तुम्हाला माहिती आहे का.? वाटीभर काळे मनुके केस काळे कुळकुळीत बनवतात.! प्रत्येक महिन्यात करायचा असा वापर.!

आरोग्य

डोक्यावर काळेभोर व तेजस्वी केस असणे हे आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते. होय केस काळेभोर, घनदाट व मजबूत असतील तर तुमचे व्यक्तीमत्व चार चौघात उठून दिसू लागते. तुमचा आत्मविश्वास देखील चांगलाच वाढू लागतो आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या सौंदर्याला चार चांद लागतात. केस सफेद होण्याचे वय हे साधारण पन्नासच्या पुढे असते. पन्नाशी ओलांडली की तुमचे केस पिकायला सुरवात होते.

जस-जसे तुमचे वय वाढते तसे तुमचे केस जास्त सफेद होवू लागतात व त्यांचे तेज देखील संपुष्टात येवू लागते. आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस वयाच्या आधीच सफेद होवू लागतात. होय आता आपण आपल्या परिसरात पाहिले असेल वीस-बावीस वर्षांच्या युवा मुलांचे देखील केस सफेद होवू लागले आहेत.

या मागे प्रदूषण हे कारण आहेच मात्र चुकीची व बाहेरचे मसालेदार व तीखट पदार्थ रोज खाल्यामुळे यांचा आपल्या चेहर्याच्या त्वचेवर व केसांवर वाईट परिणाम होवू लागला आहे. सोबतच जर तुम्ही रोज गोळ्या औषधे घेत असाल तरी ही तुमचे केस सफेद होवू शकतात. काही तक्रारीत हे अनुवंशिक देखील असू शकते.

तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल तर आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास टाका आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो तुमच्या केसांना तर काळेभोर बनवेलच मात्र सोबतच शरीराच्या बाकिच्या देखील अनेक व्याधींना बरे करेल. हो हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामूळे तुम्ही हा घरच्या घरीच तयार करु शकता.

हे वाचा:   आता डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, हा उपाय करेल पांढऱ्या केसांची सुट्टी.!

हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला कोणता ही मोठा खर्च करण्याची गरज भासणार नाही. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी हा निर्धोक आहे. याचा आपल्या शरीरावर याचा कोणता ही वाईट परिणाम दिसून येत नाही. चला आता वेळ न घालवता सदर लेखात पाहूया हा उपाय. मनुका या सुक्या मेव्याला तुम्ही ओळखत असालच. हा मनुक आपल्या मानवी शरीरासाठी देखील खूपच उपयुक्त आहे.

रिकाम्या पोटी काळे मनुके खाल्ल्याने तुम्हाला असणारा उच्च रक्तदाबाची समस्या कमी होवू लागते. या गुणकारी मनुक्याचे सेवन आपले हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. मनुक्याच्या पाण्यात लोह आढळते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास ती व्यक्ती अॅनिमियासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकते. मनुक्याचे सेवन शरीरात लोहाची मात्रा वाढवते. शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी देखील मनुके मोठ्या प्रमाणात मदत करतात.

अश्या या बहूगुणी मनुक्यापासून आपण आज आपला उपाय तयार करणार आहोत. या उपायासाठी सर्व प्रथम दहा ते पंधरा मि.ली. लिंबाचा रस घ्या. लिंबू आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम लिंबू करते. सोबतच लिंबामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात आढळते. हे जीवनसत्व क तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे.

हे वाचा:   आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

लिंबाचे अनेक गुणधर्म आहेत. लिंबाच्या सेवनाने शरिरातील पित्त कमी होण्यास मदत होते. आपल्या पचन क्रियेत कोणती ही समस्या जर उद्भवली या वेळी देखील लिंबू यावर एक रामबाण उपाय आहे. वजन वाढवण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी लिंबू उत्तम उपाय आहे. शरीरात अशक्तपणा अथवा थकवा आला असेल अश्या वेळी देखील लिंबाचा रस नक्की घ्या.

लिंबाच्या रसात काळे मनुके रात्री भिजात घाला व सकाळी मनुके पाण्यापासून वेगळे करुन कोमट पाण्यात टाकून मिक्सरच्या मदतीने बारीक करा व त्याचा रस तयार करुन घ्या. हा रस रोज रात्री झोपताना तुमच्या केसांच्या मुळांमध्ये लावा सकाळी केस साफ पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केस काळेभोर व घनदाट होण्यास सुरवात होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.