सगळे करून झाले पण एक केस काळा झाला नाही.! अशा लोकांना हा घरगुती जुगाड देईल आधार.! आता सफेद केसांना काळे व्हावेच लागेल.!

आरोग्य

थोडे वय झाल्यानंतर किंवा त्या अगोदरच आपले केस पांढरे होऊ लागतात आणि केस पांढरे झाले की आपण अनेक प्रकारचे बाजारात उपलब्ध असलेले डाय लावतो. यामुळे काही ठराविक वेळासाठी आपले केस काळे दिसतात. परत थोड्या वेळा नंतर ते पूर्वीसारखे पांढरे दिसू लागतात. आणि त्यासाठी आपण परत केमिकल असणारे डाय लावतो. आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात हानी पोहचते.

आपले केस डॅमेज होऊ शकतात आणि आपले केस गळू शकतात. तुटू शकतात अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या केसांसोबत होऊ शकतात म्हणूनच आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण नैसर्गिकरित्या घरगुती उपायाने द्वारे आपले केस काळे करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला इथे लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि ती आपल्याला गॅस वर ठेवायची त्यानंतर आपल्याला इथे कलौंजी घ्यायची आहे याला इंग्रजीमध्ये ब्लॅक सीड असेही म्हणतात. सोबतच आपल्याला एक चमचा मेथी घ्यायची आहे. मेथी आपल्या केसांसाठी अत्यंत गुणकारी म्हणजे फायदेशीर असते. मेथीचा वापर केल्यामुळे आपली केस गळती देखील कायमची निघून जाते त्यामुळे येथे आपल्याला एक चमचा मेथी घ्यायची आहे.

तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे चहा पावडर.चहा पावडर आपण मुख्यतः चहा बनविण्यासाठी वापरतो पण केस काळे करण्यासाठी देखील चहा पावडरची एक मुख्य भूमिका आहे. त्यामुळे चहा पावडर देखील आपल्याला एक चमचा घ्यायची आहे. त्यानंतर आता या तिन्ही गोष्टींना लोखंडाच्या कढईमध्ये बारीक गॅसवर मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आहे.

हे वाचा:   याला कचरा वनस्पती समजणाऱ्यानी एकदा नक्की वाचा, ही वनस्पती आयुष्यभराचे दुखणे उडवून देईल.!

एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी फक्त हळुवार भाजून घ्यायचे आहेत यांना जाळायचे नाही. जर तुम्ही जास्त वेळ हे मिश्रण भाजले तर यामधील औषधी गुणधर्म निघून जातील आणि याचा आपल्या केसांवर काहीही फायदा होणार नाही त्यामुळे हलकेसे भाजून घ्यायचे आहे. हे मिश्रण भाजून झाल्यावर थंड केल्यानंतर एका मिक्सर मध्ये टाकून या तिन्ही गोष्टींची आपल्याला बारीक पूड तयार करून घ्यायची आहे.

आताही पुढे आपल्याला चाळणीच्या मदतीने काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक बारीक पूड मिळेल आणि ही पुड एका वाटीमध्ये घेऊन बाजूला ठेवायचे आहे. आता आपण पुढच्या प्रक्रियेसाठी काय लागणार आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्याला परत एकदा लोखंडाची कढई गरम करायला ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला बीटची पावडर वापरायची आहे.

बीड रूट पावडर आपल्याला बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होईल त्यामुळे आपल्याला ती घ्यायची आहे. आणि त्यामध्ये एक चमचा बीट पावडर टाकायचे आहे. एक चमचा आवळा पावडर टाकायची आहे आणि आपण बनवून घेतलेली बारीक वाटून घेतलेली पावडर देखील टाकायचे आहे आणि परत एकदा हलके भाजून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता दोन ग्लास पाणी टाकायचे आहे.

त्यानंतर मंद आचेवर या मिश्रणाला शिजू द्यायचे आहे. या मिश्रणाला तोपर्यंत शिजू द्यायचं आहे जोपर्यंत दोन ग्लास पाण्याचे रूपांतर एका ग्लासामध्ये होत नाही तोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे शिजू द्यायचे आहे. मिश्रण शिजवून झाल्यानंतर ते घट्ट होईल त्यानंतर एक ते दोन चमचा मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा एलोवेरा जेल टाकायचे आहे.

हे वाचा:   ग्लासभर दुधामध्ये टाका ही एक वस्तू, पुरुषांसाठी वरदान, मर्दानी ताकद जबरदस्त वाढेल

जर तुम्ही थंडीमध्ये वापरत असाल तर एलोवेरा जेलचा वापर करायचा आहे आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरत असाल तर तुम्हाला इथे दह्याचा वापर करायचा आहे. एक चमचा दही टाकून आठवड्या मधील तीन वेळा या उपायाचा वापर करा. फक्त तीन वापरानंतर अस तुम्हाला तुमचे केस काळेभोर झालेले दिसून येते. हा झाला एक उपाय आता आपण जाणून घेणार आहोत दुसरा उपाय.

एक तर तुम्ही बनवून घेतलेली पेस्ट अशीच लावून केसांवर तीन तासांसाठी ठेवायचे आहे. तीन तासानंतर शाम्पू शिवाय केसांना धुवायचे आहे याच्या नंतर तुम्हाला खूप फरक झालेला दिसून येईल. त्यानंतर तुम्ही बनवून घेतलेल्या पेस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची मेहंदी टाकून देखील केसांवर लावू शकता त्याने देखील केस काळे होण्यास मदत होणार आहे.

या उपायामध्ये सांगितले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे आपल्या केसांवर देखील याचा काहीही वाईट परिणाम होणार नाही उलट त्यामुळे फायदाच होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *