बघा साबुदाणा कसा बनतो.! उपवासाला साबुदाना खात असाल तर नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच साबुदाणा माहीतच असेल. उपवास असल्यावर किंवा नाश्ता मध्ये आपण साबुदाणा खातो. साबुदाणा शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतोच त्याचबरोबर तो तेवढाच स्वादिष्ट देखील असतो पण हा साबुदाणा कसा बनतो? हे आपल्याला माहित आहे का.? आपल्यापैकी अनेक जणांना असे वाटत असेल की हा कोणत्या तरी झाडावर उगवत असतो.

किंवा साबुदाण्याचे झाड असते किंवा त्याचे रोप असत? आपण आज हेच जाणून घेणार आहोत की साबुदाणा कशापासून बनवला जातो व तो कसा बनवला जातो? .साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगोपाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो.हा चिक पदार्थ शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो.

भारतात याचा वापर साबुदाण्याची खीर आणि खिचडी बनवण्यासाठी करतात. आता हा साबुदाणा कसा बनवतात म्हणजेच हा साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. जसे की आपल्याला माहित आहे साबुदाणा सॅगोपाम झाडाच्या खोडा पासून बनवला जातो. या खोडांचा आकार आणि जवळपास हा रताळ्या सारखा असतो तर सर्वप्रथम एका भव्य मशीन मध्ये या खोडांना धुतले जाते.

हे वाचा:   जर तुम्हाला पण असतील या सवयी तर देव पण तुम्हाला वाचवू शकणार नाही.! या सवयी असणाऱ्या लोकांची किडनी फेल होते म्हणजे होतेच.!

कारण ही खोडे असल्यामुळे म्हणजेच माती खाली असल्यामुळे यावर भरपूर प्रमाणात माती असते त्यामुळे सर्वप्रथम या खोडांना व्यवस्थित रित्या साफ केले जाते. त्यानंतर साफ केलेल्या खोडांना त्याच मशीन मध्ये त्यावरील साले काढून घेतली जातात. साल काढल्यानंतर यापुढील प्रक्रियेमध्ये मशीनमध्येच याची बारीक पेस्ट तयार केली जाते.

त्यानंतर या पेस्ट मधल्या चीक बाजूला काढला जातो आणि तो वाळत ठेवला जातो. हा चीक व्यवस्थित रित्या वाळल्यानंतर त्यातून वाळून तयार झालेल्या पिठासारख्या मोठ मोठ्या खड्ड्यांना म्हणजेच त्या चीक ला एका गोडाउन मध्ये आणले जाते त्यानंतर एका विशिष्ट प्रकारच्या मशीन मध्ये टाकून हा चीक म्हणजेच सुकून घेतलेल्या चिकाचे गोलाकार पद्धतीच्या छोट्या छोट्या गोळ्यांमध्ये रूपांतर केले जाते.

हे वाचा:   आरोग्यासाठी अमृतासमान आहे ही वनस्पती, जिथे दिसेल तिथून घेऊन या, 72 हजार नसा झटपट मोकळ्या होतील.!

त्यालाच साबुदाणा असे म्हणतात. आता जसे आपण जाणून घेतले की साबुदाणा कशा प्रकारे बनविला जातो. आपल्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की तो पचायला चांगला असतो का? हा साबुदाणा खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होतात की तोटे.साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे पिताशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोन तयार करणाऱ्या ग्रंथीवर जास्त ताण पडतो.

पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात, अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला मधुमेह हा विकार बळावतो. भारतात साबुदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे. साबुदाणा पचनास अतिशय जड असल्यामुळे आम्लपित्त, वात, मलावष्टंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *