पितळाच्या भांड्यांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व वाचून फेकूण द्याल; घरातली स्टीलची भांडी ! जाणून घ्या काय आहे पितळाच्या भांड्यांचे महत्त्व.?

अध्यात्म

जसाजसा काळ बदलत चालला आहे, माणूस वेगवेगळ्या प्रकारचे गृहपयोगी वस्तू वापरत आहे. मातीच्या भांड्यांपासून केलेली सुरुवात आता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांपर्यंत येऊन थांबली आहे. आज कोणत्याही घरात जाऊन बघा आपल्याला चमकणारी स्टीलची भांडी दिसतील. जुन्या काळी पितळेची व तांब्याची भांडी स्वयंपाकाकरता वापरली जायची. स्टीलची भांडी आल्यामुळे पितळेची व तांब्याची भांडी मागे पडली कारण या भांड्यांना घासण्याकरता जास्त वेळ लागायचा.

धावपळीच्या जीवनामध्ये स्टीलचा वापर सुरू केल्यापासून पितळेची भांडी वापरातून बाहेर गेली आहेत. जुन्या काळामध्ये पितळेच्या भांड्यांचाच जेवणाकरता व स्वयंपाकाकरता वापर केला जायचा व लोक देवपूजेकरता देखील पितळेच्या भांड्यांचा व वस्तूंचा वापर करत असत. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला पितळेच्या भांड्याचे धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व सांगणार आहोत.

पितळाच्या भांड्यांचे धार्मिक महत्त्व – पितळ या शब्दाची उत्पत्ती पित या शब्दापासून झाली आहे. संस्कृतमध्ये पित या शब्दाचा अर्थ पिवळे असा होतो. हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा भगवान विष्णुशी संबंधित मानला जातो. सनातन हिंदू धर्मामध्ये जेव्हा कोणती पूजा केली जाते किंवा धार्मिक कार्य केले जाते तेव्हा विशेषत: पितळेच्या भांड्यांचा वापर केला जातो.

हे वाचा:   तुम्ही जर या दिवशी नखे काढत असाल तर करत आहात खूप मोठे पाप.! नखे काढण्याचा असतो हा खास दिवस.!

वेदांचा एक भाग असलेला आयुर्वेद देखील सांगतो की भगवान धन्वंतरी यांना पितळेचे भांडे अतिशय प्रिय होते. महाभारताच्या एका कथेमध्ये असा उल्लेख सापडतो की, ज्यामध्ये सूर्यदेवाने द्रोपदीला पितळेचे अक्षय- पात्र वरदानात दिले होते. ज्यामधील अन्न कधीच संपत नव्हते.

पितळाचे ज्योतिषशास्त्रीय लाभ – ज्योतिष शास्त्रानुसार देव गुरु बृहस्पति यांचा पितळाशी व पिवळ्या रंगासोबत उल्लेख संबोधला गेला आहे. तसेच गुरुचे म्हणजेच बृहस्पतीचे पिवळ्या रंगावर आधिपत्य मानले जाते आणि पितळेवर देखील देवगुरु बृहस्पती यांचे आधिपत्य मानले जाते. गुरु ग्रहाची शांती करण्यासाठी पितळाचा वापर केला जातो, तसेच या ग्रहाच्या शांतीकरता व ज्योतिषीय अनुष्ठानाकरता पितळेच्या भांड्याचे दान केले जाते.

पितळाचे वैज्ञानिक फायदे – पितळ केवळ धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे व फायदेशीर नसते तर वैज्ञानिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील पितळेचा लाभ होतो. पितळाच्या भांड्यामध्ये शिजवलेले अन्न व पितळेच्या भांड्यांत भोजन केल्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. तसेच पितळेच्या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळे जेवन स्वादिष्ट लागते व मन तृप्त होते. पितळेची भांडी लवकर गरम होतात, ज्यामुळे ऊर्जेची बचत होते. तसेच पितळ हा धातू अतिशय मजबूत असल्यामुळे लवकर तुटत नाही.

हे वाचा:   असा अंगठा असणारे लोक असतात खूपच चतुर; कधीच कोणत्याही गोष्टीत मागे पडत नाही.!

पितळाच्या कलशामध्ये पाणी ठेवल्यामुळे अत्याधिक ऊर्जा मिळते. पितळ या धातूपासून ताट, वाटी,  ग्लास,  तांबे,  हंडे,  देवांच्या मूर्ती, सिंहासन,  घंटा, वाद्ययंत्र, कुलूप, पाण्याच्या टाक्या, घरामध्ये वापरणाऱ्या वस्तू तसेच लोक याचे दागिने देखील बनवतात. पितळ संबंधी आम्ही सांगितलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *