अनेक आजार आपल्या सुखी आयुष्याला सतावत असतात. आजकाल अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असतात. असाच एक कॉमन आजार आहे जो अनेक लोकांना दिसून येत असतो तो म्हणजे शुगर (डायबिटीज). अगोदर हा आजार उतरत्या वयामध्ये दिसून येत होता परंतु सध्याच्या काळात चुकीच्या खानपान यामुळे हा आजार लवकरच उद्भवलेला दिसून येत आहे.
अगदी तरुण मुले तसेच लहान मुलांना देखील शुगरची समस्या निर्माण झालेली दिसून येत आहे. अशावेळी काही घरगुती उपाय करून आपण डायबिटीस ला नियंत्रणात आणू शकतो. आजच्या या लेखामध्ये डायबिटीज नियंत्रणात आणण्यासाठी आपण कोण कोणते उपाय करायला हवेत याबाबत माहिती पाहणार आहोत. असे काही पदार्थ आहेत जे शुगर च्या पेशंटला अतिशय उपयुक्त मानले गेले आहे.
याचा फायदा शुगर असणाऱ्या पेशंटचा खूपच चांगल्या प्रकारे होत असतो चला तर मग लेखाला सुरुवात करुया. आरोग्य एक्सपर्ट नुसार असे सांगितले जाते की भुईमुगाच्या शेंगा ह्या शुगर असणाऱ्या पेशंटसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की भुईमुगाच्या शेंगा ह्या रक्तातील शर्करा चा स्तर कमी करण्यास फारच उपयुक्त ठरत असतात. याव्यतिरिक्त भुईमुगाच्या शेंगा मध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तात ग्लुकोज चे प्रमाण वाढू देत नाही.
याबरोबरच याचा ग्लायसेमिक इंडेक्स फारच कमी असतो. या सर्व कारणांमुळे भुईमुगाच्या शेंगा ह्या शुगर असणाऱ्या पेशंट साठी उपयुक्त मानल्या जातात. ज्या लोकांना शुगर चा त्रास आहे अशा लोकांनी दररोज सकाळी उठल्यानंतर एक मूठभर भुईमुगाच्या शेंगा खायला हव्यात. लक्षात ठेवा की शेगा खाताना यात मिठाचा वापर करू नका. यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढले जाते. खास करून महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण फारच कमी असते.
अशा वेळी जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर थोड्याशा भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.