आपल्या आजूबाजूला अशी काही वनस्पती आहेत ज्यात औषधी गुणधर्म आहेत. परंतु त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. धोत्रा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. काही विशिष्ट प्रक्रिया केल्यावर विषारीपणा घालवल्यानंतरच ही वनस्पती आयुर्वेदात वापरली जाते. धोतरा एक वनस्पती आहे ज्यात मूळापासून ते खोडापर्यंत औषधी गुणधर्म असतात.
याशिवाय पाने, फुले व फळे यांनाही औषधी द्रव्याचे महत्त्व आहे. काटेधोत्रा हे फळ खुप विषारी असते आणि हे महादेवाचे आवडते फळ आहे. महादेवाच्या पूजेत धोत-यास महत्त्वाचे स्थान आहे. शंकरास प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या पूजेत धोत-याचे फळ आणि फूल वापरले जाते. धोतरा ही वनस्पती तुम्हाला वेगवेगळ्या रंगात आढळू शकते. काळा, पांढरा, पिवळा धोतरा सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. काळया रंगाचा धोतरा विषारी असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील ऊबदार प्रदेशांत आहे.
काळा धोतरा जास्त गुणकारी आहे. खोकला, कफ यावर धोत-याचा खूप उपयोग होतो. पांढरा धोतरा हा पूजेमध्ये वापरण्यात येतो. धोत-याची पाने दातेरी, लांब व एकाआड एक असून रंगाने हिरवट असतात. धोतऱ्याच्या सर्व जातींच्या बियांमध्ये आणि फुलांमध्ये स्कोपोलामीन हे प्रमुख अल्कलॉइड असून हायोसायमीन व अॅट्रोपीन ही इतर अल्कलॉइडे असतात. ही संयुगे विषारी व उत्तेजक असतात. त्या चुकून खाल्ल्यास डोके दुखते व उलटी होते.
धोतऱ्याची मात्रा अधिक प्रमाणात सेवन केल्यास मृ’त्यूही ओढावतो. हे फळ जखमेवर गुणकारी आहे. पण ते त्वचेवर वापरायचं आहे. त्यातील विषारी तत्वांमुळे ते खायचं मात्र नाही. शिवाय लहान मुलांपासूनही ते दूर ठेवायचं असतं. बर्याच शारिरीक आजारांपासून बचाव करण्याबरोबरच याचा उपयोग बर्याच धार्मिक कार्यक्रमांमध्येही केला जातो. मित्रांनो, जर धोतरा वनस्पती तुमच्या सभोवताली असेल तर, ही बातमी एकदा वाचाच.
तसेच धोतऱ्यामुळे साठलेल्या कफाचा नाश होऊन दमा दूर होतो. धोत-याच्या पानांची नुसती धुरी घेतली तरी दम्याची लक्षणे लगेच कमी होतात. धोतऱ्याची पाने हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यास उपयुक्त आहेत. धोतऱ्याच्या बियांमधून काढलेल्या तेलाने टाळूची मालिश केल्यास टक्कल निघून जाते. आणि डोक्यावर नवीन केस येतात. कानाचं दुखणं, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
धोतऱ्याच्या फळाचा रस काढून डोक्यावर लावल्यास केस गळण्याची समस्या संपते. आणि केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. धोतऱ्याची पाने लावल्यास पायाची सूज कमी होते. तसेच धोतऱ्याच्या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी कमी होते. हाडं मजबूत करण्यासाठी धोतऱ्याचा उपयोग होतो. धोतऱ्यात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं. धोतरा पिकांवर पडणा-या रोगांवर नियंत्रक म्हणूनही काम करतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.