टॉमेटोच्या बियांच्या सेवनाने मूतखडा होतो का.? काय आहे याबाबतची सत्यता.? तुम्हाला माहिती आहे का.?

आरोग्य

आपल्या सर्वांच्याच घरामध्ये टोमॅटोचे सेवन केले जात असेलच. आपल्यापैकी काही जण टोमॅटो कच्चे देखील खात असतील. रोजच्या जीवनामध्ये डाळ भाजी यामध्ये देखील टोमॅटोचा वापर केला जात असेल सोबतच मच्छी,मटण यामध्ये देखील टोमॅटोचा वापर केला जातो. सलाड मध्ये देखील टोमॅटोचा वापर केला जातो. सलाड खाणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो मग टोमॅटो वापराने आपल्याला स्टोन होऊ शकतो का?

हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला असेल तर आज आपण त्या मागचे खरे उत्तर शोधून काढणार आहोत आणि जाणून घेणार आहोत टोमॅटो खाल्ल्याने स्टोन होतो की नाही. चला तर मग जाणून घेऊया. प्रत्येकाच्या घरात टोमॅटो असतोच. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी, टोमॅटो सूप एवढंच काय तर काही लोक मांस, मच्छी, अंडी यामध्ये सुध्दा आवर्जून टमाटर टाकतात.

त्यामुळे टोमॅटो हे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून ओळखली जाते. टोमॅटो हे अनेक गुणकारी फायदे देणारी फळभाजी आहे. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो. जे आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यामुळे अजून प्रभावशाली ठरतो. टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते.

हे वाचा:   रोगांशी लढायचे आहे का.? तर रोज जेवढे जास्त होईल तेवढे या पानांचे सेवन करा, रोगप्रतिकारक शक्ती मध्ये जबरदस्त वाढ होईल.!

हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांवर खुपच फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी एक टोमॅटो खाल्ले तर बराच वेळ भूक लागत नाही. टोमॅटो खाण्याचे फायदे म्हणजे व्हिटामिन-सी त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असते.हृदयसंबंधित रोगांपासून बचाव होतो. यु’रीन इन्फेक्शनपासून बचाव करते. र’क्तशुद्धी होते .पचनशक्ती वाढवते.

पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळून पिल्याने ब’द्ध’कोष्ठतेचा त्रास होत नाही. टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन के मुळे हाडे मजबूत होतात. टोमॅटो चेहऱ्यावर घासून लावल्याने चेहऱ्यावर चमक येऊन कोरडी त्वचा मुलायम होऊन मॉइश्चराइज होते. तेलकट त्वचेसाठी टोमॅटो एक उत्तम औषध आहे. त्वचेला उजळ करण्यासाठी टोमॅटो खूप उपयोगी आहे.

टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांची चमक आणि सौंदर्य वाढते. टोमॅटो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. केसांना चमकदार आणि मजबूत करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर असते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो लाभदायक आहे.

स्मोकिंगमुळे शरीराला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते. एवढे सगळे फायदे असताना देखील आपल्या शरीराला म्हणजेच स्टोन होण्यासाठी टोमॅटो कारणीभूत असेल का तर याचे उत्तर काय वाटत नाही असे असेल. कारण जर टोमॅटो एवढाच हानीकारक असता तर आपल्याला तो खाण्यासाठी डॉक्टर किंवा अनेक तज्ञ व्यक्तींनी परवानगी दिलीच नसते.

हे वाचा:   आठ तासाच्या वर कुठलीही शरीरातली गाठ टिकणार नाही.! अनेक लोकांचे लाखो रुपये यामुळे वाचले आहेत.! एकदा नक्की वाचा.!

त्यामुळे टोमॅटोमुळे स्टोन होण्याची शक्यता नसते. 100 ग्राम टोमॅटो मध्ये 5 ग्राम ऑक्सालेट असते त्यामुळे आपल्या शरीराला याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. आसे तर सर्व भाज्यांमध्ये थोड्या जास्त प्रमाणात ऑक्सालेट असते. त्यामुळे आपण सर्व भाज्या खायचे टाळतो का नाही ना मग आपल्याला फक्त या भाज्या किती प्रमाणात शिजवायचे आहेत यावर जास्त लक्ष ठेवायचे आहे.

शेवटी काय तर टोमॅटो आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक नसतो. याचे सेवन तुम्ही करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *