मित्रांनो रस्त्याने चालत जात असताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल की प्रत्येक तीन ते चार व्यक्तींमागे एक व्यक्ती लठ्ठ आहे. यामध्ये काही लोकांच्या लठ्ठपणाने तर हद्दपार केलेली असते. त्यांच्या प्रत्येक अवयवावर लठ्ठपणाच्या खुणा जाणवतात. जगातले प्रत्येक देशामध्ये 20 टक्के पेक्षा जास्त लोक लठ्ठपणाचा भार सहन करतात. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आज कालचे खाल्ले जाणारे फास्टफूड.
परंतु जपान हा एक असा देश आहे की येथील लोक नाही डाएट करत, नाही घासफूस खाऊन जिवंत राहत तरी देखील सर्वात जास्त बारीक सडसडीत पातळ आणि स्वस्थ- निरोगी दिसून येतात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे यांचे वजन कमी असण्याचे आणि ऍक्टिव्ह जीवन शैली चे रहस्य!
एका निरोगी शरीराचे रहस्य त्याच्या स्वयंपाक घरात असते. तुम्ही कितीही व्यायाम करा की मा तासन्तास जिम मध्ये घालावा, जर तुमचे डायट ठीक नसेल तर तुमचे शरीर कधीच ठीक होऊ शकत नाही. म्हणून आज-काल लोकांना आहाराचे चार्ट बनवून देणारे लोक डायटीशियन प्रोफेशन मध्ये आहेत. आपल्याकडे पिझ्झा बर्गर यांचे जागोजागी मोठ्या प्रमाणात दुकान आढळतात.
जपानी लोक असे पदार्थ पंधरा दिवसातून फक्त एकदाच खातात. जपानी लोक व्यवस्थित जेवण करतात. त्यांच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असते. अनेक पदार्थ खाऊन देखील यांच्या शरीरावर मास चढत नाही याचं कारण म्हणजे अन्नाचे प्रमाण खूप कमी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणाच्या वेळा या फिक्स असतात. आणि हीच गोष्ट नेमकी त्यांना त्यांच्या पचनक्रिया मध्ये व्यवस्थित मदत करते.
आपल्याकडील लोकं मध्ये भूक लागल्यास स्नॅक्स किंवा तळलेले पदार्थ खातात याऊलट जपानी लोक मध्ये भूक लागल्यास फक्त आणि फक्त फळं खातात. आणि याचमुळे त्यांच्या शरीरामध्ये लठ्ठपणा फिरकत देखील नाही. खूप कमी लोक यांच्या घरी जेवण बनवतात. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना घरी जेवण बनवण्याचे वेळ नसतो त्यामुळे ते बाहेरून आणून खातात.
बाहेरील अन्नपदार्थांचे क्वालिटी देखील घरी बनवलेल्या प्रमाणेच असते. जपानी हॉटेल किंवा फुड स्टॉल वर कमीत कमी तेल आणि मसाले वापरून पदार्थ बनवले जातात. खाण्यापिण्या सोबतच शरीराला वर्कआउट करणे गरजेचे असते. ॲक्टिव जीवनशैली म्हणजेच वर्कआउट अशी या लोकांची व्याख्या आहे. सधन असून सुद्धा सायकल चालवणे, चालणे, सार्वजनिक वाहन वापरणे यामुळे त्यांचे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते.
जिम न जाता नियमित इतके चालल्यावर शरीर लठ्ठ कसे होईल याचा तुम्हीच विचार करा? जपान मध्ये जिम अगदी नगण्य प्रमाणात आहेत. जपानी लोकांचा पायी चालण्याचा सवयीमुळे येथे प्रदूषण देखील खूप कमी आहे. यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो शरीर अजूनच चांगले काम करते. न थकल्यामुळे त्वचा देखील राहते तरुण.
एक स्वस्थ जीवन जगण्यासाठी जसे जीवनशैली आवश्यक असते तसेच अगदी जापानी जीवन शैली आहे..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.