा घाण वास येत असतो अशा व्यक्तीने दिवसभरातून एकदा विलायची म्हणजेच इलायची सेवन करायला हवी. इलायची मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात त्याचबरोबर नियमितपणे इलायची सेवन केल्याने भूक देखील वाढते. हल्ली अनेकांना भूक लागत नाही. पचन संस्था नेहमी धिमी झाली असेल तर अन्नपदार्थ खावेसे वाटत नाही परंतु इलायची सेवनाने आपली भूक वाढते त्याचबरोबर शरीरातील मूत्रनलिका देखील योग्य पद्धतीने कार्य करते.

आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी इलायची चावून चावून सेवन करू शकतो किंवा तुम्ही एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये इलायची पावडर बनवून देखील सेवन करू शकता किंवा गॅसवर एक पातेले ठेवून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून एक ते दोन विलायची टाकून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचे आहे आणि सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहे असे केल्याने तुमच्या शरीरात खूप सारे चमत्कार घडवतील.

ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही अशा व्यक्तींनी हे मिश्रण अवश्य सेवन करायला हवं त्यामुळे आपली पचन संस्था व्यवस्थित रित्या कार्य करते. लहान आतडे मोठे व्यवस्थित पणे त्यांची भूमिका पार पाडतात आणि परिणामी आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्याचे ऊर्जामध्ये रूपांतर होते. जर तुमच्या शरीरातील रक्त दूषित झाले असेल तर हे रक्त स्वच्छ करण्याचे कार्य इलायची करते. इलायची मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपले शरीर स्वच्छ करतात.

हे वाचा:   पोटाची वाढलेली चरबी करा गायब.! फक्त करा एवढे एक काम.! वाढत चाललेल्या चरबीचा मिळेल ब्रेक.!

जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी इलायची सेवन केली तर तुम्हाला भविष्यात मुळव्याध, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी कधीच होणार नाही या तिन्ही समस्या उद्भवण्यामागील आपले पोटाचे खराब असलेले आरोग्य कारणीभूत असते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपले पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी इलायची सेवन आवश्यक करायला हवे. जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल वाईट कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात वेगवेगळे आजार उद्भवत असतील तर अशावेळी देखील इलायची सेवन करणे लाभदायक ठरतं.

इलायची सेवन केल्याने आपल्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होतो व परिणामी बॅड कोलेस्ट्रॉल तयार होत नाही. इलायची सेवनाने आपले हृदयाचे आरोग्य निरोगी राहते त्याचबरोबर रक्ताच्या गुठळ्या देखील भविष्यात होत नाही. इलायची मध्ये पोटेन्शिअमचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच भविष्यात कोणत्याही प्रकारचे आपल्याला गंभीर आजार होत नाही रक्त प्रवाह सुरळीत होतो.

हृदयातील रक्तप्रवाह देखील नीट होतो म्हणून भविष्यात हृदयविकार होत नाही अशा प्रकारे वेगवेगळे अनेक फायदे इलायची सेवनाचे आहे आणि म्हणूनच उपाशीपोटी तुम्ही देखील इलायची सेवन आवश्यक करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.