मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला विलायती चिंचेबद्दल माहिती देणार आहोत. नेहमीची आंबट चिंच आपण सगळ्यांनीच खाल्ली असेल. आपल्यापैकी काही जणांनी ही विलायती चिंच देखील चाखली असेल. हे फळ मुख्य मेक्सिकोहून आले आहे आणि आपल्या देशाच्या जंगलात याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आता हे देशात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते.
विलायती चिंच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी, बी6, बी 12, प्रथिने, लो फॅट , कारबोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, थायामिन, राइबोफ्लेविन सारख्या अनेक घटकांनी समृद्ध आहे ही विलायती चिंच. याच्या झाडाच्या सालाचा काढा आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवतात. याच्या नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्तीही वाढते.
याला जबरदस्त प्रतिकारशक्ती बूस्टर देखील म्हटले जाते आणि कोरोना महामारीच्या या काळात आपल्याला सर्वात जास्त प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. या चिंचेचे सेवन केल्यास पाचन शक्ती वाढते आणि पोटासाठी फायदेशीर ठरते. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. बर्याच अहवालांमध्ये असे सांगितले गेले आहे की ही चिंच खाल्ल्यास शरीरातील 100 हून अधिक आजार बरे होतात.
यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट आहेत ज्यामुळे शरीराला फायदा होतो. ज्यांना दुसऱ्या प्रकारातील मधुमेह(type 2) असणाऱ्यांना हि चिंच खाणे खूप फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार ही चिंच खाल्ली तर शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढणे थांबतात. या वनस्पतीची पान, साल, मूळ यांचा काढा करून पिल्याने कावीळ बरी होते.
गर्भवती महिला देखील याचे सेवन करू शकतात. या फळाचे सेवन केल्याने त्वचा गोरी नितळ होते. केसं गळती मध्ये याच्या पानांचा लेप करून लावल्याने केस गळती थांबते. नियमित काढा घेतल्याने ब्लॉकेजेस चा धोका टाळता येतो. आलं, लवंग, काळी मिरी सोबतच याच्या पानांचा काढा करून पिल्याने सर्व प्रकारच्या वेदनेतून सुटका होते.
या पानांच्या नियमित सेवनाने पुरुषांतील समस्या जसे लिंगाला ताठरता नसणे, नपुसंकता, यौन संबंधित सर्व विकार दूर होतात. किडनी विकारात देखील या फळांचा गर अथवा साल फायदेशीर ठरते. हळद, कोरफड, मलाई सोबतच याची पाने एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, वांग, फुटकूळ्या, चेहऱ्यावरील खड्डे सर्व जाऊन चेहरा सुंदर दिसतो…!
या वनस्पतीला तुमच्या भागात काय म्हंटले जाते ते कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.